Borewell anudan yojana: काय सांगता? आता शेतात बोअरवेल खोदण्यासाठी मिळणार 80% सबसिडी.. असा करा अर्ज..

Borewell anudan yojana: दुष्काळ आणि भूजल पातळी कमी होण्याची समस्या वाढत जात आहे आणि या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी, महाराष्ट्र सरकार द्वारे शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी बोअरवेल अनुदान योजना 2024 सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश पाणीपुरवठा सुधारणे आणि दुष्काळाशी लढण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे.

ज्यांच्याकडे शेतात सिंचन करण्यासाठी विहिरी किंवा पाण्याचे निश्चित स्त्रोत नाहीत, महाराष्ट्रातील अशा शेतकऱ्यांसाठी बोअरवेल योजना ही अतिशय फायदेशीर योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आपल्या शेतात बोअरवेल खोदण्यासाठी राज्य सरकारद्वारे 80 टक्के अनुदान देण्यात येते. या कारणाने शेतकऱ्यांना कमी खर्चात त्यांच्या शेतासाठी पाणी मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही. या योजनेसाठी तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून घरी बसून ऑनलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची सुरुवात केली गेली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्हाला शेतकरी म्हणून नोंदणी करणं आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. Borewell anudan yojana

बोअरवेल अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

बोअरवेल योजना (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login)

बोअरवेलसाठी महाराष्ट्र सरकार द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन शेतकरी म्हणून नोंदणी करावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला या बोअरवेलसाठी अर्ज करता येऊ शकणार आहे. सरकारकडून बोअरवेलसाठी (Borewell anudan yojana) अर्ज मागविण्यात आल्या नंतर, अर्ज केलेल्या शेतकऱ्यांमधून लॉटरीद्वारे पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात येते. निवडण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांना बोअरवेलसाठी राज्य सरकारद्वारे 80 टक्के अनुदान मिळेल. जर तुम्हाला सुद्धा या बोअरवेल योजना महाराष्ट्र 2023 चा लाभ करून घ्यायचा असेल, तर तुम्ही, आम्ही वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून लगेचच ऑनलाइन अर्ज करू शकता.

योजनेचे लाभ:

अनुदान: या योजनेंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना विहिरींच्या बांधकामासाठी ₹ 20,000 पर्यंतचे अनुदान दिले जाईल. जमिनीचा प्रकार आणि विहिरीची खोली यावर अनुदानाची रक्कम अवलंबून असेल.
पाणीपुरवठा: शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी पुरेसे पाणी या योजनेमुळे मिळेल, आणि यामुळे उत्पादकता आणि उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
दुष्काळ निवारण: दुष्काळाच्या प्रसंगी, विहिरी शेतकऱ्यांना पाण्याचा अतिरिक्त स्रोत पुरवतील, ज्यामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान होण्यापासून संरक्षण होईल. Borewell anudan yojana

पात्रता:

या योजनेअंतर्गत 20 गुंठे ते 6 हेक्टर जमीन असलेले शेतकरी अर्ज करू शकतात.

लहान व मध्यम शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःची विहीर नसली पाहिजे. असे शेतकरी ज्यांची स्वतःची विहिर आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

महाराष्ट्रात राहणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

जमीन शेतकऱ्याच्या नावावर असावी.

जमीन सिंचनासाठी योग्य असावी.

शेतकऱ्याने विहित अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

अर्ज प्रक्रिया:

महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून शेतकरी अर्ज डाउनलोड करू शकतात.

जवळच्या कृषी कार्यालयात भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील.

कृषी विभागाकडून अर्जांची पडताळणी केली जाईल आणि पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाईल व त्यांना अनुदान मिळेल.

आवश्यक कागदपत्रे:

उत्पन्न प्रमाणपत्र
सातबारा उतारा
विहीर नसल्याचं प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
आधार कार्ड
बँक खाते पासबुक

मुख्य मुद्दा:

ही योजना फक्त नवीन विहिरींच्या बांधकामासाठी लागू आहे. सध्याच्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी कोणतेही अनुदान उपलब्ध असणार नाही.

जास्तीत जास्त एका विहिरीसाठी, एका शेतकऱ्याला अनुदान मिळू शकते.

अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

कृषी विभागाच्या देखरेखीखाली विहिरींचे बांधकाम पूर्ण करावे. Borewell anudan yojana

अधिक माहितीसाठी:

अधिक माहितीसाठी शेतकरी त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयासोबत संपर्क करू शकतात.
यासाठी तुम्ही महाराष्ट्र कृषी विभागाच्या ऑफिशियल वेबसाइटला देखील भेट देऊ शकणार आहात.

या योजनेचे महत्त्व काय आहे?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बोअरवेल अनुदान योजना 2024 ही उपयुक्त योजना आहे. या योजनेचा लाभ मिळाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक पाणी मिळून त्यांचे उत्पन्न वाढू शकते. Borewell anudan yojana

Leave a Comment