
Anganwadi Sevika महिला बाल कल्याण मंत्रालयाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना देशभर राबवली जाते. आयसीडीएस म्हणजेच Integrated Child Development Services अतंर्गत केंद्रांच्या मार्फत विविध योजना ग्रामिण भागात राबवल्या जातात. ज्यामध्ये अंगणवाडी हा प्रकल्प देखील येतो. राज्यातील लहान मुलांची चांगली देखभाल व्हावी, कमीत कमी खर्चात त्यांना स्थानिकपातळीवर आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून देखील अंगणवाडी कर्मचाऱी कार्यरत असतात. अंगणवाडी केंद्र हे अंगणवाडी कर्मचारी आणि अंगणवाडी सहायिका चालवितात. स्थानिक पातळीवरील अंगणवाडी केंद्र हा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा प्रमुख आधारभूत उपक्रम मानला जातो. anganwadi sevika
अंगणवाडी केंद्र म्हणजे काय?
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंमलबजावणी आणि सुविधा ज्या प्रकल्पामार्फत ग्रामिण शहरी भागात पुरवल्या जातात, त्यांना अंगणवाडी केंद्रे असे म्हटले जाते. ही योजना 1974 सालापासून सुरू करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत सहा वर्षांखालील बालकांना विविध आरोग्य, शिक्षण सुविधा पुरवल्या जातात. अंगणवाडी केंद्र हे अंगणवाडी कर्मचारी आणि अंगणवाडी सहाय्यक महिला चालवतात. ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ ही केंद्र सरकारची योजना असली, तरी राज्य सरकारांमार्फत- म्हणजे राज्याच्या महिला वा बालकल्याण विभागामार्फत ही योजना चालवली जाते. anganwadi sevika
अंगणवाडी कर्मचाऱ्यांसंबंधी कोणता निर्णय घोषित करण्यात आला?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार 1 एप्रिल 2022 पासून कार्यरत असलेल्या सुमारे 5 हजार 605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 1 लाखा रुपये तर मिनी अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीसांना प्रत्येकी रुपये 75 हजार रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे anganwadi sevika
किती कर्मचाऱ्यांना मिळणार हा लाभ?
महिला बाल कल्याण मंत्रालयाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत या विभागात राज्यभर 5 हजार 605 अंगणवाडी सेविका, मदतनिसांना काम करीत आहेत. या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. anganwadi sevika
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभासंबंधीत शासन निर्णय
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1 एप्रिल, 2022 पासून ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इ. प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या एकरकमी लाभाबाबात दिनांक 30 एप्रिल 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या शासन निर्णयनुसार या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. anganwadi sevika
अंगणवाडी सेविकांचे नेमके काम काय असते?
अंगणवाडी सेविका 3 ते 6 वर्षांखालील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, पूरक पोषण आहार पुरवणे, बालकांच्या आरोग्याची निगा राखणे, स्तनदा मातांना पोषण आहार पुरविणे ही कामे करतात. महाराष्ट्र राज्यात 10 हजार 800 पेक्षाही जास्त अंगणवाडया असून 2 लाख 8 हजार अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस आहेत. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत पोषण, आरोग्य आणि शिक्षणविषयक योजनांची अंमलबजावणी केली जाते. अंगणवाडी सेविकांना सध्या साठेआठ हजार रुपये मानधन दिले जात आहे. तर मदतनीसांना पाच हजार रुपये मानधन दिले जाते. शासनामार्फत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार असून त्यांना त्यानिमित्ताने या पैशांची जरुर आर्थिक मदत होणार आहे. anganwadi Sevika
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी याआधी देखील त्यांना मिळणारा पगार हा अतीशय कमी असल्याचे वारंवार सांगितले आहे. त्याबद्दल त्यांनी वेळोवेळी आंदोलने देखील केली आहे, मोर्चे काढलेले आहेत. त्यांच्या या सर्व चळवळीचे फलीत म्हणून शासनाने यावेळी राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा नक्कीच या महिला कर्मचाऱ्यांना फायदा होईल ही अपेक्षा. आणि अशाच पद्धतीने राज्य मंत्रीमंडळ या अंगणवाडी सेविका, कर्मचाऱ्यांचा विचार करुन निर्णय आणि योजना राबवित राहतील ही अपेक्षा. anganwadi Sevika
I am extremely inspired together with your writing talents as neatly as with the layout on your blog. Is that this a paid topic or did you modify it yourself? Either way keep up the excellent quality writing, it is uncommon to look a great weblog like this one these days!