गुगल ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. इंटरनेट ब्राऊजर, क्लाऊड, सॉफ्टवेअर सारख्या सेवा पुरवते. गुगल कंपनीने निर्माण केलेल्या सर्वच ऍप, ब्राऊजर चे वापरकर्ते अब्जांच्या घरात आहेत. त्यामुळे गुगल कंपनीने निर्माण केलेल्या ऍपचे फिचर्स देखील अपडेटेड असतात. त्यापैकी गुगल मॅप हे जगभरात अधिक वापरले जाणारे ऍप आहे. म्हणूनच जगभरात 100 कोटींहूनही जास्त गुगल मॅप या ऍपचे वापरकर्ते आहेत. गेल्याच महिन्यात गुगल मॅप या ऍपचे नवीन फिचर लाँच झाले, त्याबद्दल आज आपण माहित मिळवणार आहोत. Google map new feature
गुगल मॅपने 25 जूनला लाँच केले नवी फिचर
गुगल या कंपनीने त्याच्या गुगल मॅप या ऍपचे नवीन फिचर दिनमांक 25 जून 2024 US पेटंट व ट्रेडमार्क कार्यालयामध्ये पेटंट केले. या फिचरचे वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रवास सुरू करणाऱ्या मित्र -मैत्रिणींना विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळेत पोहोचण्यासाठी हे ऍप आता मदत करु शकणार आहे. इतकेच नाही तर इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी वापरकर्त्या वाहन चालकाने किती वेगाने गाडी चालवावी याबाबतही हे अॅप वाहन चालकाला सूचना देणार आहे. Google map new feature
नवीन ऍपमध्ये तुमचे वेळापत्रक सेट करा
गुगल मॅप ऍपचे नवीन फिचर तुम्हाला तुमच्या वेळापत्रकाप्रमाणे सेट करावे लागणार आहे. या नवीन फीचरमध्ये कॅलेंडर शेड्युल व मेसेजमध्ये प्रवासात कुठे जायचे आहे हे निश्चित केल्या नंतर हे ऍप तुम्हाला तुमच्या प्लॅनमधील इच्छित ठिकाणी ठरलेल्या वेळात पोहोचण्यास मदत करणार आहे. तसेच एकापेक्षा अधिक वापरकर्त्यांना गूगल मॅप वापरायचे असल्यास तुम्ही त्यांना इन्व्हिटेशन पाठवून ही सुविधा तुम्ही वापरु शकणार आहात. या बद्दल अधिक माहिती आपण पुढे मिळवू. Google map new feature
तुमची पिकनिक प्लॅन करा गुगलच्या मदतीने
तुम्ही एखाद्या रमणीय ठिकाणी पिकनिक प्लॅन करीत असाल आणि तेथे जाण्याचा मार्ग तुम्हाला माहिती नसेल तर काळजी करु नका, गुगल मॅप तुम्हाला तुमची संपूर्ण पिकनिकचा मार्ग गाईड करु शकणार आहे. गुगल मॅपच्या नव्या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या पिकनिकचा संपूर्ण रस्ता आणि कुठे थांबायचे, कोणाला कुठून पिकअप करायचे या सर्व गोष्टी तुम्हाला गुगल मॅपच्या मदतीने प्लॅन करता येणार आहेत.
अशी करा सुरुवात गुगल मॅपसह पिकनिकची
एकापेक्षा अधिक लोकांना एकाच वेळी एकसमान गुगल लोकेशनवर पोहोचायचे असल्यास मुख्य व्यक्तीने सर्वांना Invitation पाठवावे लागणार आहे. त्यानंतर सर्वजण त्यामध्ये ऍड होतील. गुगल मॅपच्या मदतीने प्रवास करणाऱ्या सर्व वापरकर्त्यांची ठिकाणे नेव्हिगेशन सुविधा तुम्हाला सांगू शकेल. इतर प्रवासी कोणत्या मार्गावरून येत आहेत हे देखील तुम्ही त्या मॅपमध्ये नमूद करुन सर्व माहिती मिळवू शकाल. पिकनिक दरम्याने एकमेकांसाठी नेमकं कुठे थांबायचे आहे ते ठिकाण देखील Google Map तुम्हाला सांगू शकणार आहे. इतकेच नाही तर ग्रुपमधील एक सदस्य इच्छित स्थळी आधी पोहोचल्यास इतरांना योग्य मार्ग सुचित करण्यासाठी गुगल मॅपच्या मदतीने रिअल-टाइम माहितीही देऊ शकेल. Google map new feature
पर्यायी मार्ग सुचविण्यास मदत
भारतात अशी अनेक शहरे आहेत जेथे टॅफिकचा प्रॉब्लेम मोठा आहे. तुम्ही एखाद्या नवी ठिकाणी गेल्या नंतर तेथील ट्रॅफिक वेळांची किंवा रस्त्यांची तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही गुगल मॅपच्या मदतीने प्रवास करीत असाल तर गुगल मॅप तुम्हाला पर्यायी रस्ते सुचवणार आहे. याआधी देखील हे फिचर गुगल मॅपमध्ये उपलब्ध होतो परंतु आता ते अधिक चांगल्या पद्धतीने प्रवाश्यांना गाईड करु शकणार आहे. Google map new feature