BMC Recruitment 2024बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर नियंत्रण ठेवणारी एक यंत्रणा आहे. अनेकांचे स्वप्न असते की BMC म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करावी. पर्मनंट नोकरी मिळविण्यासाठी अनेकांची येथे रस्सीखेच सुरु असते. त्या सर्वांसाठी ही सुवर्ण संधी असून कोणत्याही शाखेची पदवीधर या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहे. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवूया.
कोणत्या पदासाठी किती जागा उपलब्ध आहेत?
बृहन्मुंबई माहनगरपालिका अंतर्गत भरती जाहिर करण्यात आली आहे त्यामध्ये अनुज्ञापन निरीक्षक म्हणजेच License Inspector या पदावर 118 रिक्त जागां भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेनंतर लेखी परीक्षा आणि मुलाखत या प्रक्रियेतून योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. BMC Recruitment 2024
अर्जदाराची शैक्षणिक पात्रता
बृहन्मुंबई माहनगरपालिका अंतर्गत परवाना निरीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता अशी आहे की, उमेदवाराने पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे. कला, वाणिज्य किंवा विज्ञान या कोणत्याही शाखेतून आणि मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवी प्राप्त केलेली असावी. BMC Recruitment 2024
अर्जदाराची आवश्यक वयोमर्यादा
बृहन्मुंबई माहनगरपालिका अंतर्गत परवाना निरीक्षक या पदासाठी अर्ज करताना अर्जदार उमेदवाराची वयोमर्यादा देखील ठरविण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त 38वर्षे इतके असावे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 43 वर्षे इतके असावे असे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. BMC Recruitment 2024
अर्जाचे शुल्क किती असेल
बृहन्मुंबई माहनगरपालिका अंतर्गत परवाना निरीक्षक या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करताना अर्जाचे शुल्क हे खुल्या गटा उमेदवारांसाठी 1000/- इतके आहे आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900/- रुपये इतके आहे. BMC Recruitment 2024
नोकरीचे ठिकाण
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनन्स येथे असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना नोकरीसाठी येथे यावे लागेल. म्हणजेच महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून उमेदवारांनी अर्ज केला असता त्यांना नोकरीसाठी मुंबई येथे यावे लागेल. BMC Recruitment 2024
वेतन किती असेल?
बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहिर केलेल्या परवाना निरीक्षक पदावर निवड झालेल्या उमेदवार रुजू झाल्यानंतर त्या उमेदवारास दरमहा रु. 29,200/- ते रु. 92,300/- इतके वेतन आहे. संबंधिक पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीत तसे नमूद करण्यात आले आहे. BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट
बृहन्मुंबई माहनगरपालिका अंतर्गत परवाना निरीक्षक या पदासाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. https://portal.mcgm.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही बृहन्मुंबई माहनगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. BMC Recruitment 2024
संबंधित भरतीची जाहिरात
https://drive.google.com/file/d/1eSKlPO77svnWFyHQ0Iig4EHV_xW4Tq7g/view या लिंकवर क्लिक करुन तुम्ही संबधीत भरतीची जाहिरात पाहू शकता. तसेच अधिक माहिती मिळवू शकता. BMC Recruitment 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख
बृहन्मुंबई माहनगरपालिका अंतर्गत अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 ही असून इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. BMC Recruitment 2024 BMC कार्यालयात नोकरी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. तसेच मुंबई शहराच्या संपूर्ण कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या कार्यालयातील नोकरीच्या जबाबदाऱ्यादेखील तितक्याच मोठ्या आणि प्रशस्त असतात. रस्ते, पाणी, आणि इतर मुलभूत सेवा पुरविणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या जाहिराती निघत असतात. आम्ही आमच्या या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला येथील जाहिरातींबद्दल सविस्तर माहिती देत असतो. आजही अशीच एक जाहिरात घेऊन आम्ही हा लेख सादर केला आहे. लेख कसा वाटला नक्की कमेंट करुन कळवा. आणि या पदासाठी अर्ज करण्यास तुम्ही इच्छूक नसाल तर तुमचा मित्र मैत्रिण किंवा नातेवाईकांना हा लेख जरुर पाठवा जेणेकरुन त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळवता येईल. BMC Recruitment 2024