भारतीय रेल्वे अंतर्गत येणाऱ्या मध्ये रेल्वे विभागामार्फत भरती जाहिर करण्यात आली आहे. तब्बल 2424 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पदभरतीमध्ये आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा.
मध्यरेल्वे अंतर्गत येणाऱ्या विभागानुसार जागांची संख्या खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- मुंबई – 1594
- भुसावळ – 418
- पुणे – 192
- नागपुर – 144
- सोलापुर – 76
आवश्यक शैक्षणिक पात्रता
भारतीय रेल्वे अंतर्गत येणाऱ्या मध्ये रेल्वे विभागामार्फत भरती जाहिर करण्यात आली आहे. जाहिरातीत दिल्याप्रमाणे उमेदवार 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ट्रेड मध्ये NCVT / ITI डिप्लोमा प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
आवश्यक वयोमर्यादा
भारतीय रेल्वे अंतर्गत येणाऱ्या मध्ये रेल्वे विभागामार्फत भरती जाहिर करण्यात आली आहे. या पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 15 जुलै 2024 रोजी किमान वय 15 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असावे असे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 5 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात आली आहे. Central Railway maraharashtra rision Mahabharati
येथे करा अर्ज
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rrccr.com/tradeapp/login या संकेतस्थळावर दिनांक 15 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / आ.दु.घ / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही. Central Railway maraharashtra rision Mahabharati
मध्य रेल्वे संदर्भातील माहिती
भारतीय रेल्वे अंतर्गत येणाऱ्या मध्य रेल्वे विभागांतर्गत पदभरती जाहीर झाली आहे. शासकीय परीक्षांची तयारी करण्यासाठी संबंधित विभागाची माहिती जाणून घेणे देखील अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणून आम्ही मध्य रेल्वे संदर्भात अधिक माहिती घेऊन आलो आहोत.
भारतीय रेल्वेतील मध्य रेल्वे हा विभाग एक महत्त्वाचा विभाग आहे. मध्य रेल्वेचे मुख्य कार्यालय मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे. भारतामधील पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे दरम्यान 16 एप्रिल 1853 रोजी मध्य रेल्वेमार्गावरून धावली. महाराष्ट्रातील बहुतांशी, ईशान्य कर्नाटकातील काही व दक्षिण मध्य प्रदेशमधील काही रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतात ते पुढील प्रमाणे.
मध्यरेल्वे अंतर्गत येणारे विभाग जाणून घेऊ
मुंबई उपविभाग
मुंबई छशिमट – दादर – कुर्ला
मुंबई छशिमट – वडाळा रोड – कुर्ला (हार्बर मार्ग)
कुर्ला – वाशी – नेरूळ – बेलापूर – पनवेल
दिवा जंक्शन – पनवेल – रोहा
दिवा जंक्शन – वसई रोड
कल्याण जंक्शन – कसारा – इगतपुरी
कल्याण जंक्शन – नेरळ जंक्शन – कर्जत – लोणावळा
नेरळ जंक्शन – माथेरान
कर्जत – पनवेल
कर्जत – खोपोली
पुणे उपविभाग
लोणावळा – पुणे – दौंड
दौंड – बारामती
मिरज – पंढरपूर
सोलापूर उपविभाग
मनमाड – अहमदनगर – दौंड
दौंड – कुर्डुवाडी – सोलापूर
कुर्डुवाडी – पंढरपूर
कुर्डुवाडी – लातूर – लातूर रोड
सोलापूर – होटगी – गुलबर्गा – वाडी
भुसावळ उपविभाग
चाळीसगाव – धुळे
पाचोरा – जामनेर (नॅरो गेज)
भुसावळ – बऱ्हाणपूर – खंडवा
भुसावळ – जळंब – अकोला – मुर्तिजापूर – बडनेरा
जळंब – खामगाव
बडनेरा – अमरावती
मुर्तिजापूर – यवतमाळ (नॅरो गेज)
मुर्तिजापूर – अचलपूर (नॅरो गेज)
नागपूर उपविभाग
बडनेरा – पुलगाव – वर्धा – नागपूर
वर्धा – माजरी – ताडळी – चंद्रपूर – बल्लारशा
नागपूर – आमला – इटारसी