
Ladki Bahin Yojana Latest Update: राज्यातील लाखो बहिणींसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अनेक महिलांसाठी दिलासा देणारा हात ठरली आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांना थेट मदत देण्यासाठी ही योजना सुरू केली गेली असून दर महिन्याला ₹1,500 इतकी रक्कम थेट महिलांच्या खात्यात जमा केली जाते. पण आता या योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट (Mukhyamantri Ladki Bahin Yojana Payment Status) समोर आली आहे आणि त्याकडेच सर्व महिलांचे लक्ष लागून राहिले आहे.
दिवाळी संपल्यावर आणि नोव्हेंबर महिना शेवटाकडे जात असताना, सर्व लाभार्थी महिलांच्या मनात आता एकच प्रश्न घोळत आहे आणि तो म्हणजे, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार?, कारण यावेळी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्यामुळे अचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाली आहे की अचारसंहितेमुळे (Ladki Bahin Yojana December Payment Date) या योजनेचे पैसे थांबणार का?
तज्ज्ञांच्या मते, निवडणूक काळात अनेक शासकीय योजना तात्पुरत्या थांबवल्या जातात. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन (Ladki Bahin Yojana Double Payment Update) महिन्यांचे एकत्रित पैसे, म्हणजेच ₹3,000, लाभार्थी महिलांना डिसेंबरमध्ये एकाचवेळी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अंदाज जरी मजबूत असला तरी, प्रशासनाच्या स्तरावर याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता त्यामुळे लाभार्थींमध्ये थोडी उत्सुकता आणि थोडी चिंता दोन्ही बघायला मिळत आहेत.
केवायसीला मिळाली मोठी मुदतवाढ, महिलांसाठी दिलासा
लाडकी बहीण योजना सुरू करताना सरकारने काही कठोर पात्रता अटी लागू केल्या होत्या. मात्र नंतर असे समोर आले की काही अपात्र महिलादेखील या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे सरकारकडून KYC (Know Your Customer) प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. सुरुवातीला KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. पण लाखो महिलांची KYC प्रक्रिया बाकी असल्याचे लक्षात येताच सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
आता नवीन निर्णयानुसार, 31 डिसेंबर 2025 पर्यंत महिलांना KYC पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. मात्र या तारखेनंतरही ज्यांची KYC पूर्ण (KYC Update for Ladki Bahin Yojana) नसेल, त्यांचे हप्ते थांबण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी वेळेत KYC करून घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे.
ही योजना इतकी महत्त्वाची का आहे?
लाडकी बहीण योजना म्हणजे फक्त आर्थिक मदत नाही तर ही अनेक महिलांसाठी स्वाभिमान, आत्मनिर्भरता आणि सुरक्षिततेचा आधार आहे. या योजनेअंतर्गत:
- वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांना याद्वारे थेट मदत मिळते.
- दर महिन्याला ₹1,500 खात्यात जमा होतात.
- घरखर्च, औषधे, मुलांचे शिक्षण, रेशन, प्रवास, अनेक महिलांसाठी हा हप्ता अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
- यासोबतच कुटुंबात महिलांचा आर्थिक सहभाग देखील वाढतो.
यामुळेच या योजनेतील प्रत्येक अपडेट महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
पुढील काही दिवस महत्त्वाचे
नोव्हेंबरचा हप्ता (Ladki Bahin Yojana November Payment) केव्हा येणार याबाबत काही दिवसात स्पष्टता येण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये दोन महिन्यांचे मिळून ३,००० रुपये मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, पण त्यासाठी महिलांना अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, लाभार्थींनी केवायसी प्रक्रियेवर विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.