DMER Recruitment 2025: महाराष्ट्र सरकारकडून तब्बल 1107 पदांची सरळसेवा भरती सुरू, या तारखेआधी करावा लागणार अर्ज!

DMER Recruitment 2025: महाराष्ट्रातील हजारो तरुण ज्यावेळी एका बाजूला सरकारी नोकरीची संधी शोधत आहेत, त्याचवेळी दुसऱ्या बाजूला एक आनंदाची बातमी समोर येत आहे. वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष विभागामार्फत 1107 रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती स्पर्धा परीक्षा पद्धतीने घेण्यात येणार असून, अर्ज प्रक्रियेपासून ते परीक्षा स्वरूपापर्यंत संपूर्ण माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

काय आहे ही भरती?

ही भरती दोन मुख्य संवर्गांमध्ये विभागलेली आहे:

  • तांत्रिक संवर्गातील पदे: प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, ग्रंथपाल, ECG तंत्रज्ञ, क्ष-किरण सहाय्यक, समाजसेवा अधीक्षक, आहारतज्ञ, भौचिकोपचार तज्ञ अशा विविध पदांचा यामधे समावेश करण्यात आला आहे.
  • अतांत्रिक संवर्गातील पदे: उच्च व निम्न श्रेणी लघुलेखक, वाहनचालक अशा पदांचा समावेश यामधे करण्यात आला आहे.
  • एकूण पदे: 1107
  • भरतीचा प्रकार: सरळसेवा
  • विभाग: वैद्यकीय शिक्षण व संशोधन, आयुष विभाग
  • भरती परीक्षा: स्पर्धा परीक्षा पद्धतीने
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 19 जून 2025 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
  • शेवटची तारीख: 9 जुलै 2025, रात्री 11.55 वाजेपर्यंत हा अर्ज करता येणार आहे.

पात्रता आणि शैक्षणिक अटी

तांत्रिक पदांसाठी संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक असणार आहे. काही पदांसाठी महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल किंवा इतर वैद्यकीय परिषदांची नोंदणी सुध्दा आवश्यक आहे. तसेच या भरती अंतर्गत अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

उदाहरणार्थ:

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: विज्ञान शाखेतील पदवी आणि लॅब डिप्लोमा
  • ECG तंत्रज्ञ: पॅरामेडिकल कार्डियोलॉजी पदवी किंवा सायन्स पदवी + कार्डियोलॉजी डिप्लोमा
  • ग्रंथपाल: कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी + लायब्ररी सायन्स पदवी
  • अतांत्रिक पदांसाठी SSC उत्तीर्ण आणि मराठी/इंग्रजी टायपिंगसह शॉर्टहँड स्पीड देखील आवश्यक असणार आहे.

वयोमर्यादा काय आहे?

  • खुल्या प्रवर्गासाठी: 18 ते 38 वर्षे इतकी वयोमर्यादा ठरवली गेली आहे.
  • मागासवर्गीयांसाठी: वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे आहे.

इतर विशेष प्रवर्गासाठीही (माजी सैनिक, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त) शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाणार आहे.

परीक्षा पद्धती

  • तांत्रिक पदांसाठी: 100 प्रश्नांची CBT परीक्षा (मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि तांत्रिक विषय) घेण्यात येणार आहे.
  • अतांत्रिक पदांसाठी: 60 प्रश्नांची CBT + 80 गुणांची कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे.
  • परीक्षा माध्यम: परीक्षेचे मराठी व इंग्रजी हे दोन माध्यम असणार आहेत.
  • नकारात्मक गुण: नकारात्मक गुण असणार नाही.

प्रश्नपत्रिका टप्प्याटप्प्याने (Time-bound sections) असणार असून, प्रत्येक सेक्शन पुर्णकेल्यांतरच पुढचा भाग उघडेल. यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेत वाढ होणार आहे.

परीक्षा शुल्क

  • खुल्या प्रवर्गासाठी: ₹1000
  • मागासवर्गीयांसाठी: ₹900

सर्व उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की परीक्षेसाठी भरण्यात आलेले शुल्क परत मिळणार नाही.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना www.med-edu.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार असून, अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी सबमिट करणं गरजेचं असणार आहे.

आवश्यक कागदपत्र

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
  • जात प्रमाणपत्र (जर लागु असेल तर)
  • नोंदणी प्रमाणपत्र (पॅरामेडिकल/फार्मसी/डेंटल कौन्सिलसाठी)

काही महत्वाच्या सूचना

  • अर्ज एकदाच भरावा, चुकीच्या माहितीबाबत उमेदवार स्वतः जबाबदार राहील.
  • अर्ज करताना सिस्टिममध्ये वैध ईमेल आणि मोबाईल क्रमांक देण्यात आलेला असावा.
  • परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया संगणक आधारित असेल.
  • मूळ ओळखपत्राशिवाय परीक्षेस बसू दिलं जाणार नाही.
  • आरक्षणासाठी लागणारी कागदपत्रे अर्ज भरताना आणि कागदपत्र पडताळणीवेळी सादर करावी लागतील.

ही भरती केवळ नोकरी नाही, तर अनेक तरुणांच्या स्वप्नांना चालना देणारी संधी आहे. ज्यांना वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात करियर करायचे आहे, त्यांच्यासाठी ही भरती सुवर्णसंधी ठरू शकते. वेळ न दवडता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज सादर करा.

जर तुम्हाला या भरतीबाबत अधिक मार्गदर्शन किंवा इतर सरकारी योजनांबाबत माहिती हवी असेल, तर आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या.