वंशावळ तयार करणे हे एक भावनिक आणि माहितीपूर्ण काम असते. ती तयार करताना खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे,
सगळ्यात आधी सर्वात जुनी पिढीपासून सुरुवात करा: तुमच्या कुटुंबातील सर्वात जुन्या ज्ञात व्यक्तीपासून, म्हणजे खापर पणजोबा किंवा त्याही आधीच्या पिढीपासूनची नावे लिहा.
नंतर उतरत्या क्रमाने पुढे जा: त्यांच्या मुलांची, म्हणजे पणजोबांची नावे; पुढे आजोबांची, मग वडील किंवा काकांची, आणि अखेरीस आपली व आपली भावंडे यांची नावे लिहा.
आता नातेसंबंध स्पष्ट करा: प्रत्येक नावासमोर त्याचा अर्जदाराशी असलेला संबंध (उदा. आजोबा, वडील, मामा, भाऊ इ.) या गोष्टींची माहिती द्या.
खात्रीशीर माहिती वापरा: वंशावळ तयार करताना फक्त ऐकीव माहिती न वापरता, खालील अधिकृत कागदपत्रांचा आधार घ्या,
- तहसील किंवा महसूल विभागातील जुने नोंदवही
- कोतवाल बुक (जन्म-मृत्यू नोंदी)
- शाळेचे जुने दाखले
- जमीनखत, कर पावत्या, किंवा जुनी मालमत्ता कागदपत्रे
ही कागदपत्रे तुमच्या वंशावळीची विश्वसनीयता आणि कायदेशीरता सिद्ध करण्यात मदत करतात.








1 thought on “अशाप्रकारे तयार करा वंशावळ.”
Comments are closed.