
Duplicate voter id online apply: मतदार ओळखपत्र (Voter ID Card) हा केवळ मतदान करण्यासाठीचा एक दस्तऐवज नसून आपल्या नागरिकत्वाचा आणि ओळखीचा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. बँक खाते उघडणे असो, सरकारी योजना घेण्यासाठी अर्ज करणे असो, पत्ता किंवा ओळख सिद्ध करायची असो, या कार्डची गरज अनेक ठिकाणी भासतेच भासते. पण कधी कधी हे कार्ड हरवणे, चोरी जाणे किंवा खराब होणे अशा घटना घडतात.
अशावेळी मनात प्रश्न निर्माण होतो की आता पुढे काय?, मात्र यामधे काळजी करण्यासारखं काहीच नाही. भारतीय निवडणूक आयोगाने आता मतदार ओळखपत्राची डुप्लिकेट (digital voter card download) कॉपी मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली आहे आणि ती अगदी सोपी आहे.
डुप्लिकेट मतदार ओळखपत्र ऑनलाइन (how to get new voter card) कसे मिळवावे?
मतदार ओळखपत्रासाठी पुनः अर्ज करण्यासाठी तुम्हाला भारतीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट वापरावी लागेल. ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि घरबसल्या करता येणारी आहे.
खाली दिल्याप्रमाणे ऑनलाइन प्रक्रिया फॉलो करा:
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून National Voter Service Portal (NVSP) किंवा https://voters.eci.gov.in/ या वेबसाइटवर जा.
- त्यानंतर “Online Services” किंवा “Online Application for Voter Services” या पर्यायावर क्लिक करा.
- आता तिथे तुम्हाला Duplicate Voter ID Card / Replacement of EPIC हा पर्याय दिसेल. याठिकाणी आता तुमचे राज्य निवडा आणि पुढे जा.
- आता याठिकाणी तुम्हाला तुमचा Voter ID Number (EPIC/VID नंबर) टाकावा लागेल. आणि हा नंबर तुम्हाला तुमच्या जुन्या कार्डवर दिलेला असतो.
- त्यानंतर Aadhaar Number आणि Mobile Number टाका. लक्षात घ्या तुमचा Mobile number active असावा.
- आता तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो अचूक एंटर करा.
- यानंतर आता तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता इत्यादी तपासा आणि आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करा.
- यापुढे आवश्यक कागदपत्रे (स्कॅन केलेले) अपलोड करा आणि शेवटी अर्ज सबमिट करा.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी
- पासपोर्ट आकाराचा नवीन आणि स्पष्ट फोटो
- ओळख पुरावा (Aadhaar, PAN Card, Driving License या पैकी कोणताही एक)
- पत्ता पुरावा (वीज बिल, बँक स्टेटमेंट, टेलिफोन बिल किंवा रेशन कार्ड)
- जर कार्ड हरवले/चोरीला गेले असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या FIR ची कॉपी
अर्जाचे स्टेटस कसे तपासाल?
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचे स्टेटस (nvsp portal voter id) तपासण्यासाठी पुन्हा ECI / NVSP वेबसाइट वर जा आणि Track Application Status वर क्लिक करा. यापुढे तुमचा Reference Number / Application Number एंटर केल्यावर तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे हे कळेल.
कधी मिळेल नवीन डुप्लिकेट मतदार ओळखपत्र?
अर्ज योग्यरित्या सबमिट केल्यानंतर तुमचे नवीन Voter ID साधारण 15 ते 20 दिवसांच्या आत पोस्टाने किंवा डिजिटल स्वरूपात (e-EPIC PDF format) उपलब्ध होते. विशेष म्हणजे या प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही. म्हणजेच Duplicate Voter ID Card मिळवणे पूर्णपणे मोफत आहे.
महत्त्वाची सूचना
- कार्ड हरवले असेल तर ताबडतोब FIR करा कारण हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
- अर्जातील सर्व माहिती नीट आणि अचूक भरा.
- फोटो आणि कागदपत्रे अपलोड करताना त्यांची स्पष्टता तपासा.
- मोबाईल नंबर active असावा, कारण OTP पडताळणी होणं अत्यंत महत्वाचं आहे.
घरबसल्या voter card मिळवण्याची ही प्रक्रिया आता सोप्या, सुरक्षित आणि सर्वांसाठी उपलब्ध ऑनलाइन स्वरूपात आली आहे. त्यामुळे आता वेळ, रांगा आणि सरकारी कार्यालयांमधे धावपळ करण्याची गरज राहिलेली नाही. तुमचे मतदार ओळखपत्र हरवले असेल तर काळजी करू नका, वरील स्टेप्सने फक्त काही मिनिटांत तुमचा डुप्लिकेट Voter ID तुमच्या हातात येऊ शकतो.