Pipeline Subsidy Scheme: आता बिनधास्त आधुनिक शेती करा; सरकार देत आहे शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी अनुदान

Pipeline Subsidy Scheme महाराष्ट्र शासना शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना उत्तम पद्धतीने शेती करता यावी यासाठी शासन अनुदानाच्या माध्यमातून मदत करते. महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त शेती क्षेत्र सिंचनाखाली यावे, शेतीतून चांगले उत्पादन व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने पाईप लाईनअनुदान योजनेची सुरुवात केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा यासाठी राज्य सरकार विविध शेती विषयक योजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पाईपलाईन योजना. या योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी 15 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

काय आहे पाईपलाईन सबसीडी स्कीम?

केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना आणत आहेत. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत असतो. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन मिळावे, नवतरुणांनी शेतीचा, धनधान्याचा विकास करावा, आधुनिक शेतीतून संशोधनात्मक काम करावे यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे. त्यासाठी त्यांना पायाभूत सुविधांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक मदत होणे देखील तितकेच महत्त्वाते आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अधिक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात मदत केली जात आहे.

सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाईपलाईन Pipeline Subsidy Scheme करण्यासाठी देखील पीव्हीसी पाईप तसेच एचडीपीएसाठी अनुदान दिले जाते. आता नक्की ही योजना काय आहे,. आणि त्याच्या अनुदानाबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

अनुदानाची रक्कम किती ?

या योजनेच्या माध्यमातून पीव्हीसी पाईपसाठी अंदाजे 35 रुपये प्रति मीटर या दराने शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान 500 मीटर पर्यंत मिळत असते. पाईपलाईनसाठी अनुदान घ्यायचे असेल, तर योजनेतून जास्तीत जास्त 15 हजार रुपयांच्या अनुदान शेतकऱ्यांना मिळते.

पण अनुदानासाठी खालील नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे. 

  • शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • शेतकऱ्यांना स्वतःच्या नावावर सातबारा उतारा असणे गरजेचे आहे.
  • शेतामध्ये पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणे  गरजेचे आहे.
  • शेतकरी दारिद्र्यरेषेखाली असणे गरजेचे.
  • शेतकऱ्याकडे कमीत कमी एक एकर जमीन असणे गरजेचे आहे.
  • पाईप खरेदी करण्यासाठी 50% अनुदान मिळते आणि उरलेली रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा ?

या पाईपलाईन अनुदान योजनेसाठी  शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल. https://mahadbt.maharashtra.gov.in/  या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हांला या योजनेचा फायदा नक्कीच होईल

पाईप लाईन अनुदान योजनेचे फायदे

राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या पाईपलाईन अनुदान योजनेअंतर्गत शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध बनतील. या योजनेचे अनेक फायदे आहेत.  राज्यातील शेतकऱ्यांना पाईपलाईन टाकण्यासाठी  कोणावरही आर्थिक कर्ज घेवून कर्जबाजारी होण्याची गरज पडणार नाही.

  • पाईपलाईन अनुदान योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल. या योजनेमुळे राज्यातील शेतकरी स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करु शकतील. शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी शासनाकडून अनुदान दिल्याने शेतकऱ्याचा कर्जाचा बोजा कमी झाल्याने आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल.
  • राज्यातील तरुण पिढी शेती क्षेत्राकडे आकर्षित होण्यासाठी राज्यात राबवण्यात येणाऱ्या पाईपलाईन अनुदान योजनेचा फायदा होईल.
  •  शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाल्यास त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे. Pipeline Subsidy Scheme

Leave a Comment