
ONGC Apprentice Recruitment 2025: देशातील सर्वात प्रतिष्ठित सरकारी कंपन्यांपैकी एक असलेली ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) ने पुन्हा एकदा लाखो तरुणांसाठी रोजगाराची दारं उघडली आहेत. जर तुम्हालाही स्थिर, सन्मानजनक आणि उत्तम पगाराची सरकारी नोकरी (Government Job 2025) मिळवायची इच्छा असेल, तर ही संधी बिलकुल चुकवू नका. ONGC ने Apprentice Recruitment 2025 अंतर्गत विविध विभागांमध्ये तब्बल 2623 पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरतीचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे, यासाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही! म्हणजेच, फक्त तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे या नोकरीसाठी तुमची निवड केली जाणार आहे.
ONGC Apprentice भरतीचे महत्व
ONGC ही भारत सरकारच्या मालकीची सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक कंपनी असून, देशातील पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू उत्पादन क्षेत्रात तिचा मोठा वाटा आहे. ONGC मध्ये काम करणे म्हणजे केवळ चांगली नोकरी नव्हे, तर सुरक्षित भविष्य, उत्तम पगार, आणि सरकारी सेवेमधील प्रतिष्ठा मिळवणे देखील आहे आणि त्यामुळेच दरवर्षी लाखो उमेदवार या भरतीची वाट पाहत असतात.
शैक्षणिक पात्रता | ONGC Apprentice Eligibility
या भरतीसाठी असणारी पात्रता उपलब्ध पदानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. काही पदांसाठी ITI Trade Certificate, काहींसाठी Diploma in Engineering, तर काही ठिकाणी Graduate Degree असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उदाहरणार्थ: लायब्ररी असिस्टंट, कॉम्प्युटर ऑपरेटर, COPA, फिटर, इलेक्ट्रीशियन, ड्राफ्ट्समन, फायर सेफ्टी टेक्निशियन, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, लॅब अनालिस्ट, अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, आणि HR एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी वेगवेगळ्या पात्रतेच्या अटी आहेत. तसेच उमेदवारांकडे किमान 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ONGC च्या अधिकृत वेबसाइटवर (ONGC Recruitment 2025 Notification PDF) जाऊन प्रत्येक पदाच्या सविस्तर पात्रतेची माहिती तपासणे अत्यावश्यक ठरणार आहे.
एकूण रिक्त पदांची संख्या
या भरतीअंतर्गत देशभरात ONGC च्या विविध प्रादेशिक कार्यालयांमध्ये 2623 पदे भरली जाणार आहेत. ही पदे महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा आणि इतर राज्यांमध्ये विभागली गेली आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही राज्यातील असाल, तरी या भरतीत सहभागी होण्याची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे.
वयोमर्यादा | Age Limit
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 24 वर्षे
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल जसे की,
- SC/ST: 5 वर्षांची सूट (कमाल वय 29 वर्षे)
- OBC (Non-Creamy Layer): 3 वर्षांची सूट (कमाल वय 27 वर्षे)
- दिव्यांग उमेदवार (PWD): 10 वर्षांची सूट (कमाल वय 34 वर्षे)
निवड प्रक्रिया | Selection Process
- या भरतीची सर्वात मोठी खासियत म्हणजे अशी की यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही!
- उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळवलेल्या एकूण गुणांवर आधारित मेरिट लिस्टद्वारे (Merit Based Selection) केली जाणार आहे.
- यानंतर, निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत (Interview) घेतली जाईल.
- अंतिम निवड झाल्यानंतर उमेदवारांना संबंधित विभागात Apprenticeship Training साठी नेमले जाईल.
- ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून, कोणतीही परीक्षा किंवा लेखी चाचणी यात समाविष्ट नाही.
स्टायपेंड आणि सुविधा | ONGC Apprentice Stipend & Benefits
ONGC मध्ये Apprentice Training दरम्यान उमेदवारांना दरमहा ठराविक मानधन (Stipend) मिळते. हे वेगवेगळ्या ट्रेडनुसार बदलते, परंतु सरासरी ₹8,000 ते ₹12,000 प्रति महिना इतके असते.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना ONGC किंवा इतर सरकारी संस्थांमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होतात
अर्ज प्रक्रिया | ONGC Apprentice Apply Online 2025
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी ONGC च्या अधिकृत वेबसाइटला https://ongcindia.com भेट द्यावी.
- त्यांनतर “Career” सेक्शनमध्ये जाऊन Apprentice Recruitment 2025 या लिंकवर क्लिक करा.
- तुम्हाला एक फॉर्म ओपन झालेला दिसेल, हा ऑनलाईन अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या आणि स्वतःजवळ सुरक्षित ठेवा.
- लक्षात ठेवा कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
करिअरच्या संधी आणि भविष्यातील प्रगती | Career Scope After ONGC Apprentice
ONGC मध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. सरकारी कंपन्या, तेल कंपन्या, रिफायनरी, पॉवर सेक्टर्स, रेल्वे, पोर्ट ट्रस्ट्स, आणि PSU संस्थांमध्ये भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. तसेच, अनुभवी उमेदवारांना Permanent Employee म्हणूनही संधी मिळू शकते.









