Savitribai Phule Aadhaar Yojana: ज्ञानज्योजी सावित्रीबाई फुले आधार योजनेमार्फत विद्यार्थ्यांना मिळणा 60 हजार रुपये

Savitribai Phule Aadhaar Yojana आजही अनेक विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकता नाही. काही विद्यार्थी ओबीसी आणि आरक्षित जाती जमातीमधील असून देखील आणि या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना असूनही अनेकदा घरापासून महाविद्यालये दूर असल्याने वसतीगृहाचा खर्च या विद्यार्थ्यांना परवडत नाही. ही गोष्ट महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आल्यामुळे शासनाने या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु केली आहे. या योजनेचे लाभ आणि योजनेसाठी पात्र  ठरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ही सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत. Savitribai Phule Aadhaar Yojana

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

उच्च शिक्षण घेणाऱ्या व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. Savitribai Phule Aadhaar Yojana

विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम

महानगरपालिका आणि नगरपालिका याप्रमाणे विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम कमी जास्त होणार आहे, कारण शहर आणि ग्रामिण भागात खर्च देखील बदलतात आणि त्याप्रमाणेच शासन विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊ करीत आहे.  

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर,  या सर्व  शहरांमध्ये जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रमाणे आर्थिक सह्याय दिले जाते

 • भोजन भत्ता 32,000/-
 • निवासी खर्च हा 20,000/-
 • उदरनिर्वाह भत्ता हा रुपये 8000/- इतका असणार आहे.

नगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थी जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी  पुढील प्रमाणे आर्थिक सहाय्य दिले जाते.

 • भोजन भत्ता: 28000/-
 • निवासी भत्ता: 15000/-
 • उदरनिर्वाह भत्ता: 8000/-
 • अशा प्रकारे उमेदवाराला एकूण 51000/- रुपयांची मदत मिळेल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्याची पात्रता

 • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
 • विद्यार्थ्याने वसतिगृह प्रवेशासाठी पात्रता आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे.
 • इतर मागासवर्गीय, वगळलेल्या जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योग्य प्राधिकरणाने जारी केलेले जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 • अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महिला व बालकल्याण विभागातील सक्षम अधिकाऱ्याकडून अनाथ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 • अपंग श्रेणीतून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 40% पेक्षा जास्त अपंगत्व असल्याची पुष्टी करणारे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. Savitribai Phule Aadhaar Yojana

आवश्यक कागदपत्रे कोणती?

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही वस्तीगृहात राहणाऱ्या  OBC आणि VJNT विद्याथ्यांसाठी आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध कागदपत्रे आवश्यक आहेत.

 • भाड्याने किंवा स्थानिक नसलेल्या निवासस्थानावर राहण्याची पुष्टी करणारे नोटरीकृत शपथपत्र.
 •  कोणत्याही सरकारी वसतिगृहात अचूकतेची स्वयं-घोषणा स्वीकारली जाते.
 • भाड्याच्या निवासस्थानासाठी भाडे कराराचे शपथपत्र.
 • कॉलेज प्रवेशाची कागदपत्रे आवश्यक
 • पदवी किंवा पदव्युत्तर प्रमाणपत्र Savitribai Phule Aadhaar Yojana
 • विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला – वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असावे
 •  अर्जदार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात किमान 75% उपस्थिती राखली असल्याचे प्रमाणपत्र Savitribai Phule Aadhaar Yojana

 योजनेचे फायदे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अनेक फायदे पहायला मिळत आहेत. सर्वत प्रथम म्हणजे राज्यातील गरजू आणि बिकट आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य मिळाले आहे. त्यामुळे हे विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करु शकले आहेत. घरापासून दूर राहून त्यांचा आर्थिक खर्च उचलण्याची क्षमता सरकारने दाखवली आहे.

या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शहरी आणि ग्रामिण अशा विविध प्रकारातून भत्ते पुरविले जातात. या सर्व भत्त्यांची रक्कम वार्षिक 60,000 रुपयांपर्यंत असते.  

हे आर्थिक सहय्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दिले जाते. त्यामुळे गरजू विद्यार्थांना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागत नाही. Savitribai Phule Aadhaar Yojana

Leave a Comment