Bank of Baroda LBO Recruitment 2025: पदवीधर विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, या बँकेत भरल्या जाणार एकूण 2500 जागा!

Bank of Baroda LBO Recruitment 2025: आपल्या देशात तरुणांमध्ये बँकिंग क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी एक वेगळंच आकर्षण आहे. कारण बँकेची नोकरी म्हणजे फक्त पगार नाही, तर प्रतिष्ठा, सुरक्षितता आणि भविष्यातील स्थैर्य याचं एक खात्रीशीर पॅकेजच असतं. अनेक विद्यार्थी आणि पदवीधर तरुण वर्षानुवर्षे अशा संधीची वाट पाहत असतात, जी केवळ एक नोकरीच नसते, तर ती असते एक ओळख, ज्यामुळे त्यांना एक स्थिर जीवन मिळण्यास मदत होते. आता याच पार्श्वभूमीवर, भारतातील प्रमुख राष्ट्रीयकृत बँक ‘बँक ऑफ बडोदा’ने तब्बल 2500 लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

या भरतीमुळे हजारो पदवीधर उमेदवारांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे ही भरती केवळ पदवीधरांसाठीच आहे असं नाही, तर तुमच्याकडे जर बँकिंग क्षेत्रातील थोडाफार अनुभव असेल, मग तर ही संधी तुमच्यासाठी आणखीनच सोपी होणार आहे. चला तर मग, आता आपण या संधीबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भरतीबाबतची प्राथमिक माहिती

  • भरती करणारी संस्था: बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
  • पदाचे नाव: लोकल बँक ऑफिसर
  • एकूण पदसंख्या: 2500
  • अर्ज प्रक्रिया कालावधी: 4 जुलै 2025 ते 24 जुलै 2025
  • अर्ज पोर्टल: bankofbaroda.in

शैक्षणिक पात्रता | Eligibility Criteria, LBO

  • उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
  • या भरती अंतर्गत इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (IDD), सोबतच चार्टर्ड अकाउंटंट, तसेच कॉस्ट अकाउंटंट, आणि इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय क्षेत्रामधील व्यावसायिक पात्रता असणारे उमेदवार सुद्धा पात्र ठरणार आहेत.
  • उमेदवारांकडे किमान एक वर्षाचा अनुभव (जो कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी पदावर असू शकतो) असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • उमेदवाराचं वय या भरती साठी 1 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचं ठरणारं आहे.
  • केंद्र शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत SC, ST, OBC, महिला, दिव्यांग उमेदवार यांना सवलत देण्यात येणार आहे.

अर्ज फी | Application Fee

  • सामान्य, EWS, OBC प्रवर्ग: या वर्गासाठी अर्ज फी ही ₹850/- इतकी असणार आहे
  • तर SC, ST, PwD, माजी सैनिक आणि महिला उमेदवार: यांच्यासाठी अर्ज फी ₹175/- असणार आहे.
  • कृपया लक्षात घ्या, अर्ज फी ही फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जाईल.

अर्ज कसा करावा? | Apply online for Local Bank Officer

  • या भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास सगळ्यात आधी या बँकेच्या अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in ला भेट द्या.
  • त्यानंतर ‘BOB LBO Recruitment 2025’ लिंकवर क्लिक करा.
  • लिंक ओपन झाल्यावर त्या ठिकाणी तुमची नोंदणी करा आणि लॉगिन करून अर्ज फॉर्म पूर्ण भरा.
  • सोबतच आवश्यक असलेली सर्व कागदपत्रं सुद्धा अपलोड करा.
  • अर्ज फी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीनेच भरावी लागणार आहे.
  • शेवटी भरलेला अर्ज तपासून सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा.

अधिकृत नोटिफिकेशन

https://www.bankofbaroda.in/-/media/Project/BOB/CountryWebsites/India/Career/2025/25-07/Advertisement-30-31.pdf

अर्ज करण्यासाठी लिंक

https://www.bankofbaroda.in

ही भरती का महत्त्वाची आहे?

बँक ऑफ बडोदा ही देशातील अत्यंत मोठ्या प्रमाणावर सेवा देणारी सरकारी बँक आहे. यात LBO या पदावर रुजू होणं म्हणजे केवळ सरकारी नोकरी मिळवणं नाही, तर एक जबाबदारीची भूमिका निभावणं असणार आहे. या अंतर्गत तुम्ही प्रत्यक्ष ग्राहकांशी व्यवहार करणार आहात, वित्तीय निर्णयांमध्ये भाग घेणार आहात, आणि बँकेच्या विस्तारामध्ये सुध्दा तुमचं योगदान देणार आहात.

तसेच या पदावरून पुढे अधिकाऱ्याच्या पदोन्नतीच्या संधी देखील भरपूर आहेत. या भरतीतून निवड झाल्यानंतर, उमेदवारांना उत्कृष्ट ट्रेनिंग, फायदे, आणि वेतनश्रेणी देण्यात येते. पण एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवा की 24 जुलै 2025 पर्यंतच या भरतीसाठी अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे वेळ न घालवता, तुमचे कागदपत्र तयार ठेवा आणि लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा.