How to check Land title: शेतजमीन विकत घेताय? कसे तपासायचे जमिनीचे टायटल? समजून घ्या!

How to check Land title

How to check Land title सध्या जमिनीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मग ती जमीन शेतजमीन असो किंवा बिगर शेतजमीन. शहरी आणि ग्रामिण दोन्ही ठिकाणी जमिन म्हणजे सोन्याच्या भावाने खरेदी विक्री केल्या जात आहेत. मग हे जमिनीचे व्यवहार करताना काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीचे टायटल कसे तपासायचे? 7/12 उतारा म्हणजे नेमकं काय? तर आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुमच्या या सर्व प्रश्नांची सविस्त माहिती घेऊन आलो आहोत.

जमिनीचे टायटल क्लिअर असणे म्हणजे काय?

बरेचदा जेव्हा आपण जमिन खरेदीसाठी जातो तेव्हे आवर्जून एक वाक्य एजंटकडून सांगण्यात येते की जमिनीचे टायटल क्लिअर आहे हा! काही काळजी करायची गरज नाही. पण मह हे जमिनीचे टायटल क्लिअरल असणे म्हणजे नेमके काय? तर त्या जमिनीसंबंधी कसलेही वादविवाद नसणे. तुम्ही जमीन खरेदी केल्या नंतर तुम्हाला पुन्हा ती जमीन विकायची असल्यास कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तुम्ही खरेदी केलेल्या जमिनीसंदर्भातील सर्व कागदपत्र म्हणजेच खरेदी खत, 7/12 उतारा आणि इतर तुमच्या नावे करता. हे सर्व कागदोपत्री व्यवहार करताना कोणतीही अडचण न येणे म्हणजे टायटल क्लिअर असणे असा त्याचा अर्थ होतो. How to check Land title

7/12 उतारा म्हणजे काय?

जमिनीचा मालक आणि जमिनीचा इतिहास समजण्यासाठी ७/१२ उतारा असतो.हा 7/12 उतारा म्हणजे शेतीचा आरसा असतो. गावाचा न.7 आणि नमुना न. 12 मिळून 7/12 उतारा बनतो. गावाचा नमुना 7 मध्ये जमिनीचा मालकी हक्क,जमीन कशी संक्रमित झाली,क्षेत्रफळ किती,इतर हक्क, आकार या सर्वाची माहिती मिळते. How to check Land title

गाव नमुना न.७ मध्ये भोगवतादर 1 म्हणजे जमीन वंशपरंपरेने मिळाली आहे. गट न. म्हणजे जमिनीचा तुकड्यांचा क्रमांक.१९९० पूर्वी त्याला सर्वे नंबर असे म्हटले जात असे. गाव हद्दीतील सर्व शेतजमिनीच्या तुकड्यांना क्रमांक दिलेला असतो. तो गट क्रमांक. असतो. जमिनीचे एकूण क्षेत्रफळ असते. ते हेक्टर आणि घुंट्यामध्ये दिलेले असते. 40 घुंटे म्हणजे 1 हेक्टर असे जमिनीचे माप असते.  

जमिनीचा मालकाचा नवावर्ती काही क्रमांक असतात व ते गोल केलेले असते.ते क्रमांक म्हणजे दयारी इतर क्रमांक. डायरी उतारावरून जमीन कशी एकच नावावरून दुसऱ्याचा नावावर झाली ते या वरून समजते. त्याखाली जमीन मालकाचे नाव असते.एखाद्या व्यक्तीचे नाव जर चौकटीत असेल तर जमिनीचा मालकाचा अधिकार त्याला मिळत नाही. तो मालक नसतो.त्याचबरोबर इतर हक्कदार कर्ज काढलेलं असेल तर बँक बोजा दाखल केलेला असतो.

गाव नमुना न.12 मध्ये. जमिनीच्या एकूण क्षत्रामध्ये कोणती पिके कोणत्या वर्षी कोणत्या व्यक्तीने घेतली या संबंधीत सर्व नोंद केलेली असते.जमीन कासणाऱ्या व्यक्तीला कुल म्हणतात.त्यामुळे गाव नमुना न.7 आणि 12 या दोन्ही ठिकाणी आपलं नाव असणे गरजेचे असते. How to check Land title

शेतजमीन की बिनशेतीची जमीन ओळखायची कशी?

बिनशेतीबाबात जिल्हाधिकारी जोपर्यंत आदेश देत नाहीत तोपर्यंत ती शेतजमीनच असते. प्रत्येक जमीनीच्या 7/12 उताऱ्यामध्ये ती जमीन शेतजमीन आहे की बिगर शेतजमीन या सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती दिलेली असते. 7/12 उताऱ्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे महसूल कर आणि पीक पेरा या गोष्टी पाहणे आवश्यक असते. महसूल कर म्हणजेच ‘आकार’ या विषयाखाली बिनशेती असा उल्लेख नसल्यास ती जमीन शेतजमीन आहे हे सिद्ध होते. कारण ती नोंदणी जिल्हाधिकाऱ्याकडूनच करण्यात आलेली असते. How to check Land title

जमिनिच्या मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

बरेचदा जमिनीवरुन दोन गटांमध्ये तर कधी कुटुंबातील दोन भावांमध्ये देखील वाद होतात. अशावेळी जमिनीवर मालकी हक्क सिदध केल्यास वाद टाळता येतात. मग जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ते आपण पुढे पाहू

  1. जमिनीचा चालू वर्षाचा 7/12उतारा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. इतकेच नाहीत मागील किमान 35 वर्षांचे संबंधीत जमिनीचे 7/12 उतारे देखील तितकेच महत्त्वाचे ठरतात.
  2. जमिनीचे खरेदी खत आणि त्या खरेदी खतावर तमचे किंवा तुमच्या वंशावळीतील व्यक्तीचे नाव असणे आवश्यत असते.
  3. जमिनीबाबातचे फेरफार नोंदीत नोंद केलेले दस्तऐवज देखील अत्यंत महत्त्वाचे असतात मालकी सिद्ध करण्यासाठी.
  4. जमिन हस्तांतरण केल्यासंबंधीच्या पावत्या, ना हरकत प्रमाणपत्र हे कागदपत्रं सुद्ध महत्त्वाचे असतात. How to check Land title

1 thought on “How to check Land title: शेतजमीन विकत घेताय? कसे तपासायचे जमिनीचे टायटल? समजून घ्या!”

  1. I loved as much as you will receive carried out right here The sketch is tasteful your authored subject matter stylish nonetheless you command get got an edginess over that you wish be delivering the following unwell unquestionably come further formerly again as exactly the same nearly very often inside case you shield this hike

    Reply

Leave a Comment