Jail Department Recruitment 2024: महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, नागपुर, छ.संभाजीनगर कारागृह विभागांमध्ये पोलिस शिपाई पदांच्या 1800 जागांसाठी महाभरती

महाराष्ट्र राज्य गृह विभाग राज्यातील कयदा व सुव्यवस्था पाहते. न्यायालय प्रणालीनुसार जे गुन्हेगार असतात त्यांना कारागृहामध्ये शिक्षेसाठी पाठवले जाते. या कारागृहांची सुवव्यवस्था राखली जावी यासाठी पोलीस शिपाई काम करतात.  महाराष्ट्र राज्य कारागृह विभागांतर्गत तब्बल 1800 पोलीस शिपाई पदाच्या जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्या तरुणांना शासकीय नोकरीमध्ये काम करण्याची इच्छा आहे किंवा तुम्ही पोलीस शिपाई बनू पाहत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरणार आहे. कारण महाराष्ट्र राज्यातील मुंबई , पुणे , नागपुर , छ.संभाजीनगर या चार विभागांमध्ये तब्बल 1800 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासंदर्भातील सविस्तर माहिती आम्ही या लेखाच्या माध्यमातून देत आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा आणि पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. Jail Department Recruitment 2024

राज्यातील कोणत्या विभागाच्या कारागृहात पोलिस शिपाई पदांच्या किती जागा भरण्यात येणार आहेत ते आपण पुढे पाहू.

  • मुंबई विभाग कारागृहात पोलीस शिपाई पदाच्या 717 जागा भरण्यात येणार आहेत
  • नागपूर विभाग कारागृहात पोलीस शिपाई पदाच्या 355 जागा भरण्यात येणार आहेत.
  • छत्रपती संभाजी नगर कारागृहात पोलीस शिपाई पदाच्या 315 जागा भरण्यात येणार आहेत
  • पश्चिम विभाग पुणे येथील कारागृहात 513 जागा भरण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, पश्चिम विभाग पुणे या सर्व विभागात मिळून 1800 इतक्या पोलीस शिपाई पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. Jail Department Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज प्रक्रिया

  • महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग पोलीस शिपाई भरतीसाठी तुम्ही अर्ज करण्यास इच्छूक असाल तर तुम्ही महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 या वेबाईटल भेट द्या
  • https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Registration.aspx या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही वेबसाईटला भेट देऊ शकता.
  • समोर एक वेबपेज ओपन होईल त्यात तुमचा इमेल आयडी, मोबाईलनंबर, तुमचे नाव, आधारकार्ड क्रमांत ही सर्व माहिती समोर दिसणाऱ्या रकान्यांमध्ये भरा.
  • त्याच पानावर एक सुचना देण्यात आली आहे की,  अर्जदाराने फॉर्ममध्ये नमूद केलेला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर भविष्यात बदलू नये.
  • जेणेकरून भविष्यात एखादी सुचना द्यायची असल्यास अर्जदाराला त्या सुचना ईमेल किंवा मोबाईल नंबरवर मिळवणे सहज सोपे होईल.
  • फॉर्म भरून झाल्यावर एकदा तपासून सबमीट करा. Jail Department Recruitment 2024

कारागृह पोलीस शिपाई पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता

कारागृह पोलिस शिपाई या पदांकरीता  अर्ज करु इच्छित असलेला उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक पात्रता देखील आवश्यक आहे. ती पुढीप्रमाणे

  • कारागृह पोलीस शिपाई पदांकरीता पुरुष उमेदवाराची किमान उंची 165 से.मी पर्यंत असावी आणि छाती 79 से.मी तर 05 से.मी फुगवता आली पाहिजे .
  • कारागृह पोलीस शिपाई पदांकरीता महिला उमेदवारांची किमान उंची ही 155 से.मी असणे आवश्यक आहे.  Jail Department Recruitment 2024

कारागृह पोलीस शिपाई पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा

कारागृह पोलिस शिपाई या पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 31 मार्च 2024 मार्च पर्यंत अर्जदाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.  यांमध्ये आरक्षीत मागास प्रवर्गासाठी  वयोमर्यादेत 05 वर्षे सुट देण्यात येईल 

कारागृह पोलीस शिपाई पदांसाठी अर्ज करताना भरावयाची फी

कारागृह पोलीस शिपाई पदांसाठी  तुम्ही अर्ज करु इच्छीत असाल आणि तुम्ही  खुल्या प्रवर्गातील असाल तर तुम्हाला  450/- रुपये परीक्षा शुल्क भरावा लागणार आहे.  तर मागास प्रवर्गातील असाल तर तुम्हाला  350/- रुपये परीक्षा शुल्क  भरावा लागणार आहे. Jail Department Recruitment 2024

अर्ज करण्याची अंतीम तारीख

महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग पोलिस शिपाई भरतीसाठी अर्ज करण्यासाठी दिनांक 31 मार्च 2024 ही अंतीम तारीख आहे. या तारीखच्या आधी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे अपेक्षित आहे. Jail Department Recruitment 2024

Leave a Comment