Download Maharashtra voter list 2024: 2024 ची अपडेटेड मतदार यादी डाऊनलोड करा, अगदी सोप्या पद्धतीने

भारतात लोकसभा निवडणूकीला सुरुवात झाली आहे. दर पाच वर्षांनी भारतात निवडणूका होतात. मतदान करणे हा प्रत्येक भारतीयचा अधिकार आहे. आणि आपल्या लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या देशात मतदानाचा अधिकार बजावणे आणि आपला योग्य प्रतिनिधी निवडून देणे ही एक जबाबदारीची गोष्ट आहे.

मतदानाचा अधिकार बजावताना आपले मतदार ओळखपत्र मिळविण्यासाठी 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस मतदार नोंदणी करणे अनिवार्य असते. नागरिकांना मतदार कार्ड मिळावे यासाठी शासकीय सुविधा उपलब्ध आहेत, परंतु आता एकदा मतदार म्हणून नोंदणी झाल्यानंतर नागरिक ऑनलाईन पद्धतीने मतदार कार्ड मिळवू शकतात आणि आपले नाव मतदार यादीत तपासू देखील शकतात. ही संपूर्ण सुविधा निशुल्क आणि ऑनलाईन पद्धतीने करता येते. अगदी घरी बसल्या बसल्या नागरिक स्वतःचे नाव मतदार यादीत तपासू शकतात आणि मतदार यादी देखील डाऊनलोड करु शकतात. याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही हा लेख घेऊन आलो आहोत. Download Maharashtra voter list 2024

मतदानाचा अधिकार कोणाला असतो?

भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. येथे दर पाच वर्षांनी निवडणूका होतात. नागरिक स्वतःचे प्रतिनीधी निवडून देतात आणि हि निवड प्रक्रिया मतदानाच्या माध्यमातून पूर्ण होते. हा अधिकार सर्व भारतीयांना असला तरी त्याचा एक नियम आहे. तो म्हणजे 18 वर्षे पूर्ण झालेली व्यक्तीच मतदानाचा अधिकार बजावू शकते. मागील काही वर्षांत अनेक बदल झाले आहेत. पुर्वी तृतीय पंथीयांना मतदानाचा किंवा शासकीय सेवेत रुजू होण्याचा अधिकार नव्हता परंतु आता तसे नाही, आता 18 वर्षे पूर्ण असलेल्या तृतीय पंथीयांना देखील मतदानाचा अधिकार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासकीय सेवेत देखील कर्तव्य बजावण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे. ही एक अत्यंत चांगली बातमी आहे. Download Maharashtra voter list 2024

तुमचे मतदार यादीतील नव येथे तपासा

तुम्ही मतदार म्हणून नोंदणी केलेली असेल आणि तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत तपासायचे असल्यास तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमचे नाव मतदार यादीत तपासू शकता.

  • https://electoralsearch.eci.gov.in/ या लिंकवर क्लिक केल्यानंतर मतदारा सेवा पोर्टल या शासकीय वेबसाईटला भेट देऊ शकता.
  • तेथे तुम्हाला 3 पर्याय दिसतील  Search by EPIC, Search by Details, Search by Mobile या पैकी कोणत्याही एका पर्याच्याच्या मदतीने तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासू शकता.
  • सर्वात सोपा पर्याय म्हणून आपण Search by Mobile या पर्यायाचा वापर करु.
  • या पर्यायावर क्लिक केल्याननंतर काही रकाने खुले होतील, त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य, तुमची भाषा आणि तुम्ही मतदार नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो रकान्यांमध्ये भरायचा आहे.
  • समोर दिसत असलेला कॅपचा देखील भरा आणि Send OTP वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर OTP येईल तो तेथे भरा. आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
  • अगदी काही सेकंदातच तुमच्यासमोर तुमचे नाव आणि तुमचे मतदान केंद्र, तुमचा पत्ता आणि तुमच्या मतदार ओळखपत्राचा क्रमांक समोर येईल.
  • ही माहिती डाऊनलोड करुन ठेवा किंवा स्क्रिन श़ॉर्ट करुन ठेवा. जेणेकरून पुढच्यावेळी तुम्हाला कामी येईल.  Download Maharashtra voter list 2024

अशी करा डाऊनलोड अपडेटेड मतदार यादी

  • नागरिकांना मतदार यादी घरबसल्या पाहता यावी यासाठी केंद्र शासनाने मतदार सेवा पोर्टल सुरु केले आहे.
  • https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S13 या लिंकवर क्लिक करुन तुम्ही मतदार सेवा पोर्टल च्या वेबसाईटवर जाऊ शकता.
  • तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. त्यातील रकान्यांमध्ये तुम्हाला राज्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, लोकसभा क्षेत्राचे नाव, भाषा निवड आणि कॅपचा भरुन Search बटणावर क्लिक करायचे आहे.
  • असे केल्यानंतर Draft Roll – 2024,      Final Roll – 2024, General Election Roll 2024 असे तीन पर्याय येतील यापेकी शेवटचा पर्याय निवडा म्हणजे तुम्हाला हवी असलेली मतदार यादी Pdf स्वरुपात तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये सेव केली जाईल.
  • अशा पद्धतीने तुम्ही भारतातील कोणत्याही राज्यातील, कोणत्याही लेकसभा क्षेत्राची मतदार यादी ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकता. Download Maharashtra voter list 2024

मतदान करा विकसित भारताचे जबाबदार नागरिक व्हा!

Leave a Comment