MPSC EXAM 2024 | MPSC च्या माध्यमातून मेगा भरती; तब्बल १८१३ पदांसाठी संयुक्त परीक्षेची घोषणा

MPSC EXAM 2024  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १८१३ विविध पदांसाठी ही भरती होत आहे. ही जाहिरात निघण्यासाठी स्पर्धा परिक्षार्थी खुप आतुरतेने वाट पाहत असतात. मराठा आरक्षणामुळे जाहिरातीत बदल करायचा होता त्यामुळे या पदांची भरती निघण्यासाठी विलंब झाल्याचे आयोगाकडुन स्पष्ट करण्यात आले. आचारसंहिता लागु होण्यापुर्वी सरकारने हा निर्णय घेतल्याने विद्यार्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोणत्या पदांसाठी किती जागा उपलब्ध आहे यांची आपण सविस्तर माहिती या लेखात घेणार आहोत. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ आहे. याची पुर्व परिक्षा २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. MPSC EXAM 2024

 

विविध पदांची नावे व भरतीप्रक्रिया-

2024  मध्ये मागिल नऊ महिन्यापासून लोकसेवा आयोगाद्वारे प्रलंबित असणारी गट – ब पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये विविध पदांच्या एकूण ४८० पदांच्या जागा रिक्त आहेत. MPSC EXAM 2024  

  • सहाय्यक कक्ष अधिकारी ५५  पदे.
  • राज्य कर निरीक्षक- ४०९  पदे
  • पोलीस उपनिरीक्षक – २१६ पदे
    अशा एकूण ४८०  रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एमपीएससी द्वारे गट क पदांची जाहिरात प्रसिद्ध MPSC EXAM 2024  

महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधून 1333 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

  • उद्योग निरीक्षक – २९ पदे
  • कर सहायक – ४८२ पदे
  • तांत्रिक सहायक – ९ पदे
  • लिपिक – १७ पदे
  • लिपिक-टंकलेख -७८६  पदे
    अशा एकूण – १३३३ रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.
    MPSC EXAM 2024  

अर्ज शुल्क-

  • अमागास वर्गासाठी केवळ ५४४ रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे.
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी केवळ  ३४४ रुपये  परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे.
  • माजी सैनिक उमेदवारांसाठी ४४ रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. 
  • अधिक माहितीसाठी वेबसाईट mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट दया. MPSC EXAM 2024  

अर्ज प्रक्रिया-

  • नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अदयावत करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
  • दिलेल्या कालावधीत तसेच योग्य पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करावा.
  • परिक्षा शुल्काचा भरणा सांगितल्याप्रमाणे भरावा

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी.

https://mpsc.gov.in/adv_notification/8https://mpsc.gov.in/267a96aa-a8be-40ad-ae561f95ead32

आचारसंहित जाहिर होण्याआधी परीक्षेची जाहीरात यावी अशी विद्यार्थ्यांची होती मागणी

दरवर्षी राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा ‘एमपीएससी’च्या वतीने घेतली जाते. संयुक्त परीक्षेसाठी मागील वर्षी  ७००० पेक्षांही अधिक जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यासंदर्भातील परीक्षा एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आली होती. यावर्षीही जवळपास ८००० पेक्षा जास्त जागांसाठी जाहिरात येईल या अपेक्षेने राज्याच्या मुंबई, पुणे, नागपुर सारख्या मोठ्या शहरांमध्ये राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. कारण त्यात त्यंची वर्षे देखील निघून जात आहेत आणि परीक्षांची तयारी करण्यासाठी त्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. म्हणूनच विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी  लोकसेवा परीक्षांची जाहिरात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांची होती. म्हणून शासनाने लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेत रुजु होणाऱ्या गट ब आणि गट क विभागातील तब्बल १८१३  पदांची जाहीरात काढली आहे. विभाजन करता गट – ब साठी ४८० रिक्त पदांसाठी तर गट-क साठी १३३३ रिक्त पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. MPSC EXAM 2024  

कधीपासून कधीपर्यंत अर्ज करता येणार आहे?

लोकसेवा आयोगामार्फत जाहीर करण्यात आलेल्या या भरतीसाठी इच्छूक अर्जदारांना 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज दाखल केलेल्या अर्जदारांची परीक्षा 2 फेब्रूवारी 2025 रोजी होणार आहे असे देखील लोकसेवा आयोगामार्फत जाहीर करण्यात आले आहे. MPSC EXAM 2024  

Leave a Comment