
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा’ १५०० रुपयांचा हप्ता गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या खात्यात जमा झाला नाही का? जर तुमचे पैसे e-KYC मधील त्रुटींमुळे थांबले असतील, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
अपात्र ठरलेल्या किंवा तांत्रिक चुकांमुळे पैसे थांबलेल्या लाडक्या बहिणींना आता आपल्या अर्जात दुरुस्ती करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आजपासून (दि. २७ जानेवारी) या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, हातात खूप कमी वेळ आहे. त्यामुळे नक्की काय करायचे? कागदपत्रे कोणती लागतील? याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
फक्त ३१ जानेवारीपर्यंत मुदत! (Important Dates)
ई-केवायसी (e-KYC) करताना अनेक महिलांकडून चुकीचे कॉलम निवडले गेले किंवा माहिती चुकीची भरली गेली. त्यामुळे हजारो महिलांचे पैसे थांबले आहेत.
आता सरकारने या चुका सुधारण्यासाठी २७ जानेवारी ते ३१ जानेवारी अशी मुदत दिली आहे. म्हणजेच तुमच्याकडे दुरुस्तीसाठी फक्त ४ ते ५ दिवस आहेत. या कालावधीतच तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, अन्यथा पुन्हा लाभ मिळणार नाही.
दुरुस्तीसाठी काय करावे? (Step-by-Step Process)
जर तुमची e-KYC चुकली असेल आणि हप्ता बंद झाला असेल, तर खालील स्टेप्स फॉलो करा:
- संपर्क: तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेशी (अंगणवाडी ताई) त्वरित संपर्क साधा.
- अर्ज: e-KYC दुरुस्तीसाठी एक विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला भरावा लागेल.
- कागदपत्रे जमा करा: भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे ३१ तारखेच्या आत जमा करा.
आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत जोडणे अनिवार्य आहे:
- e-KYC दुरुस्तीचा अर्ज (Application Form).
- आधार कार्ड झेरॉक्स (Aadhar Card Xerox).
- स्वयंघोषणापत्र (Self-Declaration Form).
सरकारचे आश्वासन: पडताळणीनंतर पैसे पुन्हा सुरू होणार
गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक महिलांनी e-KYC करताना चुकीची माहिती भरल्याने त्यांचे लाभ थांबले होते. आता अंगणवाडी सेविकांमार्फत हे अर्ज जमा करून घेतले जातील. त्यानंतर प्रशासनाकडून त्याचे ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’ (Cross Verification) केले जाईल. एकदा का तुमची माहिती बरोबर असल्याचे सिद्ध झाले, की तुमचे थांबलेले हप्ते पुन्हा सुरू होतील.