PNB Bharati 2024पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB ही भारतामधील एक महत्वाची राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची सुरुवात 19 मे 1894 रोजी झाली. देशभर 764 शहरांमध्ये तब्बल 5001 ठिकाणी या बँकेची कार्यालये आहेत. अंदाजे भारतातील 37 दशलक्ष पेक्षाही जास्त ग्राहकांना ही बँक सध्या बँकिंगसेवा पुरवीत आहे. बँकर्स अल्मनॅक, लंडन यांनी बँकेस जागतिक पातळीवरील 248 वी भव्य बँक म्हणून या बँकेस ओळखले जाते. इतक्या मोठ्या आणि बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या बँकेने पदभरती जाहिर केली आहे. तब्बल 1025 पदांसाठी ही भरती जाहिर करण्यात आली आहे. म्हणूनच आज आम्ही या लेख्याच्या माध्यमातून तुमच्यासाठी या जाहिराती संबंधीत संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.
कोणत्या पदासाठी किती जागा आहेत पहा
- क्रेडीट अधिकारी 1000
- फॉरेक्स मॅनेजर 15
- सायबर सिक्योरिटी मॅनेजर – 5
- वरिष्ठ सायबर सिक्योरिटी मॅनेजर – 5
वरील सर्व पदांची मिळूण एकुण पदांची संख्या 1025 असून जास्तीत जास्त तरुणांनी पंजाब नॅशनल बँकेतील या पदांसाठी अर्ज करावा. PNB Bharati 2024
अर्जदाराची आवश्यक शैक्षणिक पात्रता – Education Qualification
पंजाब नॅशनल बँकेत 1025 जागांसाठी पदभरती जाहीर झाली असली तरी यातील विविध 4 पदांसाठी या व्हॅकंन्सी जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक पदानुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता देखील वेगवेगळी असणार आहे. त्यासाठी आम्ही पुढील प्रमाणे प्रत्येक पदासाठी अर्जदाराची आवश्यक शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते आपण पाहू. PNB Bharati 2024
- क्रेडिट अधिकारी या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
क्रेडिट अधिकारी या पोस्टसाठी तब्बल 1000 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा CA / CMA / CFA / MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा प्राप्त केलेला असावा. PNB Bharati 2024
- फॉरेक्स मॅनेजर या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
फॉरेक्स मॅनेजर या पोस्टसाठी 20 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे.
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये पीजी डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. तसेच अर्जदाराला संबंधित कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. PNB Bharati 2024
- सायबर सिक्योरिटी मॅनेजर या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
सायबर सिक्योरिटी मॅनेजर या पोस्टसाठी केवळ 5 जागांवर भरती जाहिर करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 60 टक्के गुणांसह बी .ई / बी.टेक या पदव्या कम्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या विषयांमध्ये पुर्ण करणे आवश्यक आहे किंवा MCA उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला किमान 2 वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. PNB Bharati 2024
- वरिष्ठ सायबर सिक्योरिटी मॅनेजर या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सायबर सिक्योरिटी मॅनेजर या पदासाठी अर्ज करु इच्छित असलेला 60 टक्के गुणांसह बी .ई / बी.टेक या पदव्या कम्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या विषयांमध्ये पुर्ण करणे आवश्यक आहे किंवा MCA उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला किमान 4 वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. PNB Bharati 2024
अर्ज प्रक्रिया कशी असेल
पंजाब नॅशनल बँकेने जाहिर केलेल्या पदांसाठीची अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे.
https://drive.google.com/file/d/1sLUoKr-6HRo2KnbTfpQczODodrJpMP_1/view या लिंकवर क्लिक करुन तुम्ही संबंधीत भरतीबाबतची जाहिरात पाहू शकता. आणि अधिक माहिती मिळवू शकता. तसेच https://www.pnbindia.in/Recruitments.aspx या लिंकवर क्लिक करुन तुम्ही पंजाब नॅशलन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करु शकता. PNB Bharati 2024
परीक्षा शुल्क किती असणार आहे?
पंजाब नॅशनल बँकेने जाहीर केलेल्या पदभरतीसाठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर त्याची अर्ज करण्याचे शुल्क पुढील प्रमाणे असणार आहे.
- खुल्या गटातील उमेदवारांकरीता 1180/- रुपये इतकी परीक्षा शुल्क असणार आहे.
- SC / ST /PWD प्रवर्गातील उमेदवारांकरीता 59/- रुपये इतका परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. PNB Bharati 2024
अर्ज करण्याची अंतीम तारीख
पंजाब नॅशनल बँकेमार्फत जाहीर झालेल्या पदासाठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर तुम्हाला घाई करावी लागेल कारण दिनांक 07 फेब्रुवारी 2024 पासुन ते 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्जदारांनी आवेदन सादर करायचे आहेत