
Agriculture Disputes ग्रामिण भागातील जमिनीचे कौटुंबिक वाद काही आपल्याला नवीन नाहीत, त्यामुळे कायद्यात देखील अशा गोष्टींसाठी किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतील हक्क वाटवाटपासंबंधी कायदे करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे बरेचदा काही कायदे सामंजस्याने करण्यात येतात तर काही कायदे कौटुंबिक विचारसणीचा विचार करुन घेण्यात येतात. त्यासंबंधी आज आपण अधिक माहिती मिळविणार आहोत. Agriculture Disputes
जमीन मोजणी करा ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवरुन,
बरेचदा शेतकरी बांधवांमध्ये शेतजमीनीच्या किंवा बिगरशेतजमीनीच्या वाद होत असतात. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जेवढी जमीन दिसत आहे तेवढीच जमीन आहे की नाही हे तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता. तंत्रज्ञानाच्या या सुविधेमुळे आता तुम्ही घर बसल्या तुमची जमीन मोजू शकता. त्यासाठी मात्र तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Hallo Krushi हे ऍप डाऊनलोड करुन घ्यावे लागेल. या ऍपच्या मदतीने तुम्ही तुमच्या जमिनीचा सातबारा बघू शकता अगदी काही सेकंदातच. त्यासाठी तुम्हाला तुमचा तालुका, गावाचे नाव आणि गट क्रमांक या गोष्टी भराव्या लागतील. आणि तुम्ही तुमच्या जमिनीचा सातबारा ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकाल. Agriculture Disputes
शेतजमिनीचे वाटप कसे करतात
विविध गावात कौटुंबिक सामंजस्याने शेतजमिनीचे वाटप होताना दिसते आणि ज्याठिकाणी असे होत नाही तेथे मात्र ग्रामपंचायतीच्या मदतीने हे निर्णय घेतले जातात. बरेचदा सरपंच देखील काही कौटुंबिक विषयांमध्ये हस्तक्षेप करु शकत नाहीत त्यामुळे असे वाद न्यायालयात जातात तेव्हा मात्र शेतजमीनच्या कायद्यानुसार हस्से वाटप केले जाते. या वाटपामध्ये हिस्से झाल्यानंतर कायद्यानुसार लहान भाऊच पहिला वाटा घेतो. शेतजमीन आणि वडिलोपार्जित संपत्ती वाटपाचे काही पर्याय नियमानुसार घालून दिलेले आहेत. ते पुढील प्रमाणे Agriculture Disputes
- वडील/ कर्त्या पुरुषाने स्वतःहून त्यांच्या मुलांमध्ये मालमत्तेचे केलेले वाटप.
- दुय्यम निबंधकासमोर लेखी दस्त नोंदवून केलेले वाटप.
- हिश्श्यासंबंधी वाद असल्यामुळे दिवाणी प्रक्रिया संहिंत 1908, कलम 54 अन्वये दिवाणी न्यायालयानुसार करण्यात आलेले वाटप.
- महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966, कलम 85 अन्वये तहसिलदारसमोर झालेले वाटप.
- फक्त सातबाराच्या आणेवारी लागली किंवा हिस्सेवारी लावली म्हणून मिळकतीचे वाटप झाले कायदा मानत नाही.
- एकत्र कुटुंबातील चुली वेगळ्या आहेत म्हणजे वाटप झाले असे मानता येत नाही.
- दाव्यातील मिळकती वादीचे ताब्यात नसतील तर त्याल दरम्यानचे उत्पन्न मागण्याचा हक्क असतो.
- सहमालकास विरुद्ध कब्जाने मालकी मिळत नाही.
- एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे मृत्युपत्र केले असल्यास फक्त मयत व्यक्तीच्या हिश्श्यांपुरतेच ते मृत्युपत्र लागु पडते. Agriculture Disputes
वडिलोपार्जित घराचे वाटप कसे करतात
वडिलोपार्जिंत घराचे वाटप हा अनेकदा वादाचा विषय बनलेला आहे. ग्रामिण तसेच शहरी भागात देखील कुटुंबातील भाऊ आणि बहिणींमध्ये हा विषय सामंजस्याने सुटत असेल तर ठिक आहे नाहीतर कायद्यामार्फत वाटप करायचे झाल्यास घराच्या वाटपातील कुटुंबातील लहान भावाला पहिला हिस्सा दिला जातो. कारण हाच नियम आहे. कायद्यानुसार अशीच तरतूद करण्यात आलेली आहे. कायद्यात असे नमूद करण्यात आले आहे की, मोठ्या भावाने किंवा बहिणीने सामंसज्याने घेऊन घरगुती विषयात लहान भावाला पहिला हिस्सा देण्यात यावा. Agriculture Disputes
संपत्ती वाटपाबाबात कायद्यातील तरतूदी
आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेत संपत्ती वाटपाबद्दल काही निर्णय घेण्यात आलेले आहेत हे निर्णय ग्रामपंचायच आणि ग्रामिण विचारसरणीला धरुनच घेण्यात आलेले आहेत. वडिलोपार्जिंत जमीन असो किंवा संपत्ती, मालमत्ता, घर असो त्यामध्ये सर्वानुमते भाऊ आणि बहिणींना मालमत्तेचे समान वाटप करण्यात आले आहे. तसेच जमीन वाटप करताना झालेल्या हिस्स्यांमधून पहिला हिस्सा लहान भावाला देण्यात यावा अशी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या भागांमध्ये जमीनीच्या वाटपाबद्दल काही अलिखित नियम मान्य करण्यात आलेले आहेत की, घरातील मोठ्या भावाला शेतजमिनीची उजवी बाजू देण्यात यावी असे नियम करण्यात आले आहेत. परंतु या गोष्टी कायद्यानुसार करण्यात आलेल्या नाहीत. अशा बाबतीत काही वाद उद्भवल्यास कायद्यानुसार काही करता येत नाही. Agriculture Disputes