Good Loan vs Bad Loan: तुमचं कर्ज चांगलं की वाईट? या सोप्या ट्रिक वापरुन कर्जाच्या जाळ्यातून सहज बाहेर पडा

Good Loan vs Bad Loan: आजच्या काळात कर्ज घेणं अगदी गरजेचं आणि सोयीस्कर झालं आहे. मोबाईलवर काही क्लिक मधे, एका फोन कॉलवर किंवा अॅपवर सुद्धा कर्ज मिळू लागलंय. पण ही सोय जितकी सोपी, तितकीच धोकादायकही आहे याकडे फार जणांचं लक्ष नाहीये. कारण या सहजतेमुळे अनेकजण नकळत कर्जाच्या जाळ्यात अडकतात. हप्ते, व्याज, थकबाकी, कॉल, नोटीस आणि आयुष्य आर्थिक ताणात अडकायला लागतं ते वेगळं. या सगळ्या गोंधळात एक मोठा गैरसमज कायम राहतो आणि तो म्हणजे चांगलं कर्ज कोणतं आणि वाईट कर्ज कोणतं, यामधील स्पष्ट फरकच लोकांना कळत नाही. चुकीचं कर्ज आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं, तर योग्य कर्ज तुमचं आर्थिक (How to get out of bad debt) आयुष्य बदलू शकतं. म्हणूनच या दोन गोष्टींचा फरक समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

चांगलं कर्ज म्हणजे नेमकं काय?

‘द फ्रीडम फ्रॉम बॅड डेब्ट’ या पुस्तकात चांगलं कर्ज अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. जे कर्ज तुमच्या खिशात पैसे टाकणारं, तुमच्यासाठी संपत्ती निर्माण करणारं आणि तुमचं आर्थिक आयुष्य मजबूत करणारं असेल त्याला चांगलं कर्ज म्हणतात. चांगल्या कर्जाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे हप्ते तुम्ही नाही तर तुमच्यासाठी दुसरं कुणी भरत असतं. उदा. तुम्ही गृहकर्ज घेऊन एखादं घर खरेदी केलं आणि ते भाड्याने दिलं, तर त्या भाड्यातून तुमचा EMI भरला जातो. अशा प्रकारे कर्ज असूनही तुमची संपत्ती वाढत जाते. म्हणजेच कर्ज (Monthly Budget Planning Marathi) तुमच्यासाठी काम करतं, तुम्ही कर्जासाठी काम करत नाही.

वाईट कर्ज म्हणजे आयुष्याचं सर्वात मोठं ओझं

वाईट कर्ज म्हणजे असं कर्ज ज्याची परतफेड तुम्हालाच करावी लागते. या कर्जातून तुम्हाला कोणताही आर्थिक फायदा मिळत नाही. उलट त्या हप्त्यांची किंमत कर्जापेक्षा जास्त असते. क्रेडिट कार्डचे हप्ते, वैयक्तिक कर्ज, कार लोन, फॅशन वा शौकासाठी घेतलेल्या वस्तूंचे EMI, हे सगळं वाईट कर्जाच्या श्रेणीत येतं. वाईट कर्ज म्हणजे पायात बांधलेल्या साखळी प्रमाणे आहे, तुम्ही पुढे पळायचा प्रयत्न करता, पण हे कर्ज तुम्हाला मागे खेचत राहतं. या कर्जाचं व्याज, हप्ते, नोटिसा आणि आर्थिक अस्थिरता हळूहळू मानसिक ताण वाढवत जातात आणि यामुळे तुमच्या आयुष्याचं संतुलन ढासळू लागतं.

वाईट कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा सोपा (Personal Finance Tips Marathi) पण प्रभावी मार्ग

वाईट कर्जातून सुटका करायची असेल तर पहिलं पाऊल म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणं. तुम्ही किती कर्जात आहात, कोणाकडून किती पैसे घेतले, किती हप्ते बाकी आहेत, या सगळ्याची एक स्पष्ट यादी तयार करा. यानंतर तुमच्या मासिक उत्पन्न-खर्चाची एक यादी तयार करा. जसं की घरखर्च, EMI, अनावश्यक खर्च, सगळं एकाच ठिकाणी लिहा. या प्रक्रियेमुळे (EMI Management Tips) तुमचे पैसे कुठे वाया जातात हे तुम्हाला अचूक समजून येईल आणि तुमच्यासाठी आर्थिक व्यवस्थापन करणं सोपं होईल.

वाईट कर्जातून बाहेर (How to get out of bad debt) पडण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे Snowball Method. यात सर्वात कमी रकमेचं कर्ज आधी फेडायचं आणि ते संपल्यानंतर त्या EMI ची रक्कम पुढच्या कर्जावर वळवायची. यातून हळूहळू सर्व कर्जं कमी होत जातात आणि मानसिक ताणही कमी होतो. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सबस्क्रिप्शन्स, बाहेरचं खाणं, फॅशन खर्च, ऑनलाइन शॉपिंग, या छोट्या गोष्टी मोठं कर्ज निर्माण करतात. त्यावर नियंत्रण ठेवलं की महिन्याला चांगली बचत होते.

अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग शोधणे देखील आवश्यक आहे. पार्ट-टाईम काम, फ्रीलान्सिंग, भाड्याने वस्तू देणे किंवा ऑनलाईन स्किल वापरणे, या मार्गांनी अतिरिक्त पैसे मिळू शकतात, ज्यांचा उपयोग वाईट कर्ज लवकर फेडण्यासाठी होऊ शकतो.

कर्जमुक्त झाल्यावर काय करावं?

वाईट कर्जातून (Financial Freedom Marathi) सुटका झाली की आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुढची पावलं उचलणं गरजेचं आहे. बचत, गुंतवणूक, विमा, आपत्कालीन निधी आणि passive income sources, या सगळ्या गोष्टी तुमच्या आर्थिक आयुष्याला मजबूत करतात. कर्जमुक्ती म्हणजे शेवट नव्हे, तर एक नवी सुरुवात असते हे लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. या टप्प्यावरून तुम्ही तुमचं आर्थिक आयुष्य नव्याने उभारू शकता.