how to port to BSNL: Jio, Airtel आणि VI च्या वाढलेल्या रिचार्जमुळे त्रस्त असाल तर आजच जाणून घ्या BSNL मध्ये पोर्टची प्रक्रिया

how to port to BSNL एक काळ असा होता की शासकीय टेलीकॉम कंपनी असलेल्या BSNL चे मोबाईल नेटवर्क  भारताच्या खेड्यापाड्यांपर्यंत वापरले जात असे. कालांतराने या शासकीय कंपनीचे महत्त्व कमी होऊ लागले कारण मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या खाजगी कंपन्यांची या क्षेत्रात संख्या वाढू लागली. प्रत्येक कंपनीचे इतरांपेक्षा कमी दरात नेटवर्क पुरवणे, रिचार्ज कमी दरात असणे यामध्ये ग्राहकांना पर्याय उपलब्ध होऊ लागले. ग्राहकांनी देखील कोणताही विचार न करता कमी दरात मिळणाऱ्या टेलीकॉम कंपन्यांचे सीम विकत घेतले, आणि खाजगी कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क वापरु लागले. परंतु आता याच खाजगी कंपन्यांनी मनमानी कारभार करीत त्यांच्या सुविधा शुल्कांमध्ये दुप्पट तिप्पट दरांनी वाढ करण्यास सुरुवात केली आहे. याबाबतच आपण आजच्या लेखामध्ये अधिक माहिती मिळवणार आहोत.

भारतातील तीन महत्त्वाच्या टेलीकॉम कंपन्या

Jio, Airtel आणि VI या भारतातील टेलीकॉम क्षेत्रातील नामवंत आणि महत्त्वाच्या कंपन्या आहेत. Jio सारख्या कंपनीने तर सुरुवातीला मोफत वायफाय देऊन अनेक ग्राहक मिळवले, आणि कालांतराने दुप्पट तिप्पट दरांनी रिचार्ज शुल्क वाढवले आहे. Airtel आणि VI या कंपन्यांचे देखील काही वेगळे नाही. आघाडीच्या या कंपन्यांनी त्यांचे इंटरनेट नेटवर्क सुविधा सुरुवातीला कमी रकमेत ग्राहकांपर्यंत पोहोचवली आणि आता जास्तीच्या दराने ही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. how to port to BSNL  

BSNL भारतीय टेलीकॉम कंपनी

BSNL म्हणजेच Bharat Sanchar Nigam Limited ही भारताची शासकीय टेलिकॉम कंपनी आहे. नागरिकांना कमीत कमी दरात नेटवर्क उपलब्ध करुन देण्याचा या कंपनीचा नेहमीच ध्येय असते. भारताच्या खेड्या पाड्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कचे टॉवर पोहोचवत या कंपनीने नेहमची ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून टॉकटाईम आणि रिचार्ज च्या किंमती ठेवल्या आहेत. how to port to BSNL

BSNL रिचार्जचे स्वस्थ दर

BSNL या शासकीय टेलिकॉम कंपनेचे मोबाईल नेटवर्क दर नेहमीच सर्वसामान्यांना परवडणारे असत. खाजगी कंपन्यांनी त्यांच्या मार्केटिंग स्ट्रेटेजीमुळे BSNL या कंपनीचे ग्राहकवर्ग कमी झाला आणि हा ग्राहकवर्ग कमी पैशाच्या खाजगी कंपन्यांकडे वळला परंतु आता याच ग्रहकवर्गाला समजून चुकले आहे की खाजगी कंपन्यांची मार्केटिंग हा एक मायाजाळ होता. त्यामध्ये अडकणे चांगले नाही. या खाजगी कंपन्यांनी त्यांच्या टेलिकॉम सेवांचे दर वाढवल्यानंतर सर्वसामान्यांच्या खीशाला कात्री लागू लागली आहे आणि आता हे या सर्वसामान्य ग्राहकांना मान्य नाही त्यामुळे भारतातील हा सर्वसामान्य ग्राहकवर्ग पुन्हा या BSNL कंपनीकडे वळू लागला आहे. अनेकांनी तर सोशल मिडियावर ट्रेंड देखील सुरु केला आहे की, पुन्हा एकदा सर्वांनी BSNL  या कंपनी ची सुविधा घेतली पाहिजे आणि आपल्या भारतीय कंपनीला मोठे केले पाहिजे. ही एक अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे, त्यामुळे या खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसेल. आणि मुळ भारतीय शासकीय कंपनी असलेल्या BSNL ला चांगले दिवस येतील. how to port to BSNL

अशा पद्धतीने करा तुमचे सीमकार्ड BSNL मध्ये पोर्ट

तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर भले मग तो कोणत्याही टेलीकॉम कंपनीचा असो. तुम्हाला BSNL कंपनीमध्ये पोर्ट करायचा असेल तर तुमच्या परीसरातील BSNL कार्यालयाला भेट द्या, तेथे तुम्हाला पोर्ट करण्याच्या प्रोसेससाठी आवश्यक कागदपत्रे किंवा तुमचे ओळखपत्र विचारले जाईल. ते तुम्हाला BSNL कंपनीला झेरॉक्स किंवा ओळखपत्राचा फोटो 3 देणे आवश्यक आहे.  तुम्ही BSNL कडे पोर्टसाठी अर्ज केल्यानंतर अगदी 3 ते 4 दिवसांत तुमच्या जुन्या नंबरच्या मदतीने तुम्ही BSNL कंपनीची सेवा उपभोगू शकणार आहात. आजच तुमच्या जवळच्या BSNL कार्यालयात जा आणि तुमचा नंबर पोर्ट करण्याबाबात अधिक माहिती मिळवा. how to port to BSNL

Leave a Comment