Earn money by selling Old Clothes: आता घरबसल्या जुने कपडे विकून कमवा पैसे! फक्त करावं लागेल एवढंच!

Earn money by selling Old Clothes: मित्रांनो आम्हाला खात्री आहे की तुमच्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांनी आतापर्यंत अनेक कपड्यांची खरेदी केली असेल पण ते कपडे तुम्ही अजून वापरले नसतील. असे बरेच लोक असतील ज्यांच्याकडे भरपूर कपडे असे आहेत जे न वापरता घरामधे असेच पडून असतील. जर कपड्यांची साइज मोठी किंवा लहान झाल्यामुळे ते कपडे तुमच्या वापरण्यात येत नसतील तर तुम्ही हे असे कपडे विकू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वेबसाइटबद्दल माहिती देणार आहोत, जिथे तुम्ही तुमचे जुने कपडे विकू शकता आणि त्यातून पैसे सुद्धा कमावू शकता. Earn money by selling Old Clothes

आताच्या या लक्झरी लाइफस्टाइलमध्ये लोकांना तेच तेच कपडे जास्त वेळ घालायला आवडत नाहीत. कपडे जुने होताच किंवा 3 ते 4 वेळा घालून होताच लोकं ते कपडे टाकून देतात किंवा एखाद्या गरजूला देऊन टाकतात आणि त्या कपड्यांचा वापर काही होत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? की यामुळे तुमचेच नुकसान होते. परंतु आम्ही तुम्हाला आज अशा काही वेबसाइट्स बद्दल माहिती सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही हे कपडे घरी बसून विकून त्याच्या मदतीने पैसे देखील कमवू शकणार आहात. अनेक अशा ऑनलाइन कंपन्या आहेत ज्या जुन्या कपड्यांसाठी जास्त किंमत देतात. एवढेच नाही तर या कंपन्या स्वतः तुमचे जुने कपडे तुमच्या घरून घेऊन जातात. या साइट्सवरून तुम्ही केवळ जुने कपडे विकू शकत नाही तर चांगल्या किमतीत इतर कपडे किंवा इतर वस्तूही खरेदी करू शकता. या कंपन्या तुमच्या कपड्यांच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला पैसे देतात.

इलानिक | Elanic
इलानिक ही जुने कपडे ऑनलाइन विकण्यासाठीची एक उत्तम वेबसाईट आहे. या साइटवर तुम्ही कपडे खरेदी करणाऱ्यांशी अगदी सहज संवाद साधू शकता. या साईटवर जुने कपडेही चांगल्या किमतीत तुम्हाला उपलब्ध होतात. या वेबसाईट वर फक्त कपडे विकण्याव्यतिरिक्त, आपण या साइटवरून सेकंड हँड कपडे खरेदी देखील करू शकणार आहात.

OLX
मित्रांनो तुम्हाला OLX बद्दल आधीच बरीच माहिती असेलच. जुन्या कपड्यांशिवाय OLX वर अनेक वेगवेगळ्या गोष्टी विकल्या आणि खरेदी केल्या जाऊ शकतात. विक्री व्यतिरिक्त, आपण या साइटवरून कपडे देखील खरेदी करू शकता, परंतु, आपण OLX वर खरेदी विक्री करताना थोडे सावध असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण या साईट वरून दररोज लोकांची फसवणूक होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. Earn money by selling Old Clothes

एटाशी | Etashee
Etashee ही एक ऑनलाइन साइट आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे जुने कपडे फार चांगल्या किमतीत विकू शकणार आहात. या वेबसाईट ची चांगली गोष्ट अशी आहे की ही साइट फॅशन केंद्रित साइट आहे. या साइटवरून तुम्ही नवीन तसेच जुने कपडे सुद्धा खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही तुमचे जुने कपडे विकण्यासाठी देखील या साईट चा वापर करू शकणार आहात.

Sopyl
या वेबसाईटवर तुम्ही फक्त कपडेच नाही, तर कपड्यांव्यतिरिक्त, अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स तसेच लहान मुलांच्या अनेक प्रॉडक्ट्स ची खरेदी आणि विक्री देखील करू शकता. त्या सोबतच आपण या साइटवर पुस्तके देखील विकू शकणार आहात. या वेबसाइटचे एक ॲप सुद्धा डेव्हलप करण्यात आले आहे ज्याच्या मदतीने तुम्ही ग्राहकांशी सहज संवाद साधू शकणार आहात आणि वस्तूंच्या किंमतीबाबत बोलणी करू शकणार आहात.

रिफॅशनर | Refashioner
या साइटचे नावच स्वतः रिफॅशनर आहे. या साइटवर तुम्ही तुमचे जुने शूज, बॅग, कपडे आणि इतर वस्तू विकू शकणार आहात. या साइटवरून तुम्ही अनेक मॉडेल्स आणि अनेक सेलिब्रिटीज चे कपडे देखील खरेदी करू शकणार आहात. Earn money by selling Old Clothes

1 thought on “Earn money by selling Old Clothes: आता घरबसल्या जुने कपडे विकून कमवा पैसे! फक्त करावं लागेल एवढंच!”

Leave a Comment