How to Check E Challan Status: तुमच्या गाडीवर असलेला दंड ऑनलाइन कसा चेक करायचा? वाचा संपूर्ण माहिती

How to Check E Challan Status: रोडवर कोणतेही वाहन चालवत असताना नियमांचे पालन करणे आवश्यक असते. परंतु बऱ्याचदा वाहन चालवत असताना आपल्या कडून अनावधानाने वाहतुकीचा नियम मोडला जातो व आपल्याला वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दंड ठोठावला जातो.

तसेच अनेकवेळा असं देखील होते की, आपल्याकडून ट्रॅफिक नियम मोडला जातो आणि या ठिकाणी जर वाहतूक पोलीस नसले तरी रस्त्यालगत ठिकठिकाणी असलेले कॅमेरे मध्य तुम्हाला कॅप्चर करू शकतात. यामुळे तुमच्यावर इलेक्ट्रॉनिक चालान जारी केल्या जाऊ शकते. e challan maharastra app

बऱ्याचदा आपण वाहन चालवतो व आपल्याकडून वाहतुकीचे नियम मोडले जातात. यामुळे आपल्याकडून किंवा आपल्या नावे चालान जारी केले जाते परंतु ते आपल्याला माहित देखील नसते. हे चालान तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तसेच हे चालान भरणं देखील गरजेचे आहे. हे चालान नाही भरले तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.

तुमचं कोणतं चालान पेडिंग तर नाही हे चेक करणं आवश्यक आहे. कारण यामध्ये तुमच्या नावे दंड आकारला गेला आहे आणि तुम्ही जर तो भरला नाही तर तुम्हाला कोर्टात जाऊन देखील दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे कोर्टाच्या हेलपाटा मारण्यापेक्षा तो तुम्ही ऑनलाइन किती चालान आहे हे तपासून ऑनलाइन चालान भरू शकता. दिवसेंदिवस सर्वच कामे ऑनलाइन होत चालली आहे.

check e challan online आता संपूर्ण देशामध्ये वाहतूक दंड लावण्याची प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलीस हे तुम्ही जर कोणत्याही प्रकारचा नियम मोडला तर तुम्हाला न थांबवता तुमच्या गाडीचा नंबर आणि एक फोटो काढून तुमच्यावर दंड ठोठावला जातो. हा दंड तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला हा दंड ऑनलाइन चेक करावा लागतो.

बऱ्याचदा सिग्नलवर वाहतुकीचा नियम मोडणे किंवा नो पार्किंग मध्ये गाडी पार्क केली असेल तर असे वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे गाडीवर ऑनलाइन दंड आकारला जातो. Traffic Challan Check परंतु तो आपल्याला कसा कळेल याबाबत आपण सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

how to check traffic e challan check वाहतूक पोलिसांनी लावलेला दंड ऑनलाइन कसा चेक करायचा?
1) तुम्हाला ई चालान चेक करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला परिवहन विभागाच्या ई चालान वेबसाईटवर जावे लागेल किंवा परिवहन विभागाचे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
2) गुगल प्ले स्टोअर वरून महा ट्रॅफिक ॲप डाऊनलोड करून घ्या.
3) ॲप ओपन करा. त्यानंतर चेक ऑनलाईन सर्व्हिसेस हा त्या ठिकाणी पर्याय दिसेल व यावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी चेक चालान स्टेटस वर क्लिक करा.
4) त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा वाहनाचा नंबर तसेच ड्रायव्हिंग लायसन नंबर टाकून इ चालान SMS द्वारे मिळवण्यासाठी च्या पर्यावर क्लिक करा.
5) समजा तुम्हाला जर कोणत्याही प्रकारच्या चालान मेसेज आला नाही तर डीएल किंवा व्हीकल नंबरचा पर्याय निवडावा लागेल.
6) त्या ठिकाणी जी माहिती विचारलेली असलेली ती माहिती व्यवस्थित भरा आणि गेट डिटेल्स बटणावर क्लिक करा.
7) आता तुम्हाला दिसून जाईल की तुम्हाला किती आणि कशाचे ई चालान लागले आहे. याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे दिसून जाईल.
8) हे ई चालान तुम्ही ऑनलाइन भरू शकता. त्यासाठी तुम्हाला तिथे पे नाऊ चा पर्याय दिसेल.
9) हा पर्याय निवडून तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड च्या माध्यमातून पेमेंट करू शकता.

E challan check online अशाप्रकारे तुम्हाला लागलेला दंड घरबसल्या ऑनलाइन तपासू शकता. हा लागलेला दंड ऑनलाइन तुम्ही तिथून भरू शकता. ही माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ही उपयुक्त माहिती इतरांना देखील माहित व्हावी यासाठी ही माहिती पुढे नक्की पाठवा.

Leave a Comment