
Life Insurance Mistakes: आजच्या काळात Life Insurance म्हणजे केवळ एक कागदाचा तुकडा नाही, तर आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठीचं एक आर्थिक कवच आहे. पण अनेक वेळा आपण विमा घेतो, मात्र तो आपल्या गरजेनुसार योग्य आहे का, हे तपासायलाच आपण विसरतो. काही वेळा चुकीच्या पॉलिसीमुळे आपले हजारो रुपये वाया जातात आणि कधी कधी योग्य सल्ल्याअभावी आपल्याला खरं संरक्षणही मिळत नाही. चला तर मग पाहूया, तुम्ही घेतलेला Life Insurance योग्य आहे का, आणि जर नाही, तर तो कसा सुधारता येईल.
1. आपल्या गरजांचा विचार करा
सर्वप्रथम स्वतःला एक प्रश्न विचारा, जर उद्या मी नसलो, तर माझ्या कुटुंबाचं काय होईल, त्यांच्या गरजा कशा पूर्ण होतील? आता या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुमच्या कव्हरेज ची आवश्यकता. तुमचं सध्याचं उत्पन्न, घराचं कर्ज, शिक्षणाचे खर्च, वैद्यकीय जबाबदाऱ्या, आणि कुटुंबातील अवलंबितांची संख्या, या सगळ्याचा विचार करूनच तुम्ही पॉलिसी निवडावी, आणि तरीही फक्त इतकं पुरेसं होईल असं म्हणणं चुकीचं आहे. आर्थिक सुरक्षा म्हणजे मनःशांती, आणि ती फक्त योग्य रकमेच्या विम्यानेच मिळते.
2. पॉलिसीचा प्रकार समजून घ्या
तुमच्याकडे कोणती पॉलिसी आहे? Term Life Insurance की Whole Life Insurance?
Term Plan, निश्चित कालावधीसाठी कव्हर देतो (उदा. 20 किंवा 30 वर्षे), यामध्ये प्रीमियम कमी असतो, पण मॅच्युरिटी रक्कम नसते. Whole Life Plan हा तुम्हाला आयुष्यभर कव्हर देतो आणि त्यासोबत cash value तयार होते जी तुम्हाला भविष्यात उपयोगी पडते. अनेक लोकांना या दोघांमधला फरकच माहीत नसतो आणि चुकीचा प्लॅन घेतात. म्हणूनच, पॉलिसी घेण्यापूर्वी तिचं स्वरूप (Term vs Whole Life Insurance) आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी तिचं नातं समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
3. प्रीमियमचा भार आणि बजेटचा समतोल
कधी कधी लोक उच्च कव्हरेज घेऊन बसतात, पण काही महिन्यांनी प्रीमियम भरणं त्यांना फार कठीण जातं. त्यामुळे पॉलिसी लॅप्स होते आणि सगळे प्रयत्न वाया जातात. म्हणूनच, तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणात प्रीमियम मर्यादित ठेवा. तसंच, विविध विमा कंपन्यांच्या कोट्सची तुलना करा. फक्त कमी किंमत पाहू नका, तर customer support, claim settlement ratio, आणि कंपनीची विश्वसनीयता देखील पहा.
4. पॉलिसी Riders म्हणजे Bonus संरक्षण
तुमच्या पॉलिसीत काही विशेष Riders जोडता येतात, जसे Accidental Death Benefit, Critical Illness Cover, किंवा Disability Income Rider. हे Rider काही प्रमाणात अतिरिक्त खर्चिक असतात, पण जोखीम जास्त असल्यास ते अत्यंत आवश्यक (How to check life insurance policy) ठरतात. मात्र, अनावश्यक Rider घेऊन तुमचे खर्च देखील वाढवू नका. तुमच्या परिस्थितीनुसार संतुलित पॉलिसी Rider निवडा.
5. पॉलिसीचा परफॉर्मन्स ट्रॅक करा
आपल्याला वाटतं, पॉलिसी घेतली म्हणजे झालं, आपलं काम संपलं. पण खरं काम policy monitoring मध्ये आहे. वर्षातून किमान एकदा तरी तुमची पॉलिसी तपासा, म्हणजेच Cash Value वाढतेय का? Investment Return योग्य आहेत का? कोणते शुल्क वजा केले जात आहेत? जर परफॉर्मन्स अपेक्षेप्रमाणे नसेल, तर policy adjustment करा किंवा त्यापेक्षा इतर काही चांगला पर्याय शोधा.
6. योग्य Financial Advisor कडून मार्गदर्शन घ्या
Life Insurance हा दीर्घकालीन आर्थिक निर्णय आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं केव्हाही फायदेशीर ठरतं. एक Certified Financial Advisor तुमच्या वय, उत्पन्न, जबाबदाऱ्या आणि ध्येयानुसार योग्य पॉलिसी सुचवू शकतो. त्यामुळे भविष्यातील अनावश्यक खर्च टाळता येतो आणि तुमच्या कुटुंबाला खरी सुरक्षितता मिळते.
जर तुम्हाला वाटतं की तुमचं Life Insurance तुमच्या गरजेनुसार नाही, तर वेळ न दवडता त्याचं पुनर्मूल्यांकन करा. चुकीच्या पॉलिसीमुळे पैसा, वेळ आणि मानसिक शांती, तिन्ही वाया जातात. पण योग्य नियोजन आणि सजगतेने घेतलेली पॉलिसी तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य उजळवू शकते.









