महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात १४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांची महाभरती! पगार १.७७ लाखांपर्यंत; आजच करा अर्ज

arogya-vibhag-bharti

महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत (Public Health Department, Maharashtra) वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या तब्बल १४४० जागांसाठी अधिकृत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एमबीबीएस (MBBS) आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची भरती असून, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरतीचा संक्षिप्त तपशील:

  • पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ (Medical Officer Group-A)
  • एकूण रिक्त जागा: १४४० जागा
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० मार्च २०२६

पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या आवश्यक शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO) – MBBS ७६६ मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी पूर्ण.
वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO) – विशेषज्ञ ७७४ संबंधित विषयात वैद्यकीय पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा समतुल्य.
एकूण जागा १४४०

वयोमर्यादा (Age Limit): २० मार्च २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावे. (मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) वयात ०५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.)

अर्ज फी (Application Fee):

  • खुला प्रवर्ग (Open Category): ₹१०००/-
  • मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग / महिला / खेळाडू: ₹७००/-

पगार (Salary): निवड झालेल्या उमेदवारांना राज्य शासनाच्या नियमांनुसार ₹५६,१००/- ते ₹१,७७,५००/- या पे-मॅट्रिक्सनुसार अत्यंत आकर्षक वेतन दिले जाईल.

Important Links
📄 जाहिरात (PDF)
Download PDF
📝 ऑनलाइन अर्ज
Apply Online