Messi Net Worth in Rupees १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर… लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर

Messi Net Worth in Rupees

Messi Net Worth in Rupees जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी पुन्हा एकदा भारताच्या दौऱ्यावर येत आहे. तब्बल १४ वर्षांनंतर त्याचा हा भारत दौरा होत असून, त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मेस्सी १३ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत भारतात पार पडला.

या दौऱ्यात तो विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे. मेस्सीचा हा दौरा विशेषतः कोलकातासाठी खूप खास मानला जात आहे. कारण २०११ मध्ये याच सॉल्ट लेक स्टेडियममध्ये तो अर्जेंटिनाचा कर्णधार म्हणून खेळला होता.

१३ डिसेंबर रोजी मेस्सी ‘सिटी ऑफ जॉय’ म्हणजेच कोलकाता येथे पोहचला. येथूनच त्याच्या ‘GOAT इंडिया टूर २०२५’ची सुरुवात झाली. या दौऱ्यात तो कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या चार शहरांना भेट देणार आहे.

चार शहरांत कार्यक्रमांचे आयोजन

या तीन दिवसांच्या दौऱ्यात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात फुटबॉल इव्हेंट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफिली आणि फॅन मीट्स यांचा समावेश आहे. काही ठिकाणी फुटबॉल क्लिनिकही होणार आहेत. यामुळे भारतीय फुटबॉल चाहत्यांना मेस्सीला जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.

Messi Net Worth in Rupees लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती?

३८ वर्षीय लियोनेल मेस्सी केवळ फुटबॉलपटू नाही, तर तो एक मोठा ग्लोबल ब्रँड आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याची अंदाजित नेटवर्थ सुमारे ८५० मिलियन डॉलर आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम सुमारे ७,७०० कोटी रुपये होते.

मेस्सीची कमाई फक्त फुटबॉल खेळूनच होत नाही. त्याला मॅच फी, बोनस आणि जाहिरातींमधून मोठी रक्कम मिळते.

जाहिरातींतून मोठी कमाई

मेस्सी अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससोबत जोडलेला आहे. जाहिरातींमधून तो दरवर्षी सुमारे ७० मिलियन डॉलर कमावतो. त्याचा अडिडाससोबत लाईफटाइम करार आहे. या कराराची किंमत एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय अॅपल, पेप्सी, मास्टरकार्ड आणि कोनामी यांसारख्या कंपन्यांसोबतही तो काम करतो.

रिअल इस्टेट आणि आलिशान मालमत्ता

मेस्सीने रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने ५० ते ६० मिलियन डॉलर रिअल इस्टेटमध्ये गुंतवले आहेत. बार्सिलोना, मियामी, एंडोरा आणि लंडन येथे त्याची आलिशान घरे आहेत. स्पेनजवळील इबिझा आयलँडवरील त्याचं घर सर्वात महागडं असून, त्याची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे.

१०० कोटी रुपयांचे प्रायव्हेट जेट

Lionel Messi Private Jet मेस्सीकडे स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे. या जेटची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे. यात १५ पेक्षा अधिक लोक प्रवास करू शकतात. तो अनेकदा कुटुंबासोबत या जेटमधून प्रवास करतो. याशिवाय त्याच्याकडे हॉटेल्स, कपड्यांचा ब्रँड आणि महागड्या कार्सचा मोठा संग्रह आहे. ऑडी, रेंज रोव्हर, फरारी आणि मर्सिडीज अशा कार्स त्याच्या गॅरेजमध्ये आहेत.