UPI users be alert: UPI वापरत असाल तर सावधान!  अशी घ्या कळजी आर्थिक व्यवहार करताना

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारताच्या शासकीय संस्थेमार्फत विकसित केलेली UPI ही झटपट पेमेंट प्रणाली आहे. UPI म्हणजेच Unified Payments Interface होय.  प्रत्येक व्यक्तीच्या हातात असलेला स्मार्टफोन वापरून बँक खात्यांमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय  झटपट व सुरक्षित कॅशलेस व्यवहार  करण्यासाठी तयार करण्यात आलेली ही एक प्रेमेंट सिस्टिम आहे.

UPI ची पेमेंट सिस्टिम वापरुन आपण कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वेळी पैसे ऑनलाईन पद्धतीने पाठवणे व घेणे शक्य होते.  फक्त आपल्याला ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा समोरिल व्यक्तिचा व्हर्च्युअल पेमेंट अड्रेस (व्हीपीए) माहीत असणे आवश्‍यक असते.UPI पेमेंट सिस्टिम वापरणे जितके सोपे आहे तितकेच ते योग्य प्रकारे वापरणे देखील गरजेचे आहे, नाहीतर वापरकर्त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागू शकते. या लेखात दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही UPI पेमेंट प्रणाली वापरात आणल्यास तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही, अत्यंत सावधगिरीने आणि योग्य पद्धतीने तुम्ही पेमेंट करु शकता आणि झटपट आर्थिक व्यवहारांच्या सुविधा देखील अनुभवू शकता. UPI users be alert

कोणालाही तुमच्या डेबिट कार्डची माहिती देऊ नका

  • तुमच्या बँकेने दिलेल्या डेबिट कार्डची माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नका. तसेच ई बँकिंगचा वापर करताना तुमच्या संगणकावर किंवा मोबाईलमध्ये ऑनलाईन पासवर्ड सेव करु नका, कारण तेव्हा ते पासवर्ड गुगल सर्फेसवर सेव होते आणि तुमच्या नकळत तिसरी व्यक्ती तुमचे ऑनलाईन बँकिंग हँडल करु शकते. त्यामुळे शक्यतो तुमचे बँकिंग युझरआयडी आणि पासवर्ड ऑनलाईन सेव करु नका.

फसव्या  Apps पासून सावधान रहा

  • तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवरुन तुम्ही एखादे  App डाऊनलोड करीत असाल आणि त्यासाठी UPI च्या माध्यमातून पेमेंट करीत असाल तर सावध रहा. बाजारात असे अनेक ऍप आहे जे फसवे आहेत आणि त्या ऍपसोबत एखादा जरी आर्थिक व्यवहार तुम्ही केलात तर तुमचे संपूर्ण अकाऊंट रिकामे होऊ शकते.

तुमचा UPI Pin आणि OTP कोणालाही सांगू नका 

  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीस किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये देखील तुमचा UPI पिन नंबर आणि आर्थिक व्यवहार करताना तुमच्या मोबाईलवर आलेला OTP नंबर शेअर करु नका. कारण UPI pin हा तुमचे बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी केलेली एक सुरक्षित सिस्टिम आहे. ऑनलाईन पेमेंटच्या वेळेस UPI Pin सेट करताना देखील तो कोणालाही सहज ओळखता येईल असा ठेवू नका. UPI users be alert

UPI ॲप कयम अपडेट ठेवा

  • तुम्ही वेळोवेळी तुमच्या आर्थिक व्यवहारांसाठी UPI ॲप वापरत असाल तर ते अपडेट करीत रहा. या ॲपचे  एखादे नवीन व्हर्जन आले असल्यास ते तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा. त्यामुळे तुमचे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित राहतात.  

ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना सार्वजनिक Wi-Fi चा वापर करु नका

सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क असुरक्षित आहेत कारण ते हॅक करणे सोपे आहे. तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी, यू. पी. आय. हस्तांतरणासाठी तुम्ही वापरत असलेले नेटवर्क कनेक्शन सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे याची खात्री करा.

UPI पेमेंट करताना Receiverची माहिती तपासा

  •  UPI पेमेंट करण्यापूर्वीच तुम्ही ज्या व्यक्तीला पेमेंट करणार आहात त्याचे  UPI ID तपासा, तुमच्याकडे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर असल्यास खात्री करा की ती तीच व्यक्ती आहे का ज्यांना तुम्ही पैसे पाठवू इच्छित आहात. अनेकदा अशा परिस्थितीत फसवणूक होण्याची शक्यता असते. कारण समोरील व्यक्ती तीच आहे की नाही याची खात्री केल्या शिवाय पेमेंट केल्यास नंतर ते पैसे परत मिळविता येत नाहीत. सध्या मार्केटमध्ये अशा पद्धतीचे फ्रॉड करणाऱ्या टोळ्या अनेक आहेत. UPI users be alert

Leave a Comment