IoT-Based System for Crop Protection from Animals: शेतात प्राणी शिरताच मोबाईलवर येईल मॅसेज

IoT-Based System for Crop Protection from Animals

शेतात अनेकदा जंगली किंवा पाळीव प्राणी सुद्धा घुसतात आणि पिकाची नासधुस करतात. बरं कोणते हे जंगली प्राणी तर डुक्कर, रानगेंडे, रानगाई तर पाळीव प्राण्यांमध्ये गाई, म्हशी, बैल, शेळ्या सतत शेतात शिरण्याची संधीच पाहत असतात. वेळी अवेळी शेतात शिरणाऱ्या या रानटी प्राण्यांमुळे अनेकदा शेतकऱ्यांना ऊन, वारा, पाऊस, थंडीचा सामना करीत शेतातच तळ ठोकावा लागतो. त्यात शेतकऱ्याची नजर चुकल्यास हे प्राणी शेतीची नासधुस करतात. परंतु आता यावर नव्या टेक्नॉल़ॉजीच्या मदतीने उपाय शोधण्यात आलेला आहे. चला तर मग आजच्या आपल्या लेखात पाहूया कोणता आहे हा उपाय. IoT-Based System for Crop Protection From Animals  

IOT Crop Protector  कोणी बनवले हे यंत्र?

गोरखपुर येथील buddha institute of technology बुद्धा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शिकत असलेल्या इंजिनिअरिंगच्या  चार विद्यार्थ्यांनी IoT Crop Protection आयओटी क्रॉप प्रोटेक्टर नावाचे यंत्र बनवले आहे. हे यंत्र शेतात प्राणी घुसल्यास लगेचच शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर SMS पाठवण्याचे काम करते. चला तर मग पुढे पाहूया इंजिनिअरिंगच्या मुलांनी बनवलेल्या या  आयओटी क्रॉप प्रोटेक्टर या यंत्राची वैशिष्ट्ये IoT-Based System for Crop Protection From Animals

  • WiFi मॉड्यूल यंत्र

सध्या टेक्नॉलॉजी इतकी फास्ट झाली त्याला काहीच मर्यादा उरलेल्या नाहीत. त्या इंटरनेटमुळे तर संपुर्ण जग एका क्लिक वर आल्यासारखे वाटते. याच इंटरनेटमधील महत्त्वाच भाग म्हणजे WiFi.

  • IOT Crop Protector  मध्ये सिम इन्सर्ट करण्याची सोय

या यंत्रामध्ये एक सीम इन्सर्ट करण्यात आले आहे. जे प्रोटोटाईपमधील जे डिवाईसेस आहेत ते एकत्र कनेक्ट करतात.

  • आयओटी क्रॉप प्रोटेक्टरला सोलर पॅनलची जोड

आयओटी क्रॉप प्रोटेक्टरला सोलर पॅनल म्हणजे सौर ऊर्जेच्या पॅनलरची जोड देण्यात आली आसल्याने सतत विजेचा पुरवठा होत राहणार आहे. त्यासाठी वेगळी विज जोडणी करण्याची आवश्यकता नाही .

  • आयओटी क्रॉप प्रोटेक्टरमध्ये आहे wide range camera

आयओटी क्रॉप प्रोटेक्टरमध्ये आहे wide range camera. ज्याच्या मदतीने रात्रीच्या अंधारात देखील प्राणी टिपले जाणार आहेत. आणि त्यांचा फोटो काढून सेव केला जाणार आहे. शेतात सकाळ, दुपार, रात्री कधीही प्राणी शिरल्यास किंवा प्राण्यांची शेतात शिरण्याचा प्रयत्न जरी केला असला तरीही या कॅमेऱ्यामध्ये असलेले सेन्सर प्राण्यंची हालचाल टिपू शकणार आहेत.  IoT-Based System for Crop Protection From Animals

  • यंत्रात असलेल्या सीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर जाईल मॅसेज

IOT Crop Protector  या यंत्रामध्ये एक डिवाईस आहे त्यात sim इंन्सर्ट करता येणार आहे. या सिमच्या मदतीने मोबाईलवर मॅसेज जाण्याची सोय करण्यात आली आहे. सतत मिळत असेलल्या सौर ऊर्जेच्या पॅनलवर Wifi चालेल आणि हे सीन Wifi च्या इंटरनेटच्या मदतीने मॅसेज सेंट करण्याचे काम करणार आहे.

  • IOT Crop Protector  यंत्र 500 मीटरच्या अंतरावर काम करते

शेतकरी त्यांच्या शेतात हे यंत्र बसवून निवात झोपी जाऊ शकतात. केवळ  त्या यंत्रापासून  किमान 500 मिटर अंतरावर शेतकरी असणे आवश्यक आहे. कारण WiFi ची ती रेंज असते आणि तर आणि तरच शेतकऱ्यांना शेतात प्राणी घुसल्याचा मॅसेज मोबाईलवर मिळेल. IoT-Based System for Crop Protection From Animals

  • ऊन, वारा, पाऊस कोणत्याही गोष्टीचा यंत्रावर परिणाम होणार नाही.

IOT Crop Protector   हे यंत्र सोलार पॅनलच्या मदतीने चालत असल्याने त्यावर ऊन, वारा, पाऊस या कोणत्याच नैसर्गिक हानीचा परिणाम होणार नाही. हे यंत्र सतत सुरु राहणार आहे. शेतकऱ्यांना फक्त त्यांच्या शेतात हे यंत्र बसवायचे आहे आणि घरी निश्चिंत झोप घ्यायची आहे. IoT-Based System for Crop Protection From Animals

1 thought on “IoT-Based System for Crop Protection from Animals: शेतात प्राणी शिरताच मोबाईलवर येईल मॅसेज”

Leave a Comment