
Ladki Bahin Yojana eKYC राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. दरमहा खात्यात जमा होणारे 1500 रुपये पुढे मिळणार की नाही, हे आता ई-केवायसीवर अवलंबून आहे.
सरकारने स्पष्ट सांगितले आहे की ई-केवायसी पूर्ण नसेल तर लाभ बंद होऊ शकतो. वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास नाव थेट लाभार्थी यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे.
योजना सुरू करताना काही अटी ठरवण्यात आल्या होत्या. मात्र या अटी डावलून काही अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सरकारने कठोर निर्णय घेत ई-केवायसी बंधनकारक केली आहे.
ई-केवायसी का आवश्यक आहे?
सरकारच्या मते, पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी गरजेची आहे. ई-केवायसी पूर्ण नसेल तर पात्र असतानाही पैसे मिळणार नाहीत, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. Government Scheme for Women
31 डिसेंबर ही अंतिम तारीख Ladki Bahin Yojana eKYC last date
ई-केवायसीसाठी सुरुवातीची मुदत नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र अनेक महिलांची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने सरकारने अंतिम संधी देत 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवली.
तरीही अनेक महिलांना इंटरनेट, सिस्टम किंवा तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी करता आली नाही. ही अडचण दूर करण्यासाठी आता अंगणवाडी सेविका थेट घरोघरी जाऊन ई-केवायसी करणार आहेत.
अंगणवाडी सेविका घरी येऊन करतील प्रक्रिया How to do eKYC for Ladki Bahin Yojana
ज्या महिलांची ई-केवायसी अजून पूर्ण झालेली नाही, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून अंगणवाडी सेविकांकडून ई-केवायसी पूर्ण केली जाणार आहे.
नेट नाही, मोबाईल चालत नाही किंवा सिस्टम डाऊन आहे, अशी कारणे आता चालणार नाहीत. कारण प्रक्रिया थेट घरीच पूर्ण केली जाणार आहे.
उशीर झाला तर लाभ बंद
सरकारने स्पष्ट केले आहे की 31 डिसेंबरनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. या तारखेपर्यंत ई-केवायसी न केल्यास दरमहा मिळणारे 1500 रुपये थेट बंद होतील.
सध्या सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र वेळेत पावले उचलली नाहीत, तर हा आर्थिक आधार गमावण्याची वेळ येऊ शकते.
म्हणूनच तुमची कागदपत्रे तयार ठेवा. अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा. आणि ई-केवायसी आजच पूर्ण करा. कारण उशीर झाला, तर लाभ मिळणार नाही हे निश्चित आहे.