Ration Card Online Maharashtra सरकारच्या खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत रेशन कार्डच्या माध्यमातून गरिबांना मोफत धान्य दिले जाते. यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच पीडीएस कार्यरत आहेत. रेशनच्या खरेदी विक्रीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी भारत सरकारने “ई – पीओएस” ही ऑनलाईन यंत्रणा सुरू केली आहे. रेशन कार्ड धारकांना किती धान्य दिले जाते यासंबंधीची सर्व माहिती ई – पीओएस यंत्रणेमध्ये नमूद केली जाते. महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम ही यंत्रणा जानेवारी 2017 मध्ये लातूर जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. मग त्यानंतर राज्यात यंत्रणा राबवण्यात आली. सध्या या यंत्रणेद्वारे आपल्याला रेशन किती मिळते हे आपणास समजते. म्हणूनच आज आपण या ई – पीओएस यंत्रणेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. Ration Card Maharashtra
ई-पीओएस यंत्रणा म्हणजे काय?
ई-पीओएस म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स पॉईंट ऑफ सेल Electronic point of sale. भारत सरकारच्या अन्न व खाद्यपदार्थ या विभागामार्फत चालवण्यास येणारी ही क योजना आहे. शिधापत्रिकाधारकांना किती धान्य वितरित केले गेले आहे हे दर्शवणारी ही प्रणाली आसून त्याचा रेशन घोटाळे टाळण्यासाठी मोठा हातभार लागत आहे. Ration Card Online Maharashtra रेशनकार्ड धारकांना किती धान्य मंजूर झालेले आहे आणि रेशन ऑफिसर मार्फत किती धान्य देण्यात आले यासंबंधीची सर्व माहिती या यंत्रणेद्वारे आपल्याला मिळवता येते. ई – पीओएस यंत्रणेमार्फत तुम्हाला तुम्हाला किती धान्य मंजूर झाले आहे याबाबतची सर्व माहिती मिळवण्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या रेशनकार्ड सोबत लिंक असणे आवश्यक असते.
तुम्ही रेशन घेत असलेल्या दुकानात काही धान्य घोटाळा तर नाही ना?
माहिती अधिकाराच्यामाध्यमातून आपण आपल्या दुकानातील कारभार सुरळीत चालू आहे का? याची संपूर्ण माहिती मिळवू शकतो. कारण आपल्या देशात रेशनिंग व्यवस्थेवर अनेक गरिबांचे पोट चालू असते. बरेचदा रेशन दुकानदार कार्ड धारकांना पूर्ण धान्य न देता थोडेच धान्य देतो आणि उरलेले धान्य काळ्या बाजारात विकले जाते. त्याचे पैसे रेशन ऑफिसरच्या खिशात जातात. याबाबत अनेकदा दुकानदारांच्या तक्रारी येत असतात की, महिन्याचे जे रेशन आहे ते फक्त ८ दिवस वाटले जाणार किंवा आठवड्यातून फक्त २ वेळ रेशन दिले जाणार. शासनाकडूनच धान्य कमी आले असल्याने रेशन कार्ड धाराकांना धान्य कमी दिले जाईल असे दुकानदारांकडून सांगण्यात येते. अशा अनेक तक्रारी वारंवार आपल्याला ऐकायला मिळतात. असे सतत होत असेल तर आपण माहितीच्या अधिकाराद्वारे रेशन दुकानदाराकडून माहिती मिळवू शकतो. हि माहिती मिळविण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.
- माहितीच्या अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत नागरिक आपल्याला हवी असलेली माहिती शासनाकडे मागू शकतात. याच्या अर्जामध्ये ३ प्रकार आहेत. पहिला म्हणजे अपिली अधिकारी यांना द्यायचा अर्ज दुसरा म्हणजे जनमाहिती अधिकार आणि तिसरा म्हणजे अर्ज थेट आयुक्तांना द्यायचा आर्ज.
- हा अर्ज आपण साध्या कागदावर लिहून सुद्धा देऊ शकतो. अर्जामध्ये अर्जदाराचे नाव लिहा. अर्जदाराचा पूर्ण पत्ता नमूद करा. कोणती माहिती हवी आहे त्याबाबातचा विषय टाका.
- अर्जाचा मजकूर पुढील प्रमाणे लिहा. आपल्या रेशन दुकानात (दुकान नंबर लिहा) शासनामार्फत स्वस्त धान्य दिले जाते. त्याबाबतची सत्यप्रत माहिती अधिकारामार्फत देण्यात यावी. तसेच विक्री पावती बुकची सत्यप्रत देखील सोबत जोडली जावी. अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे की नाही हे देखील नमूद करावे.
- त्या माहिती अधिकाराच्या अर्जावर १० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प पेपर जोडा. अर्जदाराची सही, ठिकाण, दिनांक, मोबाईल नंबर इत्यादी सर्व माहिती लिहा.
- अशा पद्धतीने लिखित अर्ज करुन तो रेशन कार्यालयात जमा करा.
गैरकारभार आढळल्यास रेशन दुकानदाराची तक्रार करा
तुम्ही रेशन घेत असलेल्या रेशन दुकानात काही गैर कारभार आढल्यास आजच रेशन ऑफिसची तक्रार तुम्ही नोंदवू शकता.
- सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली निःशुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967
- ई-मेल: helpline.mhpds@gov.in वर तक्रार देखील करु शकता.
Goregaon East Mumbai Maharashtra ha thikani rational dukan malak purn ration det nahi malka che nav aahe Gupta, Morya etc. barebch aahe
Vaijinath ram Chavan
9657101000
2720230644692
Hiiii