PAN Card Loan Scam: बघा तुमच्या PAN कार्डवर तुमच्याशिवाय कुणी घेतलंय कर्ज! प्रत्येक PAN धारकाने त्वरित वाचावा असा महत्त्वाचा खुलासा

PAN Card Loan Scam: आजच्या डिजिटल जगात पॅन कार्ड ही फक्त एक कागदोपत्री असलेली ओळख राहिलेली नाही, तर पॅन कार्ड तुमची आर्थिक ओळख दर्शवते, तसेच करदाते म्हणून तुमची असलेली जबाबदारी आणि सरकारी नोंदींमध्ये असलेला तुमचा सहभाग सुद्धा दर्शवते. पण याच पॅन कार्डचा गैरवापर झाला, किंवा तुमच्या नकळत कुणी त्यावर कर्ज घेतले असेल, तर? आपल्या नावावर आपल्या नकळत ईतर कुणी कर्ज घेतलंय याची कल्पना केली तरी अंगावर काटा येईल. कारण अशा प्रकारची फसवणूक तुमचा क्रेडिट स्कोअर खराब करू शकते, आर्थिक संकट निर्माण करू शकते आणि भविष्यातील कर्ज प्रक्रियेलाही अडथळा आणू शकते. त्यामुळे तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर तर (PAN Card Used by Someone Else) होत नाही ना, हे तपासणे आता प्रत्येकासाठी अत्यावश्यक झाले आहे.

खरं तर पॅन कार्ड संदर्भात झालेली फसवणूक म्हणजे कोणीतरी तुमच्या माहितीशिवाय तुमचा पॅन नंबर वापरतो आणि तुमच्या नावावर कर्ज, क्रेडिट कार्ड किंवा अगदी नवीन बँक खातेही उघडू शकतो. काही वेळा तर फसवणूक करणारे तुमच्या नावाने खोटं टॅक्स रिटर्न देखील भरत असल्याच्या अनेक केसेस आहेत. यामुळे तुम्हाला आर्थिक दंड, कायदेशीर गुंतागुंत आणि निरपराध असूनही दोषारोप सहन करावे लागू शकतात. म्हणूनच आज प्रत्येक पॅन धारकाने वेळोवेळी आपला क्रेडिट रिपोर्ट तपासणे अत्यंत अत्यावश्यक झाले आहे.

जर तुमच्या PAN card वर कुणी लपूनछपून, तुम्हाला फसवून आर्थिक व्यवहार केले असतील, तर त्याची पहिली चिन्हे तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये (Credit Score Check Free) दिसतात. म्हणून 2-3 महिन्यांनी एकदा तरी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. तसेच जर तुम्हाला काही अनोळखी कर्ज, क्रेडिट कार्ड, चौकशी (Enquiry) किंवा कुठला संशयास्पद व्यवहार दिसून आला, तर त्यावेळी लगेच समजून घ्या की कुणी तरी तुमच्या PAN card सोबत छेडछाड करत आहे.

आज अनेक UPI अ‍ॅप्स, जसे GPay, PhonePe, Cred, Paytm, तुमचा क्रेडिट स्कोअर अगदी फ्री मध्ये उपलब्ध करून देतात. अ‍ॅपमध्ये ‘Credit Score’ किंवा ‘Free Credit Report’ असा पर्याय निवडला की काही सेकंदांत तुमचा रिपोर्ट तुम्हाला बघायला मिळतो. रिपोर्टमध्ये जर अनोळखी कर्ज किंवा चौकशी दिसली, तर त्याबद्दल तुम्ही त्वरित खबरदारी (PAN KYC Fraud Prevention) घेणं आवश्यक आहे, कारण कधी कोणी तुमच्या नावाने कर्ज घेऊन गायब झालं, तर त्याचा आर्थिक भार तुमच्यावरच येणार आहे.

मोबाइलऐवजी तुम्हाला कॉम्प्युटर वर तुमचा स्कोअर तपासायचा असल्यास CIBIL, Experian किंवा Equifax सारख्या अधिकृत क्रेडिट ब्युरोवर अकाउंट तयार करून तुम्ही याबाबत पूर्ण रिपोर्ट मिळवू शकता. तुमचा संपूर्ण आर्थिक इतिहास, घेतलेले कर्ज, क्रेडिट कार्ड, EMI, आणि कोणकोणत्या संस्थांनी तुमच्या PAN वर चौकशी केली आहे, हे सर्व तुम्हाला सविस्तर स्वरूपात बघायला मिळतं. जर एखादं कर्ज तुम्ही कधी घेतलेच नसेल पण ते तुमच्या रिपोर्टमध्ये दिसत असेल, तर ही फसवणूक (Cyber Safety Tips for Indians) आहे हे स्पष्ट आहे.

जर पॅन कार्डचा गैरवापर आढळला तर काय करायचे?

अशा वेळी सर्वप्रथम तुमच्या बँकेला कळवा, यामुळे संशयास्पद कर्ज किंवा खाते त्वरित ब्लॉक केले जाऊ शकते. त्यानंतर Cyber Crime विभागात तक्रार दाखल करा. तुम्ही Income Tax वेबसाइटवर जाऊन देखील तुमचं PAN कार्ड लॉक करू शकता, ज्यामुळे त्याद्वारे दुसऱ्याला कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. तसेच Credit Freeze करून भविष्यकाळात होणाऱ्या नवीन चौकश्याही थांबवता येतात.

पुढील गोष्टी लक्षात ठेवा

अनोळखी लोकांना पॅन नंबर सांगणे, फोनवर, ईमेलवर किंवा मेसेजवर आधार-पॅन लिंकिंगसारख्या कारणांवर माहिती देणे अत्यंत (How to Protect PAN Card) धोकादायक आहे. आज अनेक फसवणूक करणारे “आपले KYC अपडेट करा” किंवा “आपले PAN-आधार लिंक करा” अशा नावाखाली तुमचा डेटा चोरतात. त्यामुळे अशा गोष्टींना बळी पडू नका. थोडी सावधगिरी, नियमित क्रेडिट रिपोर्ट तपासणे आणि पॅन नंबर सुरक्षित ठेवणे, एवढेच केल्यास मोठा आर्थिक धोका टाळता येतो. लक्षात घ्या की आजच्या डिजिटल जगात तुमची आर्थिक ओळख सुरक्षित ठेवणे ही काळाची गरज आहे.