Ancestral Land Record स्त्री पुरुष समानतेचे वारे देशात वाहत आहेत. कायद्याने देखील स्त्रीयांना समान हक्क असल्याचे वेळोवेळी कायद्यांमध्ये म्हटले आहे. अनेक वर्षे महिलांना त्यांचे हक्क न मिळाल्याने त्यांची आर्थिक दुरावस्था झाल्याचे न्यायालयातील एका खटल्यात सिद्ध झाले आहे. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये जीतका हक्क मुलाचा आहे तितकाच हक्क मुलीचा देखील आहे असे वेळोवेळी न्यायिक कायद्यांमधून सांगण्यात आले आहे. तसेच त्यासंदर्भात काही कडक कायदे देखील करण्यात आले आहे. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा हक्क सिद्ध करण्यासाठी कायदेशीर तरतूदी कोणकोणत्या आहेत ते आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
वडिलोपार्जित संपत्तीवर मुलीचा समान अधिकार
वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मूलींचा देखील समान अधिकार असल्याचे आपल्या हिंदू संपत्ती कायद्यात सांगण्यात आले आहे. वडिलोपार्जित संपत्ती आणि स्वअर्जित संपत्ती असे या कायद्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. ही तरतूद करण्याआधी फक्त वडिलोपार्जित संपत्तीवर केवळ मुलांचा अधिकार होता परंतु हिंदू वारसा कायद्यामध्ये 2005 मध्ये दुरुस्ती केल्यानंतर 2005 च्या हिंदू वारसा कायद्यानुसार या वडिलोपार्जित संपत्तीत मुलांइतकाच मुलींचा देखील अधिकार आहे असे नमूद करण्यात आले. केवळ आपल्या मनाप्रमाणे या संपत्तीचं वितरण करण्याचा अधिकार वडिल किंवा वडिलांनंतर आईला देण्यात आला आहे. इतकेच नाही तर वडिल मुलीला वडिलोपार्जित संपत्तीपैकी काही हिस्सा देण्यास नकारही देऊ शकत नाही. Ancestral Land Record
वडिलांचा इच्छापत्र न लिहिताच मृत्यू झाल्यास मुलींना हक्क कसा मिळतो?
वडिलांनी हयातीत त्यांच्या संपत्तीचे मुलगा आणि मुलगी यांमध्ये वितरण करण्याबाबत इच्छापत्र तयार केले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला तर 2005 च्या हिंदू वारस कायद्यानुसार वडिलांची संपूर्ण संपत्ती ही मुलगा आणि मुली यांमध्ये म्हणजेच त्यांच्या वारसदारांमध्ये समान वाटणी केली जाते. एव्हाना मुलांचा देखील मुलांइतकाच समान अधिकार संपत्तीवर असतो. Ancestral Land Record
मुलीचे लग्न झाल्यानंतर कसा हक्क मिळवायचा
भारतात पितृसत्ताक संस्कृती असल्याने याआधी मुलींना फक्त कुटुंबाचा सदस्य मानले जात असे परंतु संपत्तीमध्ये समान अधिकार मिळत नव्हते. काही ठिकाणी तर मुलींचे लग्न झाल्यानंतर त्यांना माहेरा सदस्य देखील मानले जात नसे. परंतु 2005 मध्ये हिंदू वारस कायद्यामध्ये नियमानुसार दुरुस्ती झाल्यानंतर मात्र मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वारस मानलं जाणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. आणि सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे मुलींचे लग्न झाल्यानंतरही मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार आबाधित राहतो. Ancestral Land Record
मुलांप्रमाणे मुलींनाही अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागेवर नोकरीचा मिळविण्याचा अधिकार
एखाद्या कुटुंबातील शासकीय नोकरीत असताना वडिलांचा मृत्यू झाला असल्यास अनुकंपा तत्वावर म्हणजेच वडिलांच्या जागी त्यांच्या मुलाला किंवा मुलीला नोकरी मिळते असा शासकीय नियम आहे. याआधी हा अधिकार केवळ मुलालाच मिळत असे परंतू कायद्यात बदल झाल्यानंतर आता मुलींना देखील वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नोकरीमध्ये अनुकंपा तत्वावर रुजू होता येते. सर्वात महत्त्वाची दुरुस्ती म्हणजे मुलगी विवाहित आहे किंवा अविवाहित आहे या मुद्द्यावर त्या महिलेचा अनुकंपा नोकरीचा अधिकार नाकारता येत नाही. Ancestral Land Record
महिलांना नवऱ्याचा पगार माहिती करुन घेण्याचा पूर्ण अधिकार आहे
प्रत्येक महिलेला तीने ज्या पुरुषासोबत लग्न केले आहे त्याचा पगार जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. नवरा बायकोमध्ये घटस्पोट झाल्यानंतर न्यायालयाच्या नियमानुसार पतीला तो कमावत असलेल्या संपूर्ण पैशांची माहिती घटस्पोटीत बायकोला द्यावी लागते. त्यामुळे पत्नीला पोटगी किती मिळेल हे ठरत असते. पती पगारासंबंधीत किंवा मासिक मिळकतीसंबंधीत माहिती देऊ इच्छित नसेल तर पत्नी ही संपूर्ण माहिती माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत मागू शकते. Ancestral Land Record कायद्यामध्ये झालेल्या या तरतूदी म्हणजे स्त्री पुरुष समानतेची अत्यंत सुंदर उदाहरणे आहेत. महिलांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळावे यासाठी कायद्याने देखील वेळोवेळी पुढाकार घेऊन न्यायालयीन व्यवस्थेत आणि कायद्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत. Ancestral Land Record