Traffic Challan Check: तुमच्या गाडीवर असलेला दंड ऑनलाईन चेक करा

How to Check E Challan Status: आपण वाहन चालवतो तेव्हा वाहतुकीचे नियम पाळणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. कारण जर हे वाहतुकीचे नियम आपल्याकडून तोडले गेले तर त्याचा आपल्याला दंड भरावा लागतो आणि इतकेच नाही तर तुरुंगवास देखील भोगायला लागू शकतो. अनेकदा वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अपघात देखील होतात. या अपघातात अनेकांचा जीव जातो. यावर उपाय म्हणूनच वाहतुकीचे नियम शासनाकडून बनविण्यात आले आहे. आपण वाहन चालवताना हे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते.

याआधी ट्रॅफिक पोलिसांमार्फत हे वाहन नियम मोडल्याचे दंड चलान स्वरुपात दिले जात असे. परंतु आता या सर्व गोष्टी डिजिटल स्वरुपात होतात. आपण वाहतुकीचे नियम मोडले तर ते सिग्नल किंवा रस्त्यांवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने तपासले जाते आणि आपल्या मोबाईल नंबरवर आपल्याला ई – चलान येते, परंतु हे ई चलान तपासायचे कसे हे अनेकांना माहिती नसते. म्हणूनच आज आम्ही हा लेख घेऊन आलो आहोत.

ई-चालान म्हणजे काय?

वाहतुकीचा नियम भंग केल्यानंतर वाहन चालकाला जो दंड भरावा लागतो त्याची डिजिटल कॉपी वाहन चालकाच्या मोबाईलवर येते यालाच ई-चलान असे म्हणतात. प्रत्येक राज्याचे वाहतूक विभाग पोलिसांचे या सर्वावर नियंत्रण असते.  नागरिकांना ई-चलन भरणे सोपे व्हावे म्हणून शासनाकडून नलाईन  पेमेंट पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. तसेच एका ऍपच्या मदतीने हे ई चालान पाहताही येते आणि त्याचा दंड नागरिकांना भरता देखील येतो. How to Check E Challan Status

वाहनावर किती दंड लागला आहे ते वाहन चालकाला माहिती नसते

अनेकदा वाहन चालक घाईत असतात त्यामुळे त्यांच्याकडून सिग्नल तोडला जाणे किंवा हॅल्मेट घातलेले नसणे किंवा चारचाकी वाहनामध्ये सिटबेल्ट लावलेला नसणे या गोष्टी सहज होतात. त्यालवेळी वाहन चालकाला माहिती देखील नसते की त्याच्या नावे चालान जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे वेळोवेळी आपल्या मोबाईलमधील ई चलानचे ऍप तपासणे तितकेच महत्त्वाचे असते.  How to Check E Challan Status

तुमच्या गाडीचे इ चलन तपासा एका क्लिकवर

तुमच्या गाडीवर किती रुपयांचे चालान आहे हे तपासण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे E – Challan  हे ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे. ते पुढील प्रमाणे

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये  E – Challan app डाऊनलोड करा
  • त्यानंतर  check online services या पर्यायावर क्लिक करा. त्यापुढे तुम्हाला Check Challan Status हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला तुमच्या वाहनाचा नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकून ई-चालान एसएमएसद्वारे मिळवण्याच्या पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
  • ऍपमध्ये विचारलेली माहिती भरा आणि Get Details वर क्लिक करा
  • तुमच्या नावावर असलेल्या वाहनावर एखादा दंड लागलेला असेल तर त्याचे डिटेल्स म्हणजे फोटो  तुम्हाला याच ऍपवर मिळतील. आणि तुम्हाला हे चलान का लावण्यात आले आहे याचे देखील उत्तर तुम्हाला  मिळेल.  How to Check E Challan Status

नागरिकांना कोणकोणत्या कारणांसाठी वाहतूक चलान भरावे लागते

आपण वाहन जेव्हा रस्त्यांवर चालवतो तेव्हा वाहतुकीचे काही नियम असतात ते वाहन चालकाला पाळावे लागतात. आता आपण जाणून घेऊ की वाहन चालकाला कोणकोणत्या कारणांसाठी चलान भरावे लागू शकते.

  • रस्ते नियमांचे उल्लंघन केल्यास 1,000 रु. दंड भरावा लागतो
  • ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहनाचा अनधिकृत वापर केल्यास – 5,000 दंड भरावा लागतो
  • परवान्याशिवाय वाहन चालवणे 5,000 दंड भरावा लागतो
  • वाहन विम्याशिवाय वाहन चालवणे – 1,000 चा दंड भरावा लागतो

वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्यास – 2000 ते 4000रु. इतका दंड भरावा लागतो 

  • मद्यपान करुन वाहन चालविल्यास – 10,000 ते 15,000 रु इतका दंड भरावा लागतो.
  • दुचाकी हॅल्मेटशिवाय चालविल्यास  1000 रु इतका दंड भरावा लागतो
  • चारचाकी बेल्ट न लावता चालविल्यास 1000 ते 2000 इतका दंड भरावा लागतो.
  • सिग्नल तोडून गाडू चालविल्यास – 1000 ते 5000 इतका दंड भरावा लागतो. How to Check E Challan Status

वाहतुक नियमांसंबंधीक अधिक जाणून घ्यायचे असल्यास महाराष्ट्र शासनाच्या मोटार वाहतूक विभागाच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. तसेच https://transport.maharashtra.gov.in/1112/Offences-and-Penalties या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही वेबसाईटला भेट देऊ शकता. How to Check E Challan Status

Leave a Comment