VIHIR ANUDAN YOJANA 2024: प्रत्येक गावातील 15 जणांना सिंचन विहिरीसाठी 4 लाखाचे अनुदान मिळणार

VIHIR ANUDAN YOJANA 2024 महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताना दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना पिक घेताना येणाऱ्या अडचणी आणि पिकामध्ये होणारी घट या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. शेती करताना शेतकऱ्यांना मदत व्हावी पुरेसे पाणी मिळावे आणि पिक चांगले यावे यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत सिंचन विहीर अनुदान योजना राबवण्यात येते. या योजनेबद्दल सविस्तर माहिती आज आपण या लेख्याच्या माध्यमातून घेणार आहोत.

शेती सिंचनासाठी फलदायी योजना

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या अभावामुळे कोरडवाहू शेती केली जाते.या कोरडवाहू शेतीमधून खूप मेहनत करुनही शेतकऱ्यांना जास्त पिक मिळत नाही. म्हणूनच शासनाने कोरडवाहू शेतीला बागायती शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून सिंचन विहीर अनुदान योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक गावात किमान 15 जणांना विहीरींसाठी मान्यता देण्यात येणार आहेत. या संदर्भात शासनाने शासन निर्णय देखील काढला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 4 लाखाचे अनुदान देखील देण्यात येणार आहे. म्हणूनच एखाद्या शेतकऱ्याने सिंचन विहीर अनुदान योजनेचा लाभ कसा घ्यावा याबाबत सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत. VIHIR ANUDAN YOJANA 2024

सिंचन विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी आता 4 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. VIHIR ANUDAN YOJANA 2024

सिंचन विहीर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्रता

 • अर्जदार भारताचा नागरिक असावा
 • अर्जदाराकडे किमान 1 एकर शेतजमीन असावी
 • लाभार्थी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून किमान 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावर  अनुदानीत सिंचन विहीर खोदू शकतो.
 • दोन विहिरींमध्ये 150 मीटर अंतराची अट अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी लागू नाही आणि खासगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही.
 • जमिनीचा 8-अ उतारा असणे आवश्यक.
 • एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतात.
 • अर्जदार हा जॉब कार्डधारक असला पाहिजे.

सिंचन विहीर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • सातबाराचा ऑनलाईन उतारा
 • 8-अ चा ऑनलाईन उतारा
 • मनरेगा जॉब कार्डची प्रत
 • सामुदायिक विहीर घ्यायची असल्यास सर्व जण मिळून 40 गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा आणि समोपचाने पाणी वापण्याचे करारपत्र.

सिंचन विहीर योजनेअंतर्गत अर्ज कुठे व कसा करायचा?

मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी शेतकऱ्यांनी तुमच्या गावच्या ग्रामपंतायतीमध्ये लिखित स्वरुपात अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन अर्जप्रणाली सुरू झाल्यानंतर शेतकरी ऑनलाईन अर्ज  देखील करू शकतात. शासन निर्णयात या अर्जासाठीचा नमुना दिला आहे, अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला संमतीपत्र सुद्धा द्यायचे आहे. VIHIR ANUDAN YOJANA 2024

सिंचन विहीर अनुदान 2024 संदर्भातील महत्त्वाच्या लिंक खालील प्रमाणे आहेत

सिंचन विहीर अनुदान योजनेसंबंधी शासन निर्णय

https://drive.google.com/file/d/1XvtbZszxVhbxYBzawxwKMRZKhoU5nfQJ/view

सिंचन विहीर अनुदान योजना प्रस्ताव

https://drive.google.com/file/d/1XmggcpwJBq0fUonaBCOkfbaaYJV3Ot5Q/view

सिंचन विहीर अनुदान योजना अर्ज

https://drive.google.com/file/d/1Xm4pBhI4Dw1Ce7G-pY0XkuCLsssNI6IB/view

सिंचन विहीर अनुदान योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी कशी मिळवावी?

 • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वेबसाईटला भेट द्या. https://nrega.nic.in/HomeGP_new.aspx या लिंकवर क्लिक करा.
 • पहिल्याच पेजवर ग्रामपंचायत हा पर्याय निवडून महाराष्ट्र राज्याचा पर्याय निवडा.
 • त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत हे पर्याय निवडा.
 • तेथे तुम्हाला list of work या पर्यायावर क्लिक करा.  येथे तुम्हाला तुमच्या गावातील प्रत्येक आर्थिक वर्षांमध्ये कोणकोणती कामे मंजूर झाले याची यादी पाहता येईल. त्यामध्येच तुमच्या गावात किती विहिरी मंजूर झाल्या आहेत याची देखील माहिती तुम्हाला समोर दिसेल.  

ज्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी दुरून पाईपलाईन द्वारे आणावे लागते, आणि त्यांच्या शेत जमिनीत विहिर नाही अशा शेतकऱ्यांनी अवश्य मनरेगा च्या सिंचन विहिर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करावा. या योजनेमार्फत अर्ज स्वीकार झाल्यानंतर शेतकऱ्यांना 4 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. VIHIR ANUDAN YOJANA 2024

3 thoughts on “VIHIR ANUDAN YOJANA 2024: प्रत्येक गावातील 15 जणांना सिंचन विहिरीसाठी 4 लाखाचे अनुदान मिळणार”

 1. रामप्रसाद साहेबराव सरकटे गट नंबर 141 विहीर अनुदान

  Reply

Leave a Comment