Land Kharedi Khat:जमिनीचे खरेदी खत कसे तयार करतात? जमिनीची रजिस्ट्री केव्हा रद्द होते.

जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये अत्यंत महत्त्वाचे असते ते म्हणजे खरेदी खत. हे खरेदी खत कसे तयार केले जाते हे आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. एखाद्या व्यक्तीने जमीन खरेदी केल्याचा व्यवहार पूर्ण करुन जमीनीवर मालकी हक्क दाखवण्यासाठी मिळवायचा शासकीय पुरावा म्हणजेच खरेदी खत होय. जमिनीचा व्यवहार करताना जी किंमत ग्राहक आणि जमीन विकणारा यांच्या सहमतीने ठरलेली रक्कम अदा करून व्यवहार पूर्ण झाल्यावर खरेदी खत केले जाऊ शकते. जमीनीचे मालकी हक्क हस्तांतरीत करण्यासाठी खरेदी खत केले जाते. त्यामुळे जमिनीच्या किंवा कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी खताला खूप जास्त महत्व असते. म्हणूनच आज आम्ही आज खरेदी खत कसे तयार करतात आणि हे खरेदी खत रद्द करता येते का? या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे घेऊन आलो आहोत. How to make land Kharedi Khat

जमिनीचे खरेदी खत तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

जमिन खरेदी केल्या नंतर अत्यंत महत्त्वाचे असते ते जमिनीचे खरेदी खत. खरेदी केलेल्या जमिनीवर स्वतःचा हक्क दाखवण्यासाठी या खरेदी खताचा अत्यंत मोठा वाटा असतो. हे खरेदी खत तयार करण्यासाठी पुढील प्रकारची कागदपत्रे आवश्यक असतात.

  • ज्या दोन व्यक्तींमध्ये व्यवहार होत आहे त्यांच्या पॅनकार्डची कॉपी
  • जमिनीचा सात बारा उतारा
  • मुद्रांकशुल्क भरल्याची पावती
  • जमीचा उतारा -8 अ
  • प्रतिज्ञापत्र
  • जमिनीच्या दस्तावेजात केलेले फेरफार
  • साक्षीदार राहणाऱ्या दोन ओळखीच्या व्यक्तींचे फोटो
  • NA ऑर्डर ची प्रत

अशी असते खरेदी खत करण्याची प्रक्रिया

एखाद्या मालमत्तेचा दोन व्यक्तींमध्ये एखाद्या मालमत्ते  ठरावीक रकमेला धरुन व्यवहार झालेला असेल, तर त्या जमिनीचा सरकारी भाव म्हणजेच government valuation किती येतो, ते दुय्यम निबंधक कार्यालयाकडून जाणून घेणं गरजेचं असतं.सोबतच मालमत्ता विकत घेणाऱ्या व्यक्तीने संबंधित मालमत्तेचा चालू बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन म्हणजेच market value तपासून पाहणे देखील गरजेचे असते. त्यानंतर मग या दोघांनी, सहमतीनं संबंधित मालमत्तेची रजिस्ट्री किती रुपयांची करायची ते ठरवायचे असते.तुम्ही जितक्या रकमेची रेजिस्ट्री करणार आहात, त्या रकमेवर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी आकारली जाते. आणि जमिनीचे खरेदी खत तयार केले जाते. land record

खरेदी खत तयार करण्यापूर्वी

कोणत्याही जमिनीचे खरेदी खत करण्याआधी  जमीन खरेदी करणार्‍याने जमीन मालकाला ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे संपूर्ण रक्कम देणे बंधनकारक असते. जमीन खरेदी आणि विक्री करणाऱ्या दोन्ही गटांकडून आर्थिक व्यवहार म्हणजेच जमिनीची ठरलेली  सर्व रक्कम पूर्ण झाली नसेल तर खरेदीखत करू नये. कारण एकदा खरेदीखत झाले की जमीन खरेदी करणारी व्यक्ती त्या जमिनीवरचा मालकी हक्क काढून घेतो आणि आधी ज्या व्यक्तीची जमीन होती ती व्यक्ती काहीच करु शकत नाही. याचे अजून एक कायदोशीर कारण म्हणजे खरेदीखत सहजासहजी रद्द होत नाही. land record

खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार

खरेदीखत रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयालाच असतो. कारण ही एक कायदेशीर बाब आहे. दोन गटांमध्ये सामंजस्याने झालेला तो व्यवहार असतो. यामध्ये आर्थिक व्यवहार पूर्ण झालेला नसेल तर त्यासाठी  तहसिलदार कार्यालय जबाबदार नसते. त्यानंतर तो मुद्दा न्यायालयात जातो आणि सर्वोच्च न्यायालयात खरेदी खत रद्द करण्याबाबात सुनावणी होते. land record

खरेदी खतामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो?

जमिनीच्या खरेदी खताला जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा देखील मानले जाते.  या दस्तऐवजात जमिनीचा व्यवहार किती तारखेला झाला? कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रासाठी आणि किती रुपयांना हा व्यवहार झाला?  यासंबंधीत संपूर्ण खरेदी खतामध्ये देण्यात आलेली असते. जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार कोणत्या तारखेला झाला हे देखील त्यामध्ये नमूद करण्यात आलेले असते.  खरेदी खत झाल्यानंतर सदर माहिती फेरफारवर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद केली जाते. land record

Leave a Comment