E pos Macine in ration Shops: आता अंगठा न लावता मिळनार रेशन, जाणून घ्या ही नवी शासकीय सुविधा

E pos Macine in ration Shops: नागरी व अन्न सुरक्षा विभागामार्फत भारतातील विविध राज्यांमध्ये कमी पैशात धान्य वाटप केले जाते. यामार्फत भारतातील तब्बल 40 कोटीहून जास्त कुटुंबांना हे कमी दरातील धान्य दिले जाते. परंतु या शासकीय सेवेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे अनेकदा लक्षात आल्याने शासनाने त्यावर योग्य ती उपाययोजा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी डिजिटल पद्धतीने रेशन वाटप करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. त्यासाठी आता कोणत्याही रेशन लाभार्थ्याला जुन्या पद्धतीप्रमाणे आंगठा न लावता रेशन मिळणार आहे. ही सुविधा नक्की कशा पद्धतीने काम करीत आहे हे आपण आजच्या आपल्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. E pos Macine in ration Shops

4-जी ई-पॉस मशिन व IRIS स्कॅन सुविधा

भारतभरातील रेशन दुकानांमध्ये आता 4-जी ई-पॉस मशिन व IRIS स्कॅनची सोय करण्यात येणार आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करता येणार नाही. ज्या लाभार्थ्यांना धान्य घेतले आहे त्यांची नावे आणि माहिती आपोआपच शासनाच्या सर्वरवर सेव केले जाणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे नागरिकांना धान्य घेण्यासाठी अधिक वेळ रांग लावून वाट पहावी लागणार नाही. E pos Macine in ration Shops

4-जी ई-पॉस मशिन व IRIS स्कॅन मशीन कसे काम करते

4-जी ई-पॉस मशिन व IRIS स्कॅन या मशीनमध्ये लाभार्थ्यां कुटुंबातील मुख्य व्यक्ती व इतर व्यक्तींची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. त्यांच्या डोळ्यांचे स्कॅनिंग आणि बोटांचे ठसे म्हणजेच fingerprints सेव करुन ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध शासनामार्फत घेण्यात आला, आणि  धान्याचा होणारा गैरव्यवहार थांबविण्यासाठी तसेच  लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांची ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूचे वाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. E pos Macine in ration Shops

रेशन दुकानावरील लांबच लांब रांग बंद होणार

भारतीय शासनामार्फत रेशन दुकानांमध्ये आता 4-जी ई-पॉस मशिन व IRIS स्कॅनची सुविधा सुरु करण्यात आल्यामुळे रेशन दुकानावरील लांबच लांब रांगा आता बंद होणार आहेत. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत घेण्यात आलेला हा क्रांतीकारी निर्णय नागरिकांना अत्यंत सोयीचा ठरणार आहे.  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे नागरिकांना रेशन दुकानांवर प्रतीक्षा करावी लागणार नाही. E pos Macine in ration Shops

डिजिटल कंपन्यांसबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करार

भारत सराकारच्या या योजनेनुसार ग्राहकांना झटपट रेशन धान्य मिळावे म्हणून रास्तभाव दुकानांमध्ये 2जी/3जी ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या होत्या. परंतु या सेवा देणाऱ्या संस्थांचा कालावधी संपुष्टात आल्याने रास्तभावाने धान्य देणाऱ्या शासकीय  दुकानांमध्ये नविन ई-पॉस मशिन बसविण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार आलेल्या निविदांमधून योग्य मोलभाव करुनच E pos Macine ची निवड करण्यात आली आहे.  E pos Macine in ration Shops

रेशन पुरवठा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता निर्माण झाली

भारत सरकारमार्फत रास्तभाव दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नविन ई-पॉस मशिन 4जी व आयरीस स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. काही नागरिकांचे आधारकार्ड वरील फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास त्यांची आधार पडताळणी  करणे अडचणीची ठरते. या नागरिकांची आधार कार्ड नुसार पडताळणी करताना आता रेशन ऑफिसवरील E pos Macine मदतशीर ठरणार असल्याचे दिसून येत आहे.  कारण शिधापत्रिकेमध्ये आधार संलग्न पात्र असलेली पण फिंगरप्रिंट देता येत नसलेल्या व्यक्तींना IRIS स्कॅनर वापरून पडताळणी करता येणार आहे. इतकेच नाही तर आधार संलग्न हाताचे ठसे येण्यास अडचण असल्यास डोळ्यांचे स्कॅन देखील केले जाणार आहे. सदर प्रक्रियेमुळे रेशन धान्य वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होत आहे, आणि या सर्व सुविधा नागरिकांच्या सोयीसाठी केल्या जात आहेत. E pos Macine in ration Shops

Leave a Comment