Property Card Online: डिजिटल सही असलेलं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन काढणं झालं सोपं! करा फक्त इतकंच…

Property Card Online: नमस्कार मित्रांनो, प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक असतं. महाराष्ट्र सरकारने आता डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून दिले असल्याने, त्यामुळे आता प्रॉपर्टी कार्ड (Swamitva Property Card Maharashtra) मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची किंवा रांगेत उभे राहण्याची गरज उरलेली नाही. आपण हे प्रॉपर्टी कार्ड घरबसल्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून सहज डाउनलोड करू शकता.

जसे आपल्या सातबारा उताऱ्यावर शेतजमिनीची सर्व माहिती मिळते, तसेच बिगर शेतजमीनीची माहिती प्रॉपर्टी कार्डमध्ये नमूद केलेली असते. सरकारच्या स्वामित्व योजना अंतर्गत प्रत्येक व्यक्तीच्या (Property Card Online Maharashtra) नावावर असलेल्या घर, प्लॉट किंवा इमारतींची माहिती या प्रॉपर्टी कार्डमध्ये दाखवली जाते. या पत्रकात त्या व्यक्तीच्या नावावर असलेले घर, बंगला, दुकान, व्यावसायिक इमारत किंवा इतर कोणतीही स्थावर मालमत्ता यांची नोंद स्पष्टरीत्या केलेली असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रॉपर्टी कार्ड डिजिटल स्वाक्षरीत (Digitally Signed Property Card) असल्यामुळे त्यावर शिक्का किंवा प्रत्यक्ष सहीची आवश्यकता नसते, तसेच ते कोणत्याही सरकारी कामासाठी अधिकृतरीत्या मान्य सुद्धा असते.

डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे काढायचे?

स्टेप 1: सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर इंटरनेट सुरू करून bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्या. ही महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट आहे. वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या बाजूस तुम्हाला Digital Signed 7/12 हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 2: यानंतर तुम्हाला लॉगिन करण्यासाठी एक पेज दिसेल. जर तुम्ही यापूर्वी सातबारा काढण्यासाठी खाते तयार केले असेल, तर तुमचे आधीचे Username आणि Password वापरून लॉगिन करा. जर पासवर्ड विसरला असेल किंवा आठवत नसेल, तर तुम्ही मोबाईल नंबरच्या मदतीने देखील लॉगिन करू शकता. यासाठी OTP Based Login या पर्यायावर क्लिक करा. दिलेल्या जागेत तुमचा मोबाईल नंबर टाका, Send OTP वर क्लिक करा, मोबाईलवर आलेला OTP टाका आणि Verify OTP वर क्लिक करा.

स्टेप 3: आता तुमचं लॉगिन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर मेनू दिसेल. या मेनूमधून Digitally Signed Property Card या पर्यायावर क्लिक करा. जर तुम्ही मोबाईलवरून हे करत असाल आणि मेनू दिसत नसेल, तर डाव्या बाजूला असलेल्या तीन रेषांच्या (Menu) चिन्हावर क्लिक करा किंवा ब्राउझरचा Desktop Mode सुरू करा.

स्टेप 4: या पेजवर तुम्हाला पुढील माहिती क्रमाने निवडावी लागेल जसे की, तुमचा विभाग, जिल्हा, भूमिअभिलेख, कार्यालय, गाव, CTC (City Survey) नंबर. आता ही माहिती भरल्यानंतर स्क्रीनवर प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी किती शुल्क लागणार आहे हे स्पष्ट दाखवले जाईल. ही रक्कम पाहून OK वर क्लिक करा.

प्रॉपर्टी कार्डसाठी लागणारे (Property Card Fees Maharashtra) शुल्क

  • महानगरपालिका क्षेत्रासाठी: ₹135 रूपये
  • नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रासाठी: ₹90 रुपये
  • ग्रामीण भागासाठी: ₹45 रुपये

ही रक्कम तुम्हाला तुमच्या खात्यातील Wallet मध्ये भरावी लागेल.

स्टेप 5: त्यानंतर आता Recharge Account या पर्यायावर क्लिक करा. यानंतर Make Payment वर क्लिक करून सांगितलेली रक्कम भरा. कृपया लक्षात ठेवा की जितकी रक्कम दाखवली आहे तितकीच रक्कम भरा, जास्त पैसे टाकल्यास ती रक्कम वॉलेटमध्ये अडकून राहते.

स्टेप 6: रक्कम भरल्यानंतर पेमेंटची माहिती तपासून Confirm बटणावर क्लिक करा.

स्टेप 7: पेमेंट करण्यासाठी तुम्ही खालील पद्धती वापरू शकता:

  • डेबिट कार्ड
  • क्रेडिट कार्ड
  • नेट बँकिंग
  • BHIM UPI

स्टेप 8: पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये रक्कम जमा झाल्याचा मेसेज दिसेल. आता Continue या बटणावर क्लिक करा.

स्टेप 9: आता पुन्हा एकदा पुढील माहिती भरा जसे की, विभाग जिल्हा, भूमिअभिलेख (Maharashtra Bhulekh Property Card) कार्यालय, गाव, CTC नंबर. जर तुमच्या वॉलेटमध्ये पुरेशी रक्कम असेल, तर तुम्हाला खाली Download बटण दिसेल. जर रक्कम अपुरी असेल, तर पुन्हा Recharge Account वर क्लिक करून आवश्यक रक्कम तुम्हाला भरावी लागेल.

स्टेप 10: शेवटी Download बटणावर क्लिक करा. तुमचे डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड तुमच्या मोबाइल / लॅपटॉपवर डाउनलोड (Property Card Download Online) होईल. तुम्ही ते कधीही आणि कुठेही वापरू शकता.

प्रॉपर्टी कार्ड कसे वाचायचे?

  • या कार्डावर सर्वात वर गाव, तालुका आणि जिल्हा यांची माहिती दिलेली असते.
  • त्याखाली सिटी सर्व्हे / CTC नंबर आणि जागेचे क्षेत्रफळ नमूद केलेले असते.
  • त्यानंतर त्या जागेचा मालक कोण आहे याची माहिती स्पष्ट लिहिलेली असते.
  • सर्वात खाली एका महत्त्वाच्या सूचनेत लिहिलेले असते की, “ही मिळकत पत्रिका डिजिटल स्वाक्षरीत असल्याने, त्यावर कोणत्याही शिक्का किंवा सहीची गरज नाही.”

मित्रांनो, इतक्या सोप्या पद्धतीने आपण घरबसल्या मोबाईलवरून डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकतो.