VJNT Gharkul Yojana: VJNT लाभार्थ्यांना घरकुल! ओबीसी लाभार्थ्यांच्या खात्यात 15000 रुपयांचा पहिला हफ्ता जमा होणार

VJNT Gharkul Yojana महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखालील गरीब नागरिकांना हक्काच घर मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. नुकतीच सुरू करण्यात आलेली मोदी आवास योजना झपाट्याने चालू असून याचा लाभ ओबीसी प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यांना दिला जात आहे.  चला तर मग या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवूया.

VJNT म्हणजे कोण?

देशात आजही अशा जाती जमाती आहेत ज्यांचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास झालेला नाही. अशा जाती जमातींचा विकास घडवून आणणे ही पूर्णतः शासनाची जबाबदारी असते, त्यापैकी एक गट म्हणजे VJNT.  Vimukta Jati and Nomadic Tribes असलेल्या विमुक्त जाती जमातींना शासनातर्फे काही सवलती आणि विशेष आर्थिक अनुदान जाहीर करण्यात येते. सद्या घरकुल येजनोत या समुदायाला अनुदान जहीर करण्यात आले आहे. Gharkul Yojana

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अनुदान किती आहे

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरीब व दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना घर बांधण्यासाठी  1 लाख 20 हजार रुपये दिले जातात. तसेच शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपये आणि मनरेगा अंतर्गत मजुरीसाठी 23 हजार 200 रुपये वेगळे दिले जातात. Gharkul Yojana

VJNT लाभार्थी लाभ OBC पहिला हफ्ता

महाराष्ट्र राज्य सरकार केंद्रा मार्फत सुरु असलेल्या अनेक योजना राज्यात अत्यंत सुव्यवस्थीत पणे राबवत आहे. मोदी आवास योजना आणि ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील बेघर लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्याचे काम वेगाने सुरु आहे. परंतु असे असतानाही  सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 31 हजार  VJNT लाभार्थी अजूनही बेघर आहेत. या संपूर्ण लाभार्थ्यांना शासनाकडून घरकुलासाठी अनुदान देण्यात येणार आहे. Gharkul Yojana

OBC प्रवर्गातील लाभार्थ्यांना 15 हजाराचा पहिला हप्ता मिळणार

राज्यातील ओबीसी म्हणजेच कुणबी समाजातील तब्बल 11,000 बेघर लाभार्थी नागरिकांना घराच्या बांधकामासाठी पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी टप्प्याटप्प्याने एकूण 1 लाख 20 हजार या  लाभार्थ्याला अनुदान म्हणून राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. यासोबतच स्वच्छतागृहासाठी 12000 व मनरेगाअंतर्गत मजुरीपोटी 23 हजार 200 रुपये स्वातंत्रपणे संबंधित लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येतील. Gharkul Yojana

62हजार 218 ओबीसी लाभार्थींना हक्काची निवारा

सोलापूर जिल्ह्यात मोदी आवास योजनेअंतर्गत 2023-24 ते 2026-27 या तीन वर्षांत 62 हजार 218 ओबीसी लाभार्थींना हक्काचा निवारा मिळणार आहे. आता राज्य सरकारने मोदी आवास योजनेत ज्यांच्याकडे घर नाही अशा VJNT प्रवर्गातील लाभार्थींचाही समावेश केला आहे. ही अत्यंत आनंदाची बाब असून या विमुक्त जातींतील नागरिकांना देखील आता त्यांचे स्वतःचे हक्काचे घर मिळणर आहे. सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे 31 हजार व्हीजेएनटी कुटुंबांना राहण्यासाठी स्वत:चे घर नाही. Gharkul Yojana

VJNT अंतर्गत किती जाती जमाती येतात?

‘व्हीजेएनटी’अंतर्गत वंजारी, धनगर, वडार, लमाण अशा प्रकारच्या एकूण 14 जाती येतात. या सर्वज जातींमधील बेघर लाभार्थ्यांना शासनाकडून पुढील आर्थिक वर्षात घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे.  आतातरी  सोलापूर जिल्ह्यातील 11 हजार OBC व SBC प्रवर्गातील लाभार्थ्यांना 15 हजार रुपयांचा पहिला हप्ता सोमवार ते गुरुवारपर्यंत मिळणार आहे. परंतु सध्या  महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याने पाण्याअभावी घरांच्या  बांधकामाला अडचण येवू शकते. तसेच वाळूचे लिलाव देखील बंद असल्याने घराच्या बांधकामात अडचणी येवू शकतात. म्हणून गरजू लाभार्थींना शासनाच्या वतीने स्वस्तात किंवा मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामीण विकास यंत्रणेकडून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली जाणार आहे. जेणेकरून शासनाच्या सव्वालाखांच्या अनुदानात त्यांचे घरकूल पूर्ण होईल आणि गरीब व आर्थिक दुर्बल गटाला त्यांचे हक्काचे घर मिळू शकेल.  Gharkul Yojana

तीन महिन्यांसून लाभार्थी स्वस्तातील वाळूच्या प्रतीक्षेतच

विविध जिल्ह्यांमधील रमाई आवास योजनेतील जवळ जवळ तीन हजार, पंतप्रधान आवास योजनेतील आठ हजार आणि मोदी आवास योजनेतील 11 हजार घरकुलांचे बांधकाम अजूनही झालेले नाही.  प्रत्येक घरकुलासाठी पाच ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तीन महिन्यांपूर्वी ग्रामीण विकास यंत्रणेने खनिकर्म अधिकाऱ्यांकडे केली आहे. 600 रुपये ब्रासप्रमाणे वाळू द्यावी, अशी मूळ मागणी आहे पण पंढरपूर वगळता उर्वरित कोणत्याही तालुक्यातून लाभार्थींना वाळू मिळालेली नाही.

5 thoughts on “VJNT Gharkul Yojana: VJNT लाभार्थ्यांना घरकुल! ओबीसी लाभार्थ्यांच्या खात्यात 15000 रुपयांचा पहिला हफ्ता जमा होणार”

Leave a Comment