White Sandalwood Farming: अशी करा सफेद चंदनाची शेती, 12 ते 15 वर्षांत मिळवा करोडो रुपये

बरेचदा शेतकरी बिगरशेती जमिनीत कशाची लागवड करायची असा विचार करीत असतात. हे शेतकरी त्यांच्या शेतात अशा पिकाच्या शोधात असतात जे कमी खर्चात जास्त उत्पन्न देऊ शकेल. म्हणूनच आज आम्ही चंदनाच्या शेतीबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. पांढऱ्या चंदनाच्या शेतीमध्ये सुरुवातीची गुंतवणूक कमी आहे परंतू भरपूर नफा आहे. या शेतीची वैशिष्ट्ये आणि महत्वाच्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

चंदनाची शेती करण्यासाठी राज्य देत आहे प्रोत्साहन

भारतभर विविध राज्यांमध्ये चंदनाच्या शेतीसाठी योजना राबवल्या जात आहेत. तसेच महाराष्ट्रात दुस्धा राज्य सरकार चंदनाची शेती करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे, त्याकरिता विविध योजना देखील राबवल्या जात आहेत. आज पाहता भारतात सफेद चंदनाचा सर्वसाधारण दर आठ हजार ते दहा हजार प्रति किलो इतका आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 20 हजार ते 25 हजार इतका आहे. White Sandalwood Farming

चंदनाची शेती करताना तज्ञांकडून मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे

चंदनाची शेती करण्याआधी तुम्ही तज्ञ व्यक्तींकडून  चंदनाच्या शेतीसंबंधीत माहिती गोळा करा, तसेच चंदनाची शेती पासून मिळणारे उत्पन्न त्वरित नसते त्यासाठी सर्व साधारणपणे दहा ते बारा वर्ष प्रतीक्षा करावी लागते. चंदनाच्या एका रोपाची सर्वसाधारण किंमत चारशे रुपये इतके आहे. White Sandalwood Farming

सफेद चंदनाच्या शेतीचे मुख्य वैशिष्ट्य

सफेद चंदनाची शेती करण्यामागचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या शेतीसाठी पाणी अत्यंत कमी लागते. चंदनाची छोटी छोटी रोपे लावताना आणि ती जगवताना फक्त योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते परंतु कालांतराने जस जसे हे झाड मोठे होत जाते तस तसे या झाला जास्त पाण्याची गरज नसते. त्यामुळे चंदनाची शेती आपण त्या भागात देखीस करु शकतो जेथे पाणी कमी असते. चंदनाच्या शेतीच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांनी 12 ते 15 वर्षांनी एक उत्तम आर्थिक सुरक्षितता मिळू शकेल. जेणेकरुन चंदनाच्या शेतीकडे भविष्यात करावयाच्या आर्थिक गुंतवणूकीप्रमाणे आज पाहिले पाहिजे. White Sandalwood Farming

ओसाड जमिनीतही सफेद चंदनाची लागवड करता येते

सफेद चंदनाची शेती करणे अत्यंत सोपे आहे कारण अगदी ओसाड जमिनीतही सफेद चंदनाची शेती लागवड करता येते. या झाडाला जास्त पाण्याची गरज नसते, सुरुवातीला योग्य पाणी दिले असता कालांतराने सतत पाणी देण्याची गरज भासत नाही. White Sandalwood Farming

1 एकर जमिनीवर पांढऱ्या चंदनाची 500 झाडे लावता येतात

एखाद्या शेतकऱ्याकडे कमी शेती असेल किंवा कमी जमीन असेल तर चंदनाती शेती करणे हा अत्यंत सोपा आणि उत्तम पैसे मिळवून देणारा पर्याय ठरु शकतो. कारण 1 एकर जमिनीवर 500 चंदनाची झाडे लावता येतात.  त्यासाठी जास्त जागा लागत नाही, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची जमीन कमी आहे त्यांनी त्यांच्या जामिनीत चंदनाची शेती करण्यास काहीच हरकत नाही. White Sandalwood Farming

चंदन विकून कोट्यांवधी पैसे मिळवता येतात

औषध बनविण्यासाठी, देवपुजा, सौदर्य प्रसाधनांमध्ये, अत्तर आणि अनेक विविध गोष्टींसाठी सफेद चंदनाचा वापर केला जातो. त्यामुळे बाजारात या चंदनाला खूप मागणी आहे. चंदनाच्या शेतामध्ये सुरुवातीला 1 लाख गुंतवून 12 ते 15 वर्षांनंतर तब्बल 80 ते 90 लाख रुपये कमाऊ शकता. इतकेच काय तुमची जागा जास्त असेल आणि जास्त प्रमाणात चंदनाची शेती केल्यास कोट्यावधी रुपये कमावता येतात. White Sandalwood Farming

तुम्हाला ही माहिची फायदेशीर आहे असे वाटल्यास हा लेख तुमच्या मित्रपरीवारात जरुर शेअर करा. म्हणजे त्यांना देखील चंदनाच्या शेतीबद्दल अधिक माहिती मिळेल, आणि त्यांच्या जमिनीमध्ये पांढऱ्या चंदनाची शेती करण्याबद्दल विचार केला जाईल. अधिक माहितीसाठी तुमच्या  जिल्ह्यातील एखाद्या कृषी विद्यापिठाला जरुर भेट द्या आणि पांढऱ्या चंदनाच्या शेतीबद्दल माहिती मिळवा आणि किमान 100  रोपांपासून सुरुवात करा. White Sandalwood Farming

1 thought on “White Sandalwood Farming: अशी करा सफेद चंदनाची शेती, 12 ते 15 वर्षांत मिळवा करोडो रुपये”

Leave a Comment