LAND REGISTRATION: जमिनीची नोंदणी कशी केली जाते; जाणून घ्या अधिक माहिती

LAND REGISTRATION जमिनीची नोंदणी म्हणजे काय व ती कशी केली जाते हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. सदयाच्या काळात जमिन विकत घेतल्यानंतर जमिनीची नोंदणी करुन घेणे नितांत गरजेचे व महत्वाचे आहे. तुम्ही स्वःत जमिन खरेदी केली असेल किंवा नसेल पुर्णकेली तरी आपल्या मित्र परिवार किंवा नातेवाईकांकडुन यासंदर्भात याविषयीची चर्चा आपल्या कानावर पडली असेलच. तर जमिन खरेदी केल्यानंतर जमिनीची नोंदणी करुन घेणे गरजेचे असते. कारण सर्वसामान्य नागरिक असोत किंवा श्रीमंत एखादी जमिन खरेदी करतांना ते आपल्या आयुष्याची बचत त्या जमिन खरेदीसाठी (invest करतात) गुंतवतात. काहीवेळेस स्त्रिया आपले दागिणे ही गहाण ठेवतात.

जमिनीची रजिस्ट्री करणे म्हणजे काय?

जमिनीची रजिस्ट्री करणे म्हणजे अगदी सोप्प्या भाषेत सांगायचे झालेच तर आपण असं म्हणू शकतो की, जमिनीच्या मालकाचे नाव काढून भाडेकराचे नाव जोडले जाते. म्हणजेच जमिनीचा जो मुळ मालक असतो त्यांचे नाव काढून नविन खरेदीदाराचे नाव कागदोपत्री दाखल करणे म्हणजे जमिनीची रजिस्ट्री करणे होत. आणि कोणत्याहि जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. LAND REGISTRATION

जमिनीची नोंदणी करणे का गरजेचे आहे?

जेव्हा आपली बचत आपण एखादी गोष्ट घेण्यासाठी वापरतो, त्यावेळेस तिची सुरक्षा ही आपल्यासाठी तितकीच महत्वाची आहे. अशा प्रकरणात जर लोकांची फसवणुक झाली तर त्या व्यक्तींच्या हातुन त्याचे भांडवल आणि जमिन गमावण्याची शक्यता असते. म्हणुनच जेव्हा तुम्ही तृतीय पक्षांकडून (Third party) कोणतीही मालमत्ता विकत घ्याल तेव्हा काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्या गोष्टी कोणत्या? पाहुयात.

जाणुन घेऊया  कायदेशीरबाबींचा आढावा-

जमिनीची नोंदणी करण्यापुर्वी मालमत्तेचे बाजारमुल्य पडताळले जाते. त्यानंतर बाजारमुल्यांनुसार कर भरावा लागतो. त्यानंतर स्टॅम्प पेपर विकत घेऊन खरेदीखत केले जाते. खरेदीखत बनवतांना विकत घेण्याऱ्यांची व देणाऱ्यांची दोघांची माहिती त्यांवर नमुद केलेली असते. नोंदणी प्रक्रिया करीत असतांना दोन कोणतेही साक्षीदार ओळखपत्रासोबत हजर करावे लागतात. त्यांनतर नोंदणी प्रक्रिया पुर्ण होऊन नोंदणी क्रमांक मिळतो. LAND REGISTRATION

जमिनीचे व्यवहार करतांना पुढील गोष्टींची खबरदारी घ्या;

आजच्या काळात जमिन खरेदी करतांना लोक ऐकीव माहितीवर विश्वास ठेवतात किंवा समाजमाध्यमांवरील अर्धवट माहितीच्या आधारे व्यवहार करतात त्यांमुळे त्यांची फसवणुक होण्याचा धोका वाढतो, परिणामी त्यांचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. त्यांमुळे समाजमाध्यमावरील माहितीवर पुर्णपणे विश्वास न ठेवता जमिनीच्या मुळ मालकाकडुन माहिती पडताळुन घ्यावी. किंवा नजीकच्या नोंदणी कार्यालयात जाऊन संबंधित मालमत्ता अधिकृत आहे किंवा नाही याची खात्री करुन व्यवहार करण्याचा निर्णय घ्यावा व योग्य ती पावले उचलावी. LAND REGISTRATION

जमिनीच्या खरेदीचा व्यवहार करताना ही कागदपत्रे पहा

जमिनीचे व्यवहार करताना फसवणूकीचे खूप प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे कोणतीही मालमत्ता किंवा जमीन खरेदी करताना तुम्ही सर्वप्रथम त्या जमिनीचे कागदपत्रं तपासले पाहिजे. त्यामध्ये जमिनीची रजिस्ट्री हा एक अत्यंत महत्त्वाचा कागद आहे. त्यानंतर जमिनीचा 7/12 उतारा, जमिनीचा 8अ उतारा, जमिनीचा नकाशा, खरेदी खत ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. ही कागदपत्रे तुम्हाला वाचता येत नसतील तर तुम्ही जमीन कायदा माहित असलेल्या वकिलाकडे जाऊन त्या कागदपत्रांवरील माहिती समजून घेऊ शकता. परंतु जमीन खरेदीसंबंधीत कोणताही निर्णय घाईत घेणे धोक्याचे होऊ शकते.

Leave a Comment