Personal loan top up loan 2024: आधीच कर्ज घेतलेले असल्यावर सुद्धा पुन्हा हवे असल्यास लगेच मिळेल; जाणून घ्या कसे?

Personal loan top up loan 2024 मार्केटमधील अनेक बँका आणि वित्तिय संस्था होम लोनवर टॉप अप लोन देतात. परंतु वैयक्तिक कर्जावर म्हणजेच पर्सनल लोनवर टॉप अप लोन मिळवणे देखील आता सोपे आणि सहज झाले आहे. बऱ्याचवेळा एक कर्ज घेतल्यानंतर सुद्धा आर्थिक गरज भागत नाही  असे आपल्या लक्षात येते. अशावेळी आर्थिक अडचणीत असलेल्या गरजूंना दुसरे कर्ज देखील घ्यावे लागते. ज्या नागरिकांची आणि बँक ग्राहकांची क्रेडिट हिस्ट्री Credit history चांगली असते अशा ग्राहकांना बॅंका तसेच वित्तीय कंपन्या चांगल्या म्हणजे स्वस्त व्याजदराने कर्ज देतात. आर्थिक संकटाच्या वेळी सोने किंवा इतर मालमत्ता Property विकण्यापेक्षा किंवा तारण ठेवण्यापेक्षा Top up Loan हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. Personal loan top up loan 2024

Top up Loan म्हणजे काय?

आधीपासून सुरू असलेल्या कर्जानंतर आणखी काही रकमेचे कर्ज घेण्यास टॉप अप लोन Top up Loan असे म्हटले जाते. तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल किंवा CIBILस्कोअर चांगला असेल तरी हे कर्ज मिळवता येते. Personal loan top up loan 2024

कोणाला मिळू शकते Top Up loan

top up loan eligibility तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा सिबिल स्कोअर चेक करावा लागेल.  जे ग्राहक नियमित कर्जाचे हप्ते फेडणारे असतात, ज्यांचा सिबिल स्कोअर आणि क्रेडिट हिस्ट्री चांगली असते त्यांनाच  टॉप अप लोनचा पर्याय वापरता येईल. Personal loan top up loan 2024

टॉप अपची सुविधा कशा कशावर मिळते

Top Up loanची सुविधा पर्सनल लोन, प्रॉपर्टी लोन,  बिझनेस लोन, एज्युकेशन लोन अशा प्रकारच्या कर्जा टॉप अपची सुविधा ग्राहकांना मिळू शकते. पण आज पर्यंत ग्राहकांचे अनुभव पाहता सर्वधाधारणपणे गृहकर्जावरील टॉप अप लोन फायदेशीर ठरते.  इतकेच काय तर टॉप अप लोनचा वापर मुलांची फी, शॉपिंग, घर किंवा दुकान खरेदी, मुलांचे लग्न, घराचे नुतनीकरण, हॉस्पिटल खर्च अशा विविध कारणांसाठी करता येतो.

टॉप अप लोनची परतफेड कशी करायची?

टॉप अप कर्जाची परतफेड जुन्या कर्जाच्या कालावधीपर्यंत करु शकता. उदाहरण द्यायचेच झाले तर असे म्हणता येईल की, आपण 20 वर्षांसाठी गृहकर्ज घेतले असेल आणि पाच वर्षांनी टॉप अप लोन घेत असेल तर त्याचा कालावधी 10 ते 15 वर्षाचा ठेवू शकता. जेणेकरुन गृहकर्जासोबतच तुमचे टॉप अप लोन देखील फिटून जाईल. अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे या लोनचा व्याजदर हा गृहकर्जावरील व्याजाप्रमाणेच आकारला जातो. म्हणूनच तर पर्सनल लोनपेक्षाही कमी व्याजदरात आपल्याला कर्ज उपलब्ध होते. कर्जाचा कालावधी जेवढा कमी राहील, तेवढे व्याज कमी होते हा देखील या टॉप अप लोनचा फायदा आहे.  Personal loan top up loan 2024

बँक अधिकाऱ्यांसोबत योग्य संवाद

तुम्हाला टॉप अप लोनची योग्य माहिती असेल आणि नियम देखील माहिती असतील तर नक्कीच बँक अधिकार्‍यांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधल्यास तुम्ही टॉप अप कर्ज सहजपणे मिळवू शकते. फरक फक्त इतकाच आहे की, टॉप अप लोन हे  तुमच्या मूळ कर्जापेक्षा अधिक घेता येत नाही. टॉप अप लोनचा अजून एक फायदा म्हणजे यासाठी आपल्याला जास्तीच्या कागदपत्रांची प्रक्रिया पार पाडावी लागत नाही. कारण त्याआधीचे कर्ज घेताना आपण सर्व  कागदपत्रे वेळीच दिलेली असतात, ती कागदपत्रे आधीच बँकेकडे असतात. इतकेच काय तर  त्यावेळच्या उत्पन्नापेक्षा आत्ताचे उत्पन्नही  आपले वाढलेले असते. त्यामुळे उत्पन्नाची माहिती, आयकर रिटर्नस, अन्य कोणते कर्ज नाही ना याची माहिती व अन्य काही प्राथमिक कागदपत्रे दिल्यानंतर काही दिवसांतच हे कर्ज मंजूर होते. आपल्या  आधीच्या होम लोनच्या EMI  सोबतच  याचाही EMI आपल्या बँक खात्यातून  नेहमीप्रमाणे कट होत असतो. Personal loan top up loan 2024

Leave a Comment