PMAY beneficiary’s new List 2024 आपल्या भारत देशात नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. प्रत्येक नागरिकाला घर मिळावे कोणालाही रस्त्यावर रहावे लागू नये यासाठी शासनाने दारिद्र्य रेषेखालील आणि अल्प उत्पन्न गटात मोडणाऱ्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री घरकुल आवास योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत नव्या लाभर्थ्यांची यादी जाहिर झाली आहे. आणि यामध्ये तुम्ही अर्ज भरला असेल तर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये कसे शोधायचे? या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे आम्ही या लेखात मांडल्या आहेत. परंतु तत्पुर्वी प्रधानमंत्री घरकुल आवास योजना नेमकी काय आहे, आणि ही योजना कधीपासून सुरु करण्यात आली याबद्दल अधिक माहिती मिळवूया. Gharkul yojana list 2024
काय आहे प्रधानमंत्री घरकुल आवास योजना -PMAY
केंद्र सरकार मार्फत 1 जून 2025 पासून प्रधानमंत्री आवास योजना शहरी, तसेच ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करून राबवण्यात आली. मुलतः भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचे उद्दिष्ट ही योजना जाहीर करताना डोळ्यासमोर होते. मुख्यत्वे त्याचे दोन घटक असल्याचे दिसून येतात. सर्वात पहिला म्हणजे पीएमएवाय शहरी आणि दुसरा घटक म्हणजे पीएमएवाय ग्रामीण. म्हणूनच या योजनेला औपचारिकपणे प्रधानमंत्री आवास योजना-शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण म्हणून ओळखले जाते.
चला तर मग आपण पाहुया यावर्षीच्या प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची यादी कशी तपासायची. ही यादी ऑनलाईन पद्धतीने तपासावी लागणार आहे. Gharkul yojana list 2024
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या यादीत आपले नाव कसे पहावे?
- तुम्हाला आवास योजनेच्या यादीत तुमचे नाव पहायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx या लिंकवर क्लिक करुन प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यांनतर तुमच्या समोर प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या वेबसाइटचे होमपेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला IAY PMAYG लाभार्थी हा पर्याय निवडायचा आहे.
- यानंतर सुरुवातील नोंदणी करताना मिळालेली तुमचा नोंदणी क्रमांक टाका.
- सबमीट बटणावर क्लीक करताच तुमच्यासमोर एक यादी ओपन होईल.
- जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल, तर Advance Search बटनावर क्लिक करा.
- आता थोडा वेळ थांबा, त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तुमची पंचायत याबाबत विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
सर्व माहिती भरल्यानंतर सर्चचा बटनावर क्लीक करा, तुमची घरकुल योजनेची यादी तुमच्यासमोर ओपन होईल. ज्यावरून तुम्हाला कळेल की पैसे आले आहेत की नाही. Gharkul yojana list 2024
- या प्रोसेस नंतर तुम्हाला तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक देखील मिळेल.
- आता तुम्ही नोंदणी क्रमांक टाकून प्रधानमंत्री आवास योजनेत तुमचे नाव लगेच तपासू शकता.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमार्फत घरे आणि लाभार्थ्यांचे उत्पन्न
तुम्हाला जर प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी पात्र ठरायचे असेल तर तुम्ही पुढील उत्पन्न गटात मोडणे आवश्यक आहे. त्याप्रमाणेच तुम्ही त्या त्या उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज दाखल करु शकता. Gharkul yojana list 2024
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) 3 लाख रुपयापर्यंत
- कमी उत्पन्न गट (LIG) 3 लाख रुपये ते 6 लाख रुपयापर्यंत
- मध्य उत्पन्न गट 1 (MIG-1) 6 लाख रुपये ते 12 लाख रुपयापर्यंत
- मध्य उत्पन्न गट 2 (MIG-2) 12 लाख रुपये ते 18 लाख रुपयापर्यंत
कोणत्या बँका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) गृहकर्ज देतात?
- एसबीआय (SBI)
- पंजाब नॅशनल बँक
- बँक ऑफ बडोदा
- एचडीएफसी बँक
- आयसीआयसीआय बँक
- अॅक्सिस बँक
- आयडीएफसी (IDFC) फर्स्ट बँक
- बंधन बँक
- बँक ऑफ इंडिया
- आयडीबीआय (IDBI) बँक
- कॅनरा बँक
आज भारतातील अनेक नागरिक या प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांना घर नसल्याने रस्त्यावर राहण्याची गरज भासत नाही. शासनाने सुरु केलेली ही योजना अत्यंत लाभकारक आणि हितकारक आहे. उत्पन्न गटानुसार नागरिकांना घरे दिली जातात जेणाकरुन त्यांना कमी दरातील घरे पवडली पाहिलेत. त्यामुळे कित्येक कुटुंबाना डोक्यावर छत मिळत आहेत. वादळ, त्सुनामी, पुर सारख्या नैसर्गिक हानीमुळे ज्यांच्या घरांची हानी झालेली आहे अशांना देखील या योजनेअंतर्गत घरे देण्याची सोय शासनामार्फत करण्यात आली आहे. Gharkul yojana list 2024