PM Kisan 17th Instalment:  पीएम किसान निधी योजनेचा 17 वा हप्ता  कधी येणार..!

भारतातील शेतकरी आजही शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे कधी पाऊस जास्त पडतो तर कधी कमी पडतो त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसून येते. अशामध्ये शेतकरी वर्ग हवालदिल होऊ नये म्हणून  2018 सालात केंद्र शासनातर्फे पंधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रु. दरवर्षी देण्यात येतात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शासनामार्फत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि 17 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता कधी जमा होईल याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. PM Kisan 17th Instalment

सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना

पंतप्रधान किसान सन्मान निधी Pradhan Mantri Kisan Samman Nidhi योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर महिना ठरवून ठेवलेली रक्कम पुरवली जाते. दिनांक 1 डिसेंबर 2018 पासून केंद्र सरकारद्वारा या योजनेची सुरुवात करण्यात आली. आजापर्यंत देशभरातील 14.5 करोड शेतकरी लाभार्थी आणि महाराष्ट्रात 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत 2 हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये 2000 म्हणजेच वार्षिक 6000 अर्थसाह्य दिले जाते. या अर्थसहाय्याचे आतापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि आता शेतकरी पुढील 17 व्या हफ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.  PM Kisan 17th Instalment

16 वा हप्ता कधी जमी झाला

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आतापर्यंत 21 हजार कोटीहून अधिक रक्कम सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती योजनेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आणि पुढचे हप्ते देखील सुरळीत आणि वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील याची देखील अधिकारीव वर्ग खात्री देत आहेत. PM Kisan 17th Instalment

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 17 हप्त्याची  शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. प्रत्येक लाभार्थीला 6000 रु. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाईल. दर चार महिन्यांनी केंद्र सरकार 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते.

17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा केला जाणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योतनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात फेब्रुवारीमध्ये जमा करण्यात  आला होता, पुढील 17 वा हफ्ता त्याच्या चार महिन्यानंतर म्हणजेच जून किंवा जुलै 2024मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु त्याआधी शेतकऱ्यांनी KYC अपडेट करायला विसरु नये, कारण त्याबाबतही शासनाने काही नियम बदल केला आहे. PM Kisan 17th Instalment

ई केवायसी कसे करावे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 16 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. परंतु आता पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करुन Kyc पूर्ण करायची आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या लॉगीन आयडीचा वापर करुन त्यांचे कागदपत्रं आणि इतर माहिती अपडेट करायची आहे. या सर्व गोष्टी मोबाईलवरुन देखील घरच्या घरी होऊ शकतात. परंतु ई केवायसी करणे अत्यंत अनिवार्य आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात 17 वा हप्ता जमा होणार नाही PM Kisan 17th Instalment

पीएम किसान हेल्पलाईन नंबर

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून  शासनाने 55261-188115526 आणि 011-23381092 हे दोन हेल्पलाईन नंबर दिले आहेत. तसेच काही अडचण असल्यास  शेतकरी pmkisan.ict@gov.in या योजनेशी संबंधीत इमेल आयडीवर मेल करु शकतात. PM Kisan 17th Instalment

Leave a Comment