Farm Pond Scheme: सामूहिक शेततळे योजनेसाठी अर्ज करा. 3 लाख 39 हजार पर्यंत अनुदान मिळवा.

Farm Pond Scheme

Farm Pond Scheme महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजा राबवत असते. शेतकऱ्यांचे पीक चांगले यावे. तसेच शेतकऱ्यांना पिकासाठी पाण्याचा साठा करता यावा म्हणून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2023-24 साठी सामूहिक शेततळे योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी सामुहिक रितीने कसा लाभ घ्यावा, कोणकोणती कागदपत्रे जोडावी, अर्ज कुठे करावा ही सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.

सामुहिक शेततळे योजनेचे उद्दिष्ट

 • ग्रामिण शेतकऱ्यांच्या उत्पादन पिकासाठी सिंचनाची सुविधा निर्माण करणे.
 • दुष्काळी भागात आणि कोडरवाहू शेतीच्या ठिकाणी फळपीकाचे क्षेत्र वाढवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वत सिंचन सुविधा निर्माण व्हावी.
 • फळपिकाची शेती वाढावी या निव्वळ उद्देशाने सामुहिक शेततळे योजनेची सुरुवात करण्यात आली. Farm Pond Scheme

सामुहिक शेततळे योजनेअंतर्गत किती जागेत किती आकाराचे शेततळे बांधता येईल?

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2023-24 साठी सामूहिक शेततळे योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना किती हेक्टर शेतजमिनीसाठी किती आकाराते शेततळे बांधून घ्यायचे आहे आणि त्याला शासनाकडून किती अनुदान मिळणार ते आपण पुढे पाहू.

1 ते 2 हेक्टर शेतजमिनीत सामुहिक शेततळे बांधताना

शेतकऱ्यांना 1 ते 2 हेक्टर शेतजमिनीत सामुहिक शेततळे बांधायचे असल्यास त्याचे आकारमान 24X24X4 पाणी साठा 2000 घन मी  इतका असतो. या शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना शासनातर्फे 175000 रू. इतके अनुदान मिळते.

2 ते 5 हेक्टर जमिनीसाठी सामुहिक तळे बांधताना

शेतकऱ्यांना 2 ते 5 हेक्टर शेतजमिनीत सामुहिक तळे बांधायचे असल्यास त्याचे आकारमान 34X34X4.7 असावे आणि पाणी साठा 5000 घन मी. उतका असावा. या शेततळ्यास 3,3900 रु.इतके शासनाकडून अनुदान दिले जाते. Farm Pond Scheme

सामुहिक शेततळे योजनेअंतर्गत अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड, रेशनकार्ड
 • जमिनीचा 7/12 उतारा आवश्यक-  फलोत्पादन पीक नोंद असल्यास प्राधान्य
 • जमिनीचा 8 – अ नमुना,
 • अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील
 • हमीपत्र,
 • जातीचे प्रमाणपत्र

सामुहिक शेततळे योजनेसाठी कुठे अर्ज करावा?

इच्छुक शेतकऱ्यांनी  https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन  सामुहिक शेततळ्यासाठी अर्ज करावा. सोबत वर सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावीत. Farm Pond Scheme

योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक बाबी

 • MAHADBT या संकेतस्ळावर नोंदणी करताना  शेतकऱ्यांचे आधार क्रमांक  त्यांच्या मोबाईल क्रमांकासोबत लिंक असणे आवश्यक आहे.
 • आधारकार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक असते.  तसे नसल्यास योजनेतुन मिळणारे शासकिय अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होताना अडचण येऊ शकते. Farm Pond Scheme
 • सामूहिक शेततळे घटकाचा लाभ हा शेतकरी समूहासाठी आहे त्यामुळे समूहात दोन किंवा अधिक शेतकरी असावेत.
 • लाभार्थी शेतकरी संयुक्त कुटुंबातील नसावे शेतकऱ्यांची जमीन धारण बाबतचे 7/12 उतारे स्वतंत्र असावे. Farm Pond Scheme

सामुहिक शेततळे बांधणीसाठीपूर्वसंमती मिळाल्यानंतर करायावयाची कार्यवाही.

 • शेततळ्यासाठी पूर्वसंमती मिळाल्यापासून पंधरा दिवसात काम सुरू करणे आवश्यक राहील.
 • पूर्वसंमतीच्या तारखेपासून सामुहिक शेततळ्याच्या बांधणीचे काम चार महिन्यात पूर्ण करणे आवश्यक राहील.
 • शेततळे खोदाई अस्तरीकरण आणि कुंपण करणे इत्यादी कामे झाल्यानंतर संबंधित कृषी सहायक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना कळवणे आवश्यक असते.
 • शेततळ्यासाठी BIS स्टॅंडर्ड 500 मायक्रोन एचडीपीइ जिओ मेंबरेन फिल्म IS 15351:2015 टाईप II दर्जाची वापरने  आवश्यक असते.
 • पूर्वसंमती पत्रात नमुद केलेल्या आराखड्याप्रमाणे शेततळ्याचे काम करुन घेणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते.
 • सामूहिक शेततळ्यातील पाणी हे सूक्ष्म सिंचना द्वारे पिकाला देणे बंधनकारक असेल.
 • मंजूर आकारमानापेक्षा मोठे शेततळे शेतकऱ्यांनी खोदल्यास खोदायचा व अस्तरीकरणाचा अधिकचा खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करायचा असतो. असे योजनेसंबंधीच्या  शासकीय शासन निर्णयात सांगण्यात आले आहे.
 • शेततळ्याचे बांधकाम करण्यासाठी झालेला खर्च आणि त्याची बिले सादर करताना सर्व बिले हे अधीकृत GST धारकाकडील असावेत. Farm Pond Scheme

सामूहिक शेततळे योजने अंतर्गत एकाच टप्प्यात अनुदान मिळते.

महाराष्ट्र शासनाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामूहिक शेततळे या योजनेसाठी जे शेतकरी र्ज करु इच्छितात त्यांनी शेततळे खोदकाम, शेततळे अस्तरीकरण व तार कुंपन ही सर्व कामे पूर्ण करणे बंधनकारक असते. या सर्व बाबी पुर्ण झाल्यानंतर तलाठी कार्यलयाकडून अधिकारी शेततळ्याचे काम  पाहण्यासाठी येतात आणि त्यानंतरच शेतकऱ्यांना एकाच टप्प्यात अनुदान दिले जाते.

त्यानंतर मात्र एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत जिल्हा कृषी अधिकारी स्तरावरुन अनुदान PFMS प्रणालीच्या माध्यमाने शेतकऱ्याच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम ट्रान्सफर केली जाते. Farm Pond Scheme

Leave a Comment