शेतकऱ्यांना अनेकदा खाजगी बँकांकडून किंवा सावकाराकडून शेतीसाठी कर्ज घ्यावे लागते. परंतू त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतात कारण त्या कर्जावारील व्याजाचे दर खूप जास्त असतात. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खूप मोठा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी कसा आणि किती उपयोगी पडणार आहे हे आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. Farmers Loan News
आर्थिक पतधोरण समितीची बैठक
दोन महिन्यांनी रिजर्व बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होते . यावेळी ही बैठक शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी झाली यावेळी रिजर्व बँकेच्या आर्थिक पतधोरण समितीची बैठक झाल्यानंतर रिजर्व बँकेचे गव्हर्नर दास यांनी विना तारण कर्ज मर्यादा २ लाख रुपये वाढविण्यात आले असल्याची घोषणा केली. याआधी विनातारण कर्जाची मर्यादा १.६० लक्ष एवढी होती यामध्ये २०१९ पासून कोणताही बदल करण्यात आला नव्हता. आता मात्र विनातारण कर्ज २ लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे. RBI News
कोणाला होणार फायदा?
रिजर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना म्हणजेच ज्यांच्याकडे कमी शेत जमीन आहे आशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. Farmers Loan News
शासकीय निर्णयाची लिंक जरूर पहा
रिजर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयासंबंधीत शासकीय निर्णयाबद्दल अधिक माहिती मिळविण्य़ासाठी तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करु शकता. https://rbidocs.rbi.org.in/rdocs/notification/PDFs/NOT96144E24E148514F10B93A2E1CD4D649B1.PDF
शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँकेची नव्या वर्षासाठी सर्वोत्तम भेट?
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सुलभ कर्ज प्राप्त होईल, ज्यामुळे त्यांना शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत मिळू शकेल. हे कर्ज शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी कामकाजासाठी उपयोगी पडेल, आणि कर्जासाठी कोणतंही तारण आवश्यक नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला चालना मिळेल, तसेच त्यांना उत्तम शेती साधनं आणि पिकांसाठी आवश्यक संसाधनं मिळवण्यासाठी मदत होईल. खरं म्हणजे ही निर्णय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलेले नव्या वर्षाचे सर्वोत्तम गिफ्ट आहे. Farmers Loan News
शेतकरी कर्जबाजारी होणार नाही
सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांची कर्जबाजी कमी होईल आणि आर्थिक स्थिरता वाढेल. अनेक शेतकरी बांधवाना शेती संबधित खरे, बियाणे, अवजारे खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होते. त्यासाठी हे विनातारण कर्ज अत्यंत उपयोगी पडणार आहे.
बँकेच्या आर्थिक धोरणानुसार विनातारण कर्ज फक्त १ लाख ६० एवढेच असल्याने अल्प भूधारक शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय उरत नव्हता. परंतू यापुढे कोणत्याही खाजगी सावकारासाकडून किंवा खाजगी कंपन्यांकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठीते कर्ज मिळविण्याची आवश्यकता नाही. कारण रिजर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्ज मिळविणे सोपे झाले आहे. Farmers Loan News
शेतकरी कधीपासून मिळवू शकतील विनातारण कर्ज?
अल्पभूधारक शेतकरी 1 जानेवारी 2025 पासून त्यांच्या शेतीसाठी लागणारे 2 लाखापर्यंतचे कर्ज तेही विनातारण कर्ज मिळवू शकणार आहेत. शेतकऱ्यांकडे त्यासाठी जमिनीसंबंधीत कागद आणि किसान कार्ज असणे आवश्यक असेल. तसेच हे 2 लाखाचे कर्ज शेतकरी किती कालावधीपर्यंत परत करु शकणार हे देखील शेतकऱ्यांना निश्चित करणे आवश्यक आहे. तसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जिल्हा बँकांना किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या बँकांना निर्देश देणे आवश्यक आहे तसे केल्यानंतरच अल्पभूधारक शेतकऱ्यांना विनातारण कर्ज मिळू शकणार आहे. Farmers Loan News