WhatsApp New Feature: आता ज्यासाठी व्हॉट्सॲप स्टेटस ठेवलं त्याला पाहावेच लागेल! फक्त करा एवढंच!

WhatsApp New Feature: मित्रांनो व्हॉट्सॲप आपल्या लाखो वापरकर्त्यांसाठी नेहमीच काही ना काही नवनवीन फिचर्स लाँच करत आहे. आता सुद्धा कंपनीने एक नवीन फीचर लाँच करण्यास सुरुवात केली आहे आणि जे फिचर वापरकर्त्यांच्या दृष्टीने फार सोयीस्कर ठरणार आहे. व्हॉट्सॲपने आपल्या करोडो यूजर्ससाठी आता स्टेटस ऑप्शन मधे एक जबरदस्त फीचर लाँच केलं आहे.

व्हॉट्सॲप हे सध्याचे सर्वात मोठे इन्स्टंट मेसेजिंग ॲप ठरले आहे. संपूर्ण जगभरात 200 कोटींहून अधिक लोक या ॲप चा वापर करत असल्याचा डाटा आहे. आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी, कंपनी व्हॉट्सॲप ॲपमध्ये नेहमीच काहीतरी बदल करत असते. आता व्हॉट्सॲप स्टेटस ऑप्शन मधे सुद्धा अनेक वापरकर्त्यांना असच एक नवीन आणि जबरदस्त फीचर बघायला मिळणार आहे. जर तुम्ही देखील व्हॉट्सॲपवर वरच्या वर स्टेटस पोस्ट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. WhatsApp New Feature

मित्रांनो जसे आपल्याला माहीतच आहे की व्हॉट्सॲप आपल्या ॲपमध्ये नवनवीन फीचर्स जोडत आहे. यामधील काही फिचर्स हे वापरकर्त्यांच्या गोपनीयता आणि सुरक्षिततेशी संबंधित आहेत, तर काही फीचर्स हे वापरकर्त्यांना ॲप वापरताना काही अडचण येऊ नये किंवा त्यांचा अनुभव चांगला असावा यासाठी आहेत. मात्र व्हॉट्सॲप आता स्टेटस ऑप्शन मधे एक नवीन फीचर लाँच करणार आहे, ज्यानंतर तुम्ही ज्या यूजर्ससाठी ते स्टेटस पोस्ट केले आहे त्यांना तुमच्या स्टेटसची माहिती लगेच मिळू शकेल.

आता यूजर्सला वाट पाहावी लागणार नाही | WhatsApp New Feature
व्हॉट्सॲपवर सध्या कोणीही स्टेटस पोस्ट केले तर ते फक्त 24 तासांसाठी दिसत आहे. अनेक वेळा लोक एखाद्या विशेष व्यक्तीसाठी स्टेटस पोस्ट करतात, स्टेटस पोस्ट केल्यानंतर, लोक त्या व्यक्तीने स्टेटस पाहिले आहे की नाही हे जाऊन पुन्हा पुन्हा तपासत राहतात. अशा वेळी संपूर्ण 24 तास उलटून गेल्यावरही त्या व्यक्तीने तर यांचे स्टेटस बघितले नसेल तर ते निराशा होतात. मात्र आता व्हॉट्सॲपने या समस्येवर सुद्धा उपाय शोधला आहे. आता ज्या व्यक्तीसाठी तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट केले आहे त्याने ते पाहिले की नाही हे सतत तपासावे लागणार नाही.

कंपनीने Contact Mention Feature जाहीर केलं
वास्तविक, व्हॉट्सॲपने आता Contact Mention Feature लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी खूप दिवसांपासून या फीचरची तपासणी करत होती. आता कंपनीने हे फीचर बीटा यूजर्ससाठी आणले आहे. हे फीचर आल्यानंतर तुम्ही ज्या व्हॉट्सॲप युजरला तुमच्या स्टेटसमध्ये मेंशन कराल त्याला लगेच तुमच्या स्टेटसचे नोटिफिकेशन मिळेल.

स्टेटस मेन्शन असे व्हॉट्सॲपने आपल्या नवीन फीचरला नाव दिले आहे. व्हॉट्सॲप मॉनिटरिंग वेबसाइट व्हॉट्सॲपच्या मते, व्हॉट्सॲपने नुकतेच व्हॉट्सॲप अँड्रॉइड 2.24.6.19 बीटा अपडेटमध्ये हे नवीन फीचर आणले आहे. जर तुम्हाला देखील हे फीचर वापरण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपचे बीटा व्हर्जन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून तुमच्या मोबाईल मधे इंस्टॉल करू शकता. WhatsApp New Feature

व्हॉट्सॲपवर आता फक्त स्टेटसच नाही तर तुमचा डीपी कोण पाहतो हे देखील समजेल! | Who sees your DP?

सोशल मीडियावर व्हॉट्सॲप हे आज सर्वात लोकप्रिय ॲप बनले आहे, त्यामुळे क्वचितच असा कोणी असेल ज्याच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप इन्स्टॉल नसेल. खरं तर, व्हॉट्सॲपच्या मदतीने तुम्ही टेक्स्ट मेसेज, व्हिडिओ किंवा ऑडिओद्वारे कोणाशीही सहज संवाद साधू शकता. मात्र नुकतेच व्हॉट्सॲपने एक नवीन फीचर ॲड केले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे व्हॉट्सॲप स्टेटस कोण पाहत आहे हे तर समजू शकताच परंतु तुमचा डीपी कोण पाहत आहे हे तुम्हाला त्याद्वारे कळू शकत नाही. पण आता आम्ही तुम्हाला अशा एका ॲपबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमचा व्हॉट्सॲप डीपी कोण पाहत आहे हे सुद्धा तुम्हाला सहज समजू शकेल.

असं करा चेक | Whatsapp Who Viewed Me
तुमचा व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटो कोणी पाहिला हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एका अँड्रॉइड ॲपची आवश्यकता असेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Google Play Store वरून Whatsapp Who Viewed Me नावाचे ॲप डाउनलोड करावे लागेल. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर मोबाईल मार्केट नावाचे ॲप तुमच्या स्मार्टफोनवर आपोआप डाउनलोड होईल. आता तुम्ही हे ॲप ओपन करताच, हे ॲप लगेच तुमच्यासमोर त्या लोकांची लिस्ट ओपन करेल ज्यांनी तुमचा dp पाहिला आहे. हे ॲप तुम्हाला शेवटच्या २४ तासांत ज्यांनी तुमचा डीपी पाहिला आहे त्या लोकांची लिस्ट दाखवते.

या ॲप द्वारे फक्त एकाच मिनिटात तुमचा डीपी कोणी पाहिला हे तुम्हाला सहज कळू शकेल. अनेक वेळा लोक आपल्याशी जास्त बोलत नाहीत पण ते तुमचा डीपी मात्र सतत बघत राहतात, त्यामुळे अशा वेळेस हे ॲप तुमचा डीपी कोण पाहत आहे हे तुम्हाला सहज सांगू शकेल. WhatsApp New Feature

Leave a Comment