Polyhouse Subsidy in Maharashtra: एकात्मिक फलोत्पादन विकास योजना 2024

Polyhouse Subsidy in Maharashtra

Polyhouse Subsidy in Maharashtra केंद्र आणि राज्य शासनाने नेहमीच शेतीला पुरक व्यवसायांसाठी प्रोत्साहन दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे एकात्मिक फलोत्पादन योजना.  महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यात येतात. फलोत्पादनात पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेमार्फत फळांच्या काढणी नंतरचे व्यवस्थापन आणि  पॅक हाऊस,  पुर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासनाकडुन अर्थसहाय्य देण्यात येते. या सर्व बाबींची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. Polyhouse Subsidy in Maharashtra

एकात्मिक फलोत्पादन विकास अभिमानाची सुरुवात कधी सुरुवात झाली Polyhouse Subsidy in Maharashtra

सन 2014-15 पासुन केंद्रशासनाने सदरचे कार्यक्रम एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. फलोत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान ही महत्वाकांक्षी योजना सुरूवात केली आहे. फलोत्पादनाचे उत्पादन दुप्पट करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य निर्माण करणे, नविन फळबागांची लागवड करणे, जुन्या फळबागांचे पुनरूजीवन करणे, सामुहिक शेततळयांच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढविणे, हरितगृह, शेड्नेटहाऊस मध्ये नियंत्रित शेती करणे, एकात्मिक अज्ञद्रव्ये व फळांच्या काढणी नंतरचे व्यवस्थापन या सर्व बाबींसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. Polyhouse Subsidy in Maharashtra

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान पात्रता

  • शेतकरी अनुसूचित जाती, जमातीतील असल्यास जात प्रमाणपत्र तर आवश्यक आहे.
  •  शेतकऱ्याकडे जमिनीसंबंध कागदपत्र असणे आवश्यक 7/12 उतारा आणि 8-अ प्रमाणपत्र.
  • शेततळ्यांचे अस्तरीकरणासाठी ५०० मायक्रॉनची प्लास्टिक फिल्म वापरणे अवश्यक आहे.
  •  या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी  किंवा  शेतकरी समूह अर्ज करु शकतो. आहे.
  • सामूहिक शेततळे यायोजनेसाठी लाभ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत औरंगाबाद, लातूर, जालना, वर्धा, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव हे जिल्हे आणि  विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, व भंडारा व कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील अर्जदार योजनेसाठी पात्र राहतील. Polyhouse Subsidy in Maharashtra

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • आर्जदाराच्या जमिनीचे 8-अ प्रमाणपत्र
  • अर्जदाराच्या जमिनीचा 7/12 उतारा
  • खरेदी करावयाच्या उपकरणांचे कोटेशन/ बिल
  • अर्जदार शेतकरी अरक्षित प्रकारात येत असेल तर जात प्रमाणपत्र

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अर्ज कुठे करावा?

  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन अर्ज करावा
  • https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login या लिंकवर क्लिक करून तुम्ही पोर्टलवर जाऊ शकता
  • तुमचे रजीस्ट्रेशन करुन, लॉगीन करा
  • पोर्टलच्या मुख्य पानावर शेतकरी योजना पर्याय दिसेल त्यावर क्लिक करुन तुम्ही एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेसाठी अर्ज करा
  • विचारलेल्या ठिकाणी तुमची कागदपत्रे अपलोड करा
  • शेवटी सबमीट करा. Polyhouse Subsidy in Maharashtra

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना होणारे फायदे आणि इतर सुविधा

  • आधुनिकिकरणांच्या रोपवाटिकांची निर्मिती करणे.
  • वृक्षलागवडीसाठी प्रयोगशाळा पुनरुज्जीकरण
  • फुलांचे उत्पादन करणे.
  • मसाला पिकांच्या लागवडीस प्राधान्य देणे.
  • फलोत्पादन करण्यासाठी नव्या बागांची निर्मिती करणे.
  • भाजीपाला लागवडीस प्रोत्साहन देणे.
  • मोसंबी, आंबा, कागदी लिंबू, पेरू, संत्री, आवळा, मोसंबी, काजू, या फळांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीकरण करून उत्पादनात वाढ करणे.
  • यांत्रिकीकरणाच्या मदतीने फलोत्पादनास वाढ करणे
  • प्लॅटिक आच्छादन, शेडनेट हाऊस, पॉलीहाऊस, हरितगृह यांमध्ये नियंत्रित शेतीला प्रोत्साहन देणे.
  • फळ पिकांवरील कीड व्यवस्थापन
  • शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण यासाठी प्रोत्साहन देणे.
  • सेंद्रिय शेतीला प्रोत्सहन देणे.
  • मधुमक्षिका पालन परंपरागीकरणासाठी.
  • काढणीनंतर व्यवस्थानासाठी पूर्व शितकरण गृह, पॅक हाऊस, शितखोली, शितसाखळीचे आधुनिकीकरण करणे व त्याबाबात व्यवस्थान करुन फलोत्पादनाला प्रोत्साहन देणे. Polyhouse Subsidy in Maharashtra
  • शासकीय, खासगी, सहकारी क्षेत्रासाठी फलोत्पादन पिकांसाठी पणन सुविधा उपलब्ध करुन देणे.
  • बियाणे प्रक्रिया, साठवण, भाजीपाला फलोत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीसाठी विविध योजनांसाठी मदत करणे. Polyhouse Subsidy in Maharashtra

1 thought on “Polyhouse Subsidy in Maharashtra: एकात्मिक फलोत्पादन विकास योजना 2024”

Leave a Comment