Ladki Bahin Yojana E-KYC Status: लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला मिळणार मुदत वाढ, लाभार्थी महिलांना मोठा दिलासा! जाणून घ्या संपूर्ण अपडेट

Ladki Bahin Yojana E-KYC Status: महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुका होण्याआधी सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखों महिलांसाठी दिलासा आणि आत्मविश्वासाची नवी शिदोरीच ठरली आहे. घरातील रोजच्या खर्चासाठी, औषधांसाठी, मुलांच्या फी किंवा छोट्या-मोठ्या गरजांसाठी या योजनेतून मिळणारे महिन्याचे ₹1500 हे महिलांसाठी खूप मोठा आधार बनले आहे. पण, योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्या सोबतच काही ठिकाणी यामधे बोगस लाभार्थ्यांची नावेही जोडली गेली, आणि काहींनी चुकीने किंवा हेतुपुरस्सर या योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे. आता हे लक्षात आल्यानंतर सरकारने संपूर्ण योजना पारदर्शक करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली. मात्र इथूनच महिलांसाठी अनेक अडचणी सुरू झाल्या आहेत.

2.40 कोटी लाभार्थ्यांमधून ई-केवायसी सुरु झाल्यापासून अनेक महिलांना OTP मिळण्यात त्रुटी, आधार लिंक न होणे, सर्व्हर डाऊन होणे अशा तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा महिला ई-केवायसीसाठी तासन्तास सायबर कॅफेमध्ये थांबत राहिल्या. या सर्व अडथळ्यांमुळे (Ladki Bahin Yojana Latest Update) आजवर केवळ 80 लाख महिलांचेच ई-केवायसी पूर्ण झाले, म्हणजेच अजूनही मोठ्या संख्येने महिलांचे KYC बाकीच आहे आणि त्यामुळेच सरकारपुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.

तत्कालीन परिस्थिती बघून मुदत वाढवण्याबद्दल निर्णय होणार

दरम्यान, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक लाभार्थींची प्रक्रिया होण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवण्यात आली आहे आणि दिवसाला 10 लाखांपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, 18 नोव्हेंबरपर्यंत शक्य तितक्या महिलांची ई-केवायसी पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील. मात्र त्या वेळेपर्यंत काही महिलांचे ई-केवायसी बाकी राहिल्यास परिस्थितीचा आढावा घेऊन मुदत वाढवण्याचा (E-KYC Problem Solution) निर्णय घेतला जाईल, म्हणजेच यानुसार महिलांसाठी दिलासादायक निर्णय होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे.

ई-केवायसी (CM Majhi Ladki Bahin Yojana News) दरम्यान विशेषतः विधवा, घटस्फोटित किंवा ज्यांच्या पती-वडील हयात नाहीत अशा महिलांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचल्या आहेत. या महिलांच्या कागदपत्र पडताळणीसाठी स्वतंत्र उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे आणि लवकरच यावर स्पष्ट मार्गदर्शन जाहीर करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

6 लाख लाभार्थ्यांचे हप्ते दिले गेले नाहीत

सोबतच योजनेत काही गैरप्रकारही समोर आले आहेत. 26 लाख लाभार्थ्यांचा हप्ता संशयामुळे थांबवण्यात आला होता, त्यापैकी 20 लाख लाभार्थ्यांची ओळख निश्चित झाल्यानंतर त्यांना त्यांचा हप्ता पुन्हा मिळू लागला. मात्र 6 लाख लाभार्थ्यांची ओळख अद्यापही स्पष्ट न झाल्यामुळे, त्यांचे पैसे अजूनही थांबलेलेच आहेत. याशिवाय आश्चर्याची बाब म्हणजे 7000 सरकारी (Government Scheme For Women Maharashtra) महिला कर्मचारी आणि 12000 पुरुष लाभार्थ्यात सापडले असून त्यांच्याकडून या योजनेचे पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

एकूणच बघता, ही योजना थांबलेली नाही, योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते थांबलेले नाही. पण पारदर्शकतेसाठी सरकारी यंत्रणा अधिकच सावधगिरी बाळगत असल्याचं बघायला मिळत आहे. लाखो घरांमध्ये या योजनेमुळे (Maharashtra Women Scheme) मिळणारा आधार, याची सरकारलाही जाणीव आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत ई-केवायसीची मुदत वाढण्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची दाट शक्यता आहे आणि यामुळे अनेक महिलांच्या चेहऱ्यावर परत आशेचा किरण दिसू शकतो.