PM Kisan Sanman Nidhi: अद्याप पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे 2000 रुपये मिळाले नाहीत? अशी करा तक्रार? जाणून घ्या सविस्तर!

मंगळवारी (18 जून) प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा केले गेले आहेत. ही आर्थिक मदत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याच्या पहिल्याच दिवशी मंजूर केली होती.

पेरणीच्या काळात ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पोहोचल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. केंद्र सरकारने मंगळवारी 9.6 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात 2,000 रुपये दराने एकूण 20,000 कोटी रुपयांची देणगी दिली. दरम्यान, काही लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपये अजूनही जमा झालेले नाहीत.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला प्रतिवर्षी एकूण 6,000 रुपयांची मदत देण्यात येते. एकूणच शेतकऱ्यांना तीन टप्प्यात ही मदत मिळणार आहे.

देशातील आणि राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांची रक्कम अद्याप पोहोचलेली नाही. असे शेतकरी थेट तक्रार करू शकणार आहेत.

शेतकऱ्यांना अद्याप 2,000 रुपये मिळाले नाहीत तर ते थेट पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे काम पाहत असणाऱ्या प्रशासनाकडे तक्रार करू शकणार आहेत.

pmkisan-ict@gov.in आणि pmkisan-funds@gov.in, जे या योजनेचे कामकाज पाहत आहे, तर शेतकरी या अधिकृत ईमेल पत्त्यावर याबद्दल तक्रार करू शकतात.

याशिवाय प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेने एक हेल्पलाइन क्रमांकही दिला आहे. शेतकरी हेल्पलाइन क्रमांक 011-24300606, 155261 वर देखील थेट तक्रार करू शकणार आहेत.

एक टोल फ्री क्रमांक सुद्धा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जारी केला गेला आहे. शेतकरी त्यांच्या तक्रारी टोल फ्री क्रमांक 1800-115-526 वर नोंदवू शकतात.

पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली आणि त्यानंतर त्यांच्याद्वारे सगळ्यात आधी प्रधानमंत्री किसान योजनेचा 17 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. जे शेतकरी खूप आधीपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवत आहेत त्यांना आता त्यांच्या बँक खात्यांमध्ये पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता देखील मिळाला आहे. परंतु असे सुद्धा काही शेतकरी आहेत ज्यांना 17 व्या हप्त्याचे 2,000 रुपये अजूनही मिळालेले नाहीत आणि याचे कारण असे की या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे ईकेवायसी पूर्ण केलेले नाही.

PM किसान योजनेअंतर्गत 17 वा हप्ता जारी केला

पीएम किसान योजनेच्या सगळ्याच लाभार्थ्यांसाठी एक अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. योजनेचा 17 वा हप्ता पंतप्रधान मोदींनी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जारी केला आहे, ज्याची स्टेटस शेतकऱ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना अजूनही हा 17 वा हप्ता मिळालेला नाही त्यांनी या योजनेसाठी आवश्यक असलेले ई-केवायसी केले आहे की नाही हे तपासून बघणे आवश्यक आहे. असे काही शेतकरी ज्यांनी अजूनही ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांना या योजनेमधून वगळले गेले आहे आणि त्यांच्या बँक खात्यांमध्ये 17 वा हप्ता जारी करण्यात आलेला नाही.

PM Kisan Sanman Nidhi Installation update

शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी मिळाला, त्यानंतर खूप दिवसांपासून शेतकरी 17व्या हप्त्याची वाट पाहत होते. यावेळी पुन्हा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदीजींनी 18 जून 2024 रोजी प्रधानमंत्री किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला.

मोदीजींनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 20,000 कोटी रुपये हस्तांतरित केले. असे असले तरीही, ज्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना असूनही ई-केवायसी केले नाही, त्यांना 17 व्या हप्त्याचा लाभ घेता आला नाही. शेतकऱ्यांना हा लाभ मिळवण्यासाठी प्रधानमंत्री किसान योजनेसाठी ई-केवायसी करावी लागेल, त्यानंतर वंचित शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याचे स्टेटस कसे तपासायचे? | PM Kisan Sanman Nidhi Status

सगळ्यात आधी प्रधानमंत्री किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्या.

वेबसाइटवर ओपन केल्यानंतर, मुख्य पृष्ठावरील ‘लाभार्थी स्थिती’ या ऑप्शन वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाकावा लागेल आणि ‘Get Details’ पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याचे डिटेल्स दाखवले जातील. PM Kisan Sanman Nidhi

Leave a Comment